मिनुचे ६५टक्के
मिनुचे ६५टक्के
अखेर तो दिवस आला, ज्याची मिनु मनापासुन वाट पाहत होती. तो दिवस म्हणजे, मिनुचा दहावीचा निकाल. मिनुने वर्षभर तीला हवा तेवढाच आणि तिला हवा तसाच अभ्यास केला होता. त्यामुळे साधारता कोणत्या विषयात किती गुण मिळतील, याचा मिनुला अंदाज होता. ‘आपण केलेल्या अभ्यासाच्या जोरावर, आपण नक्कीच पास होऊ’, याची मिनुला खात्री होती. आपला अंदाज कितपत खरा ठरतो, हे पाहण्याची मिनुची उत्सुकता वाढत होती.
मिनुचा निकाल येणार त्या दिवशी मिनुचे बाबा माधवराव, हे त्यांचे मावसभाऊ हेमंतराव ह्यांच्या घरी म्हणजेच गावी, काही कारणत्सव गेले होते. तेथे हेमंतरावांच्या आई, सौ, व कन्या-रेवती असे सर्वच कुटुंब होते. रेवती हि मिनु पेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. रेवतीनेही दहावीची परीक्षा दिली होती. तिचा काही अनुभव तिच्या सोबत होता. रेवती आणि माधवराव ह्यांच्या मध्ये चर्चा झाली. उत्सुकता म्हणुन रेवतीने माधवरावांना विचारलं, “काका, तुम्हाला काय वाटतं मिनुला किती टक्के मिळतील?” यावर माधवराव म्हणाले, “किती टक्के मिळतील हे काय मला सांगता नाही येणार, पण मिनुला ७०टक्यांच्या आसपास मिळावेत अशी माझी इच्छा आहे.”
निकालाची वेळ झाली व मिनुने तिचा निकाल इंटरनेट वर पाहिला. अमुक अमुक विषयात तमुक तमुक गुण मिळतील, हा मिनुचा अंदाज खरा ठरला. मिनुला जेवढे वाटले, साधारता तेवढे तिला सगळ्याच विषयात गुण मिळाले होते. मिनुचा निकाल ६५टक्के इतका आला होता. मिनु खुष होती, समाधानी होती. कारण मिनुला माहित होते, ते ६५ टक्के तिच्या हक्काचे, कष्टाचे होते. तिने कोणाचीही उत्तरपत्रिका पाहुण, उत्तरे लिहीली नव्हती. मिनुने, तिला जेवढे येते तेवढे, अगदी प्रामाणिकपणे लिहित दहावीची परीक्षा दिली होती.
मिनुने निकाल पाहिल्यानंतर, सर्वात पहिले माधवरावांना सांगितले. ‘७०टक्यांच्या आसपास गुण मिळावेत’, हि माधवरावांची इच्छा मिनुने पुर्ण केली होती. माधवरावांनाही आनंद झाला होता. माधवरावांनी मिनुचे कौतुक केले व ‘आपण हेमंतरावांना घेऊन घरी येणार असल्याचे सांगितले.’
पुढे माधवराव २दिवसांनी हेमंतरावांना घेऊन घरी आले. हेमंतरावांनी पाहुणचार घेतला. जेवण झाल्यानंतर मिनु, माधवराव, हेमंतराव हे निवांतपणा म्हणुन, गच्चीवर गप्पा मारायला गेले. बोलता बोलता विषय निघाला, तो मिनुच्या पुढील शिक्षणाचा. मिनु तिला पुढे काय करायचे आहे?, याबद्दल माधवरावांना सांगत होती. माधवरावही तिला काही सुचना देत होते. तेव्हा हेमंतरावांनी मिनुला विचारले, “मिनु, तुला किती टक्के मिळाले दहावीत?” “काका मला ६५% मिळाले.” मिनुने उत्तर दिले. त्यावर हेमंतराव मिनुला म्हणाले, “अगं, तुझ्या वडिलांना तुझ्याकडून ७०-७५ टक्यांची अपेक्षा होती. तुला तर फक्त ६५च टक्के मिळाले. याचाच अर्थ तुझ्यासाठी तुझ्या वडिलांची, त्यांच्या इच्छा, अपेक्षा ह्यांची किंमत शुन्य आहे, हेच सिद्ध होते.” पुढे हेमंतराव मिनुला म्हणाले, “माझ्या रेवतीला १०वीत ७२% मिळाले होते. मि सगळ्या गावात, खव्याचे ५किलो पेढे वाटले होते. अता तुझे हे ६५% घेऊन तुझे वडिल कोणाला पेढे वाटायला जाणार आहे?”
मिनुला हे सगळे ऐकुन अजिबात वाईट वाटले नाही, तर तिला त्यांच्या बोलण्याचा राग आला होता. तरीही मोठे म्हणुन मिनुने त्यांना, कोणतेही उलट उत्तर दिले नाही आणि त्यांचे म्हणने, फार काळ मनाला न लावता, सोडुन दिले. परंतु हेमंतरावांच्या बोलण्याचा, माधवरावांवरती काहीसा परीणाम झाला होता. ‘रेवतीला ७२% आणि मिनुला फक्त ६५%,’ याचा माधवरावांना कुठेतरी कमीपणा वाटत होता. हि बाब मिनुच्या लक्षात आली व मिनुला या गोष्टीचे वाईट वाटले. परंतु काही दिवसांनी माधवरावांचा राग निवळला व दोघांमधील गैरसमज दूर झाले.
पुढे मिनुने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मनासारखा अभ्यास करत, मिनु १२वी उर्त्तीण झाली. सुट्यांमध्ये रेवती मिनुकडे आली होती. तेव्हा रेवती तिचा १०वीचा अनुभव सांगत होती. याच चर्चासत्रामध्ये रेवतीने तिच्याच तोंडून एक धक्कादायक खुलासा केला, ज्याने मिनुला तिच्या ६५टक्कयांचा अभिमान वाटत होता.
रेवतीने सांगितले, तिने ज्या शाळेतुन १० वीची परीक्षा दिली, त्या शाळेला सरकारी अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. आणि तो मिळावा, यासाठी त्या शाळेला सलग ५ वर्ष १००% निकाल लावणे, बंधनकारक होते. म्हणुन परीक्षेस बसलेल्या सगळ्या मुलांना, परीक्षेत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सांगितली जात होती. याचाच अर्थ हेमंतरावांनी रेवतीला किती टक्के मिळाले हे सांगितले, पण तिला ते ७२% कसे मिळाले हे त्यांनी सांगितले नाही. मिनुने हि गोष्ट लगेचच माधवरावांना सांगितली. हे ऐकुन माधवरावांना वाईट वाटले, ‘इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वत:च्या मुलांवरती विश्वास ठेवावा’ हे माधवरावांना पटले. पुढे माधवरावांनी कधीच मिनुच्या अभ्यासावरती, गुणांवरती संशय घेतला नाही व तिला नेहमिच पाठींबा दिला.