Nikita Gavli

Inspirational

4.8  

Nikita Gavli

Inspirational

जिद्द- देशसेवेची

जिद्द- देशसेवेची

3 mins
294


१० ऑगस्ट. स्वातंत्रदिनाला अवघे काहीच दिवस बाकि होते. संपुर्ण देशात उत्साहाचं वातावरणं होतं. सारे भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघण्यासाठी अगदी सज्ज होते. अवघ्या भारतभर स्वातंत्रदिनाची जय्यत तयारी सुरू होती. सारे भारतीय स्वातंत्रदिन साजरा करण्यात व्यस्थ होते आणि आम्ही सगळे सिमेवर स्वातंत्रदिनाच्या उत्सवात कसलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालुन सिमेवर गस्त देत होतो. कारण १५ ऑगस्टचे निमित्त साधुन दहशतवादी हल्ला होणार असल्याची गुप्त खबर आम्हाला मिळली होती.

 

सिमेवर कडक बंदोबस्त होता. आम्ही सर्वच आमचे कर्तव्य चोख बजावत होतो. स्वातंत्रदिनाचा उत्सव व्यवस्थित पार पडावा यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो. कोणी चितपाखरूही आमच्या परवानगी शिवाय सिमा ओलांडु शकणार नाही अशी सोयचं आम्ही करून ठेवली होती. आम्ही सगळे कॅप्टन अर्जुन राणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्या दिवशी अर्जुन सर स्वत: सिमेवर आमच्या सोबत गस्त देत होते. सगळीकडे निरव शांतता होती. साधारण रात्रीचे दहा वाजले असतील. 

 

 तेव्हाचं अचानक अर्जुन सर केवढ्याने तरी ओरडले. पोटावर हात ठेवुन ते कळवळतं होते. काही दिवसांपासुनचं त्यांची तब्येत काहीशी बरी नसल्याचा संशय आम्हा सर्वांना आलाच होता. पण सर त्यावर काहीचं बोलायला तयार नव्हते. आम्ही त्यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे सरांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. डॉक्टरांनी अर्जुन सरांच्या आणखी काही चाचण्या केल्या, आणि औषध घेऊन सरांना आराम करायला सांगितला. सरांना कॅम्प मध्ये सोडुन आम्ही पुन्हा गस्तीवर गेलो. 

 

दुसरा दिवस उजाडला. अर्जुन सर नेहमि प्रमाणे सर्वांच्या अगोदर उठुन, व्यायाम करुन, गस्तीवर जायला तयार झाले. आम्ही बघुन अवाकचं झालो. काल रात्री तर त्यांना पोटात प्रचंड वेदना होत होत्या, त्यांना डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्यास सांगितलं होतं आणि सरांचा दिनक्रम नेहमि प्रमाणे सुरू देखील झाला होता. पुढचे तीन दिवसं हे असचं सुरू होतं. सरांना त्रास होत होता परंतु तरीही ते त्यांच काम चोख बजावतं होते. १४ ऑगस्टला सरांच्या चाचण्याचे रीपोर्ट येणार होते. तो पर्यंत आराम करायला सांगितला असुन देखील, सरांनी त्यांच्या सेवेत कसलाही खंड पडु दिला नाही. आम्ही सर्वच सरांच्या या जिद्दीमुळे प्रभावित झालो होतो. 

 

अखेर सरांचे रीपोर्ट आले. त्यातुन एक धक्कादायक खुलासा झाला. ज्याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. सरांना डॉक्टरांनी बोलावुन घेतलं. सरांना चौथ्या स्टेजचा हाडांचा कॅन्सर झाला होता. परीस्थिती हाताबाहेर गेली होती. सरांकडे फार कमि वेळ उरला होता. 

 

त्यांना वरीष्ठांकडुन बोलावनं आलं. त्यांनी त्यांच्याकडे उरलेला वेळ त्यांच्या कुटुंबीयांसोबत घालवावा असं सुचवलं. पण पुढे सरांनी जे काही उत्तर दिले त्यांनी सार्यांच्याच मनात सरांबद्दलचा आदर आणखीनच वाढला. 

 

सर म्हणाले, "इथे माझा देश संकटात असताना मि पळपुट्यासारखा पळ काढु. माफ करा सरं. हे मला जमणार नाही. या आजारा समोर झुकुन मरण्यापेक्षा, उद्या येणार्या त्या दहशत वाद्यांना मारून मग मरणं पसंत करेन मि. माझं लहानपणापासुन एकचं स्वप्न होतं. तिरंग्यात लपेटुन जाण्याचं. पुर्व कॅप्टन अर्जुन राणे म्हणुन तिरंग्यात लपेटण्यापेक्षा, शहीद कॅप्टन अर्जुन राणे म्हणुन तिरंग्यात लपेटुन जाण्यास मला जास्त आनंद होईल. आणि राहताराहीला प्रश्न शेवटचे दिवस कुटुंबासोबत घालवण्याचा, माझ्या कुटुंबाला माझा हा निर्णय एैकुन नक्कीच अभिमान वाटेल याची मला खात्री आहे." वरीष्ठांना सेल्युट करुन सर पुन्हा गस्तीवर गेले. 

 

सरांनी शेवटी स्वत:चा हट्ट पुर्ण केला. मिळालेल्या गुप्त खबरीनुसार १५ ऑगस्टला दहशतवादी हल्ला झाला. सरांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. सार्यांच्याच प्रयत्नातुन तब्बल पाच तासांनी दहशतवादी हल्ला परतवुन लावण्यात आम्हाला यश आले आणि पर्यायाने देशाला वाचवण्यात. त्यातचं सरांना फार थकवा आला. सरांची तब्येत फार ढासळली. देशाची सेवा करताना स्वातंत्रदिनाच्या दिवशी सरांना विरमरण आलं. सरांचं तिरंग्यात लपेटुन जाण्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्याच शैलीत पुर्ण करून घेतलं. पाणवल्या नैनांनी सार्यांनीच सरांना निरोप दिला. सर आम्हा सर्वांसाठी कायमचं आदर्श राहीले……  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational