Nikita Gavli

Horror Thriller

4.9  

Nikita Gavli

Horror Thriller

भुताची पंगत - भाग 2

भुताची पंगत - भाग 2

4 mins
432


भाग-२

आणि स्वातीने झपाझप पावलं टाकत आधि तिच्या आईची म्हणजेच आदर्शच्या आजीची खोली गाठली. अचानक अशा अवेळी ही दोघं इथे काय करत आहे? आदर्श तर शेतात गेला होता, मग अचानक इथे कसा? या सगळ्या प्रश्नांच्या भोंग्याचा आवाज आजींच्या मनात काळजीचं वादळ उभ करत होता . 

 

आजी- "अगं स्वाती तुम्ही दोघं अत्ता हिथ काय करताय? अणं आदर्श हिथ कसा?, समद ठिक हायं ना?" 

 

 स्वाती- "माझी तर मतीचं गुंग झालीये? काय चाल्लय काहीचं कळत नाहीये,"  

 

आजी- "अगं काय कळल असं सांगशील का? आदर्श तु सांग, तु हित कसा?"

 

आदर्शने आजींना घडला सगळा प्रकार अगदी सविस्तर सांगितला. स्वाती हे सगळं एैकुन घाबरली होती पण आजींना हा सर्व प्रकार काय आहे हे माहित होतं, त्या मुळे त्या घाबरल्या नाही तर त्यांनी अगदी शांतपणे परीस्थिती संभाळतं दोघांना ही खोलीत झोपायला जायला सांगितलं.

 

विठाम्हतारीचं नेमक प्रकरण स्वातीला माहित नव्हतं, पण हो लग्नाआधी जेवढे दिवस ती माहेरी होती, तोवर विठाम्हतारी बाबत घडणारे प्रकार, गावात घडणार्या, विश्वास न बसणार्या, विचीत्र गोष्टी तीला माहित होत्या. म्हणुन ति लगबगिने आदर्शला त्याच्या खोलीत घेऊन जायला लागली, पण आदर्श काय एैकायला तयार नव्हता. 'माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्या शिवाय मि झोपणार नाही' असा सुर धरून बसला.

 

अखेर त्याच्या हट्टापुढे आजींनी हार मारली. त्यांनी आदर्शला विठाम्हतारीचं सगळं प्रकरण सांगायला सुरवात केली…..

 

आजी- "लै वरश्या पुर्वी आपल्या गावात भुत रहायची. अमावस्याच्या रातीला त्यांची मिरवणुक निघायची. ति भुत कुणालाचं दिसायची न्हाय. दिसायच्या त्या फकस्त मशाली. त्याबी हवत तंरगलेल्या. दिसताना असं दिसायचं कि फकस्त हवतं मशाली चाल्यातं. पर खरतर त्या समद्या मशाली भुतं हातात घीवुन चालायची. दर अमावस्येला त्यांची ही मिरवणुक निघायची. समद्या गावाला येडा मारुन त्यांची मिरवणुक गावाबाहिरल्या वरल्या माळावं जाउन थांबायची. तिथं त्यांची पंगत बसायची.


 ते दर पंगतीला गावतल्या एका माणसाला पंगतीचं आवतान द्यायची. त्यांना ज्याला आवतान द्यायचं असणं, त्याच्या घरा बाहिर अमावस्येच्या दोन दिस आधि, राती एक पेटती मशाल ठुवायचे. अनं संगट एक ताट बी ठुवायचे. तेच ताट घ्येवुन त्या माणसान पंगतीला जायाचं. ज्याच्या दारा बाहिर ती मशाल अनं ताट असनं त्यान समजायचं कि आज त्याच्या घरातल्या माणसाला आवताना हाय. ज्याला ति आवतन मान्य असणं, त्यानं ति मशाल विजवायची नि ते ताट घरात घ्यायाच. जो ती मशाल विजवुन ताट घरात घीन त्यान ति आवतान स्विाकारलं असं पक्क व्हायाचं.

 पंगतीला जायचं द्वान नियमं व्हती. पैल म्हणजी, जवर ती भुत जेवत्यात तवर आपण बी जेवत रहायचं. पंगतीतनं मदनच उठायचं न्हाय. अणं दुसर म्हणी, भुतं जेवड वाडतील तवड सगळ खायाचं. नाय म्हणला त्यो तिथंच संपलाच म्हणुन समजा. जसजशी लोकसंख्या वाढाय लागली तसतशी भुतं बि कमि व्हत गेली नी मग संपली. अता न्हायती भुतं गावात."

 

आदर्श अवाकच झाला. आजच्या काळातला, नव्या विचारांच्यां पिढीतला तरूण असलेल्या आदर्शचा या सगळ्या गोष्टींवर अजिबातचं विश्वास बसतं नव्हता. 

 

आदर्श- "चलं, आजी उगिचचं मला कटवायला काहीही सांगु नकोस."

 

आजी- "मला वाटलचं व्हतं. म्हणुन तर म्या काय सांगत नव्हते. तुमचा आजच्या पिढीचा यावं विश्वास नसणार, पर हि समदं खरं हायं. "

 

आदर्श- "बरं ठिक आहे. तु सांगतेस म्हणुन मि तुझ्या या भुताच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण मग याचा विठाम्हतारीशी काय संबंध? विठाम्हतारी कोण आहे?"

 

आजी- "सांगते. विठाम्हतारी नी तिचा नवरा आपल्याच गावात रहायची. दर अमावस्येला जस गावातल्या एका माणसाला पंगतीचं आवतान असायचं तसचं एक दिस ते आवतान विठाम्हतारीला आलं. भुताच्या भितीनं अनं त्यांच्या त्या ईचीत्र नियमामुळं ति आवतनं गावातला कुणीचं स्विकारायचं न्हायं. पर विठाम्हतारी लै धिटं व्हती. तिच्या येवढ धाडसी आख्या गावात कुणीबी नव्हतं. तिनं ती अवतान स्विकारलं. समद्या गावात एकच चर्चा, विठाम्हतारीनं आवातान नव्हत स्विकाराय पायजी व्हतं. अता म्हतारी कसं काय टिकणार त्या पंगतीत. अता ति भुत कवर खात बसत्यात कुणाच ठावं. भुत वाढलं तवढं म्हतारीला खाता इल का?"   

 

आदर्श हे सगळ अगदी मन लावुन एैकत होती. अता त्याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. आजी भुताच्या पंगतीची जी गोष्ट सांगत होती, त्यावर तर त्याचा विश्वास बसतं नव्हता, पण इथे प्रश्न विठाम्हतारीचा होता. तो स्वत: तीला भेटला होता, म्हणुन विठाम्हतारीची गोष्ट एैकण्यात आदर्शचा रस वाटत गेला.

 

आदर्श- "मगं, म्हतारी खरचं गेली पंगतीला?"

 

आजी- "व्हय मंग. एकदा आवतान स्विकारलं म्हणजी स्विकारलं. पंगतीला जावचं लागतं व्हतं. आवतान स्विकारुन जी पंगतीला येत नव्हतं त्याचा जीव भुत घेत व्हती."

 

आदर्श- "बापरे! म्हतारी भारीच डेरींगबाज होती म्हणजे. पण मग पुढे काय झालं? पंगतीत म्हतारीला किती जेवण वाढलं होत? आणि अता पंगतीला जायचयं हे म्हतारीला कसं कळलं."

 

आजी- "त्या राती हि कोडं समद्या गावाला पडलं व्हत. तवा तिला गावातल्या लोकांनी विचारलं बि व्हतं. तर ति म्हणाली, अता भुतानं आवतान दिलयंनावं , मग पंगतीला कवा जायाचं तीबी तेचं सांगत्याल कसं सांगायचं तसं. अमावस्येच्या राती, अंधार पडला की तवाच लोक जेवान करुन दार खिडक्या लावुन झापी जायाची. त्या रातीबी तसचं झालं. अंधार पडल्या पडल्या सारं गावं गुडुप. त्या राती म्हतारीचं कसं व्हईन या विचारानं सारं गावं भिल व्हतं. रात्र झाली. समद्या गावाला कवा एकदा सकाळ व्हती नी म्हतारी कडं जातो असं झालतं. म्हतारी पंगतीला गेली असणं का? गेली असणं तर ति ताटातलं समद खाईन का? अणं जर न्हायं खाल्ल तर भुतं तिला मारून टाकत्याल. उंद्याच्याला सकाळी म्हतारी भेटती का तिचं मडं, कायं बि कळतं नव्हतं. शेवटी सकाळ झाली. जसा दिस उजाडला तसा सारा गाव म्हतारीच्या घराबाहिर जमा झाला. तवा हनम्या नावचा येका पोरानं म्हतारीचं कवाड वाजीवलं."

 

आदर्श- "मगं पुढे काय झालं? म्हतारीने दार उघडलं? ती होती घरी?

(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror