ब्युटी क्वीन
ब्युटी क्वीन


माइकवरून घोषणा झाली 'मिस' ठमा तशी ठमा खडबडून जागी झाली. ज्या क्षणांची ती आतुरतेने वाट पहात होती तो क्षण येऊन ठेपला होता. ठमा खुर्चीवरुन उठण्याचा प्रयत्न करत होती. पण काही केल्या ती खुर्चीतून निघत नव्हती. पुन्हा एकदा मिस ठमा आता मात्र ठमा खुर्चीतुन निघाली, पण खुर्ची मोडली होती गुडघ्यावर हात टेकत टेकत ठमा पावल टाकत होती नवीन कॅटवॉकचा प्रकार पाहून प्रेक्षकामधे हशा पिकला. तब्बल दहा मिनिटांनी ठमा स्टेजवर पोहोचली. शो लाइट ऑन झाले. हिरव्या पिवळ्या लाईटच्या उजेडात तिच्या काळ्या गालावरची गुलाबी लाली उमटून दिसत होती. तिने दोनदा कंबर हलवण्याचा प्रयत्न केला. ती गरकन फिरली मिस इंडिया स्पर्धेत आतापर्यंत येऊन गेलेल्या स्पर्धकामधे ठमा एकटीच एकशे सत्तर पौंड वजनाची होती. तिच्या काळया रंगाला लाल भडक गाऊन अधिकच खुलुन दिसत होता. केसाच्या दोन मोठ्या बटा तिच्या सौंदर्यात भर घालीत होत्या. साडेतीन फूट उंचीची ठमा विशेष नटून थटून आली होती, नकटे नाक मुरडत आणि डोळे मिचकावत तिने प्रेक्षकांना अभिवादन केलं. पण तेवढ्यात संयोजकांनी तिला सावध केलं,
"मिस ठमा अब आपको आखरी सवाल पुछा जाएगा इस का जवाब आप ध्यान से दिजीये. आप के सामने बैठी है मिस नताशा छाजु, मिस कारा चिना और मिस मिलाका खजूरी." संयोजकांनी तिला प्रश्न विचारला, "मातृहृदय के बारे मे क्या सोचती है" मिस ठमा गोंधळली. तिला काय सांगावे सुचत नव्हते. तिने स्टेजसमोर बसलेल्या दोन लहान मुलाना जवळ घेतलं. ती दोन मुलं मिस खजुरीच्या नोकराणीची होती. ठमाने त्यांना कुरवाळलं आणि तिच्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमधे ती बोलली, "दिज आर माय चिल्ड्रन्स" तिच्या या वाक्याने सभागृहात शांतता पसरली ठमा क्षणभर स्तब्ध झाली. पण नंतर धीटपणे म्हणाली, "आय वांट टू आडप्त दिज चिल्ड्रन्स" ठमाच्या साध्या सरळ उत्तराने संयोजक भारावले. आता वेळ विजेता घोषित करण्याची होती. स्टेजवर मिस नताशा, मिस कारा, मिस मिलाका, खजुरी उभ्या होत्या, ठमा गोंधळली. तिला संयोजकांनी स्टेजवर जाण्यास सांगितले. ठमा कोपऱ्यात उभी राहिली. संयोजकांनी निकाल घोषित करताना सागितले की, "जो नारी दुसरे के बच्चो को अपना समजती है वो सर्वोत्तम नारी है".
"इसिलिए आज की मिस इण्डिया है मिस ठमा" टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी उभे राहून मिस ठमा चं स्वागत केलं. मिस ठमाने कंबर हलवत डोळे मिचकावत प्रेक्षकांना अभिवादन केलं. एका सामान्य घरातील मुलीला न्याय मिळाला होता. मिस ठमाच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत होते.