ब्रेकअप
ब्रेकअप
काही म्हणा गर्लफ्रेंड कधी रुसतील काही कुणी सांगू शकतो का????? आणि जरी सांगू शकला तरी कारण रुसण्यामागचे कधीही सांगू शकणार नाही????
मी गेले दोन दिवस झाले माझी girl friend का रुसली आहे त्याचे कारण शोधतो आहे. बरेचदा तिला फोन केला Not Answering.
What's App वर मेसेज केले Not Seen. Text Messages केले. No Revert.
तिच्या जवळ बोलायची आतुरता नव्हती. पण माझ्या कडून असली कोणती चुकी झाली फक्त ते जाणून घ्यायचे होते.
त्या साठी मी माझी तिची जुनी चॅटिंग पण पूर्ण READ केली त्यातही काही नव्हती माझी चुकी.
मग असे कोणते मी घोडे मारले होते तिचे?????😁😁😁😁
तिच्या बापाला , भावाला तर नाही ना कळाले???
परत तिचे आणि प्रणय जवळ पॅचअप तर नाही झाले???
कुणी दुसरा???
रोहितच्या प्रपोजला हो तर नाही ना म्हणाली????
नको नको ते विचार डोक्यात. एक जीव म्हणायचा
" काय फरक पडतोय???
पूजा ने नुकताच Velentine Day ला प्रपोज केला होता.
नाही तर अर्चना आहे जी ला मी लाईक करायचो साहजिक ती ही करायची पण प्रपोज झाला नव्हता. आता पूजा नाही तर अर्चना.
पूजा अर्चना करत बसू. गेली तर गेली उडत किती सांभाळून घ्यायचे आणि का?? उगाच??
तिची शॉपिंग तिच्या मैत्रिणी त्यांना हॉटेल पार्टी हेच आहे का माझे जीवन???
घरी कधी वडापाव नाही दिला. ह्या चांडळणीला बर्गर काय सँडविच काय ?? कॅफे , मॅक डी सिनेमा नको नको तिथे खर्च केला.😀😀😀😀😀😀
आहे जाणीव त्याची???
ओला ऊबर भले मोठे त्यांचे भाडे भरले. तेच जर जपून ठेवले असते ना?? आज एक निदान गाडी आली असती. गाडी सोडा???
निदान एक रिक्षा तरी आलीच असती. 😁😁😁😁
आता काय बोलून फायदा आहे. ???
किडा कमी नाही ना माझ्यात पण?????😁😁😁😁
एक मात्र चांगले झाले होते आज झोप मस्त येणार होती. नाही तर नेहमी तिच्या फालतूच्या मेसेजेस ला रिप्लाय देवून आर्धी रात्र जगायची. तिचे चॅटिंग चे विषय पण कमाल
विषय काय तर गावी असे झाले ?? तो असा बोलला मावशी मामा काका.
हा तो लाईक करायचा?? मरायचा ??
आवडायचा ??
मी म्हणतो त्यालाच गाडायचा मला का फुकटची फाशी???😁😁😁😁😁😁
मस्त झोप लागणार इतक्यात तिचा What's App
" रागात आहेस ????
जी दोन दिवस माझा फोन रिसिव्ह करत नव्हती. जी मेसेजेस चा रिप्लाय देत नव्हती ती विचारतेय काय तर??
रागात आहेस?? 😁😁😁😁😁
सांगा काय रिप्लाय देवू??? Boy Friend सर्वच मती भ्रष्ट 😁😁😁😁
मी - नाही ग??? तुझ्या वर कधी आजुन रागवलेले माहित आहे का???
ती - घे शपथ ????
मी - कुणाची ???
ती - जिच्या वर जास्त जीव आहे
मी - तूच माझा जीव आहेस तुझी घेवू ??
ती - मला माहित आहे तू कधी खोटे नाही बोलणार ??
तरी ही शपथ घ्यायला लावली होती. अशी किती तरी वेळा घे आईची शपथ???
तिच्या शपथ खाण्याच्या वेळेला बरे कळाले तिला मी खोटे नाही बोलत ते???😁😁😁😁😁
परत एक नवीन मेसेज तिचा
ती - तुला नाही वाटत ?? आपली फॅमिली आपल्या लग्नाला हो म्हणणार नाही????
मी - मग काय झाले ??? प्रेम आहे ना माझ्या वर??
ती - खूप तुझ्या साठी काही करू शकते.
माझा दोन दिवस फोन नव्हता घेतला जिने ती सांगत होती काही करू शकते.😁😁😁💐
मी - बघ वेळ आली ना आपण पळून लग्न करू. वेगळे राहू एकदा लग्न झाले ना घरातले सर्व सरळ होतात.
ती - तसे नाही रे?? पळून नाही करायचे काही झाले तरी.
मी - तू तर म्हणालीस काही करू शकते.
ती - म्हणून काय पळून जायचे??
मी - पळून नको मग चालत चल कोर्टात.😀😀😀😀😀
ती - बघ मस्करी नाही रे??? भिती वाटते घरची.
मी - शॉपिंग मुव्ही हॉटेलं लॉज तेव्हा भिती नाही वाटली.
ती - what do you mean????
मी - लग्नाची परवा शपथ काय घेतली आपण तू दोन दिवस फोन माझा बंद करून बसली आहेस ना कॉल ना रिप्लाय???
आजुन तुला आता भिती वाटतेय???,😁😁😰😰😰😰
ती - शपथ मी घेतली नव्हती तू घेतली होतीस. शॉपिंग मुव्ही हॉटेल लॉज काय सांगतोस??? मी कधी जबरदस्ती केली नव्हती???
मी - अच्छा म्हणजे ती माझी जबरदस्ती होती.???
दिवस भर मेसेजेस ILU , Miss You , जानू , बाबू पिल्लू जे करत होतीस ही पण माझी जबरदस्ती होती????
माझ्या आईला ३-४ वेळेस भेटलीस ती ही माझी जबरदस्ती होती. तुझ्या हातावर माझ्या नावाचे जे टॅट्टयू काढलेस मला surprise करायला ती ही माझी जबरदस्ती होती???
ती - आज त्या टॅट्टयूचा जास्त प्रमाणात पच्छाताप आहे.
मी - कशाला जास्त पच्छाताप करतेस माझ्याच नावाचा शोध कुणी तरी परत...
ती - तुझ्या नावाशीच नफरत झाली आहे.
मी - कशाला फिल्मी डायलॉग मारतेस??? सरळ सांग आधीच बघितला आहेस मला आधीच कल्पना आली होती😁😁😁😁
ती - तुला कल्पना आली होती आणि तुझे प्रताप मला माहित नाही काय??? पूजाचा प्रपोज तुला काय वाटले मला माहित नाही दर्शना मला कधीच सांगून मोकळी झाली आहे. अर्चना मला माहीत नाही तू तिला लाईक करतोस सर्व ग्रुप मध्ये माहित आहे.
तिने काय आता समीर सोबत ब्रेक अप केले आहे मोकळे आहे रान तुला
तिची म्हणून कीव आली असेल???
मी - तुला जे समजायचे आहे ते समज मी इतके समजलो प्रणय ना?????
आता तुला काय वाटले ग्रुप मधी मला नाही समजत काही??? वेडा आहे मी ????
असेन ही कदाचित तुझ्या सारख्या भटक भवानी सोबत जो लग्नाचा विचार केला.😀😀😀😀
ती - तोंड सांभाळून बोल तुझी काय लग्नाची बायको नाही आहे ऐकुन घ्यायला???
मी - आहे लायकी बायको बनायची????😀😀😀😀
ती - जीची लायकी आहेना तिला ऐकव मला नको???
घरी आता सर्व झोपलेत नाही तर फोन करून चांगल्या शब्दात सांगितले असते.
मी - तू सांगितले असतेस आणि मी ऐकले असते???
ती - तू जे काही दिलेस ना गिफ्ट उद्या परत करते
तू तुझा मी माझी समजले ???
मी - मला गिफ्ट ही नको आणि तुझे तोंड ही दाखवू नको माझा तुझा कायमचा सबंध तुटला समजले ????
ती - तू कोण तोडणार ??? मीच तोडते मला call Messages करायचे नाही.
मी - आडलयं माझं खेटर...
ती - तू इतका नालायक असाशिल मला कल्पना नव्हती???
मी - तुझ्यात नालायक पना निर्लज्जपणा कमी आहे का???
आणि एका नालायक सोबतच काढलेस ना वर्ष?????😁😁😁😁
बस तिने block केले मला... फेसबुक ट्विटर सर्वच सोशल साईट वरून unfriend केले.
यार फ्रेंड ग्रुप मधील चढावा चढवीत फुकट ब्रेक अप झाले. काही अर्थ होता का???
हल्ली तसे ही आपल्याला बूवा एका वर्षा नंतर ब्रेक अपची सवय झाली आहे. 😁😁😁😁😁😁
मस्त त्या रात्री सर्व सोशल साईट वर सिंगल स्टेटस ठेवून मस्त झोपून गेलो. 😁😁😁😁😁
सकाळी जाग आली. What's App वर पूजा आणि अर्चानाचा मेसेजेस
" तुझा ब्रेक अप झाला????
काय स्ट्रोंग सोर्स आहेत यार ह्यांचे?????
रात्री २.३० ब्रेक अप झाला माझा सकाळी चार ला त्यांचा मेसेज.😁😁😁😁😁
आता थोडा पंचाईत आहे मी पूजाच्या मेसेज ला रिप्लाय देवू की???
अर्चनाच्या ????🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कृपया तुमच्या सल्ल्याची गरज आहे.
आणि नक्की कळवा कसा होता हा??? काल्पनिक ब्रेक अप????😀😀😀😀😀😀
