Nikita Gavli

Others

4.0  

Nikita Gavli

Others

सुरूवात: एक विलक्षण प्रवास

सुरूवात: एक विलक्षण प्रवास

5 mins
904


शाळेतून कॉलेजला जाताना प्रत्येकालाच उत्सुकता असते. एका नवीन विश्वात प्रवेश करण्यासाठी सगळेच आतुर असतात. सगळा नुसता आनंदी आनंद. प्रत्येकाकडून फार जय्यत तयारी सुरू होते त्या दिवसाची. मी ही केली होती. नवीन पुस्तके, वह्या आणि बरंच काही. उद्या कॉलेजचा पहिला दिवस. मनात एक अनामिक हुरहूर होती. माझा कॉलेजचा पहिला दिवस कसा असेल, याच विचारात मी झोपी गेले.   


“सुधा, अगं आवरलं का नाही तुझ. कॉलेजचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी उशीर करणार आहेस का?” आईचे हे वाक्य संपते न संपते, तोच मी तिच्या पुढ्यात जाऊन उभी राहिले. ते ही कॉलेजसाठी तयार होऊन. त्या दिवशी मी एक नवी सुरूवात करतं, नव्याने भरारी घेण्यास खूप उत्सुक होते. देवाचे आणि आई-बाबांचे आशिर्वाद घेऊन मी कॉलेजच्या रंगबिरंगी दुनियेत माझं पहिलं पाऊल ठेवलं.  


पण मला वाटलं त्यापेक्षा ती दुनिया खूप वेगळी होती. कॉलेजच्या त्या अफाट विश्वात मी स्वत:लाच शोधत होते. सगळ्या मुली छान फॅशनेबल कपडे, स्टायलीश चप्पल असं सगळं घालून, अश्या नटून आलेल्या जणू काही एखाद्या मोठ्या समारंभाची शोभा वाढवण्याचे काम त्यांना मिळाले आहे. तेव्हा मी स्वत:कडे पाहिलं, साधा पंजाबी ड्रेस, हातात घड्याळ, केसांची सुरेख वेणी, पायात कोल्हापुरी चप्पल. त्या फॅशन करणाऱ्या मुलींच्या तुलनेत, मी कुठे ना कुठे स्वत:ला कमी समजू लागले होते. मन थोडं सैरभैर होऊ पाहत होतं. वरून बाबांची सक्त ताकीद होती, “मन हे अभ्यासातच रमलं पाहिजे, वेळ वाया जाईल अश्या गोष्टींमध्ये नाही.


मी आपलं माझं मन अभ्यासात, माझे छंद जोपासण्यात रमवायचं ठरवलं. गुरूपोर्णिमा काही दिवसांवरचं होती. सगळेच शिक्षकांना काही ना काही देणार होते. आपणही काही तरी दिलं पाहिजे असं मला वाटलं. पण काय द्याव? सगळे देतात तसं पेन, गुलाबाचं फुल यातलं मला काहीच द्यायचं नव्हतं. मला माझ्या शिक्षकांना असं काहीतरी द्यायचं होतं, जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. असं काहीतरी जे कायम त्यांच्या हृदयाजवळ राहील.


तेव्हाच एक दिवस गणिताचा तास सुरू होऊन दहा मिनिटे झाली, तरीही तासावर शिक्षक आले नव्हते. मग वेळेचा सदुपयोग करत मी गुरूपोर्णिमेनिमित्त काही सुचतंय का पहावं म्हणलं. मी माझ्या बॅगमधून एक वही आणि पेन बाहेर काढला. थोडा विचार केला. मला स्वत:ला माझ्या गुरूंबद्दल काय वाटतं? मला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ‍ते अगदी आत्तापर्यंत माझ्या गुरूंबद्दल काय अनुभव आले आहेत?, असा प्रश्न मी स्वत:ला विचारला. सुरात सूर मिसळून जसं एखादं सुंदर गाणं तयार व्हावं तसं माझ्या लेखणीतून एक एक शब्द बाहेर पडत होते. र ला र जुळवत ट ला ट जुळवत पण तेवढ्याच शुद्ध भावनेने, मी अगदी मनापासून शब्दांची सांगड घालत कविता लिहू लागले.

‘गुरू म्हणजे उन्हात सावली,

आईची जागा जर कोणी घेऊ शकत असेल

तर, ती ही आहे माऊली….’

   

माझ्या मनातले भाव कागदावरील रिकामी जागा शब्दरुपी मोत्यांनी अगदी व्यापुन टाकत होते. असं करत मि साधारणत: तिन कडवे लिहीली. छान तंद्री लागली होती माझी, अगदी एखाद्या समाधीस्त साधु सारखी. त्यात तास संपल्याची घंटा कधी वाजली ते ही माझ्या ध्यानात आले नाही. पुढच्या तासाचे शिक्षक वर्गात आले तसं मि घाई गडबडीत ती वही बॅगेत ठेवून दिली.

नंतर एका पाठोपाठ सगळे तास होत गेले. घरी गेल्यावर राहीलेली कविता पुर्ण करावी म्हणलं, तर घरी बाबांचे मित्र अचानक घरी जेवायला आले होते. तेही सहकुटुंब सहपरीवार. मग काय. आईला मदत करण्यात सारा वेळ निघुन गेला आणि मला माझी कविता पुर्ण करायला वेळचं नाही मिळाला.


सुर्याने नभात विविध रंगांची मुक्त उधळण करतं एका सुंदर दिवसाची रम्य सुरूवात केली होती. मन अगदी प्रसन्न झाले ते चित्र पाहुन. ‘आज काहीही झाले तरी कविता पुर्ण करायचीच’ हा र्निधार मनाशी घट्ट करत मि कॉलेजला निघुन गेले. कॉलेजमध्ये पोहचल्या नंतर कळाल, कि आज बस आणि रिक्षा यांचा संप आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी गैरहजर होते.

आता मोजक्याच विद्यार्थांमध्ये कशीकाय ज्ञानाची उधळण करायची? असा प्रश्न शिक्षकांना पडला. मग त्यांनी पाच ते सहा वर्गातील जेवढे विद्यार्थी आले आहेत, त्या सगळ्यांना एकाच वर्गात बसवत वेगवेगळे खेळ घेण्याचा निर्णय घेतला.

“झालं, आता येवढी सगळी मंडळी, मज्जा मस्ती साठी एकत्र जमणार म्हणजे पुरता गोंधळ असणार. आणि अशात कविता लिहायची म्हणलं तर कवितेचे तिन तेरा वाजलेच म्हणुन समजा.” असं स्वत:शीच बडबडतं मि कविता पुर्ण कराचा बेत रद्द करत, आयोजीत खेळांचा आनंद लुटायचा ठरवलं.


तेव्हा पहिलाच खेळ असा काही आला, ज्याने माझ्या कविता रचण्याच्या छंदाला त्याचे पंख पसरून आकाशी उंचच उंच झेप घेण्याची मुभाच देऊन टाकली. तिथुनच माझ्या आयुष्याने एक वेगळीच पण सकारत्मक कलाटणी घेतली. तो खेळ असा होता कि, दहा ते पंधरा जणांचा एक संघ करायचा. संघातील एक व्यक्ती त्या संघाचा प्रतिनीधी म्हणुन समोर येईल व त्याने समोर ठेवलेल्या चिठ्यांमधील कोणतीही एक चिठ्ठी उचलायची. प्रत्येक चिठ्ठीत एक शब्द लिहिला असेल. पुर्ण संघाने विचार करुन त्या शब्दाला अनुसरून काही वाक्य सुचवायची. नंतर प्रत्येक संघाचा प्रतिनीधी एक एक करत पुढे येईल व संघाने सुचवलेली वाक्य बोलेल. जो संघ सगळ्यात जास्त वाक्य बोलेल, तो संघ विजयी संघ म्हणुन घोषित होणार होता.


पूर्ण वर्गासमोर जाऊन बोलायचे, या भितीने माझ्या संघातील कोणीच प्रतिनीधी बनायला तयार होईना. म्हणुन मग मिच पुढे जाऊन एक चिठ्ठी घेऊन आले, तसे काही जणं, “हि पंजाबी ड्रेस काय बोलणार”, म्हणतं हसायला लागले. थोड वाईट वाटलं मला. पण मि नाही मनावरं घेतलं. मि त्या टवाळ मुलांकडे लक्ष न देत चिठ्ठी उघडली, तशी मि खुष झाले. मला झालेला आनंद माझ्या डोळ्यात दिसतंही असावा कदाचीत. तो शब्द होता ‘कविता’.


“हा काय शब्द आहे? आवर कोण कसं बोलणार” म्हणतं माझ्या सगळ्या संघाने जरा नाराजी व्यक्त केली. “सुधा, तु उचललीस ना चिठ्ठी. मगं अता तुच ठरव, काय बोलासचं ते.” असं म्हणतं सगळ्यांनीच माघार घेतली. मि मात्र फार म्हणजे फार खुष झाले. आपली गुरूंवरची कविता जेवढी पुर्ण झाली आहे तेवढी म्हणुयात. म्हणजे शिक्षकांचे आपल्या लेखनी बद्दल काय मत आहे याचा अंदाज येईल. नंतर एखदी नविन कविता रचुन, त्यांना स्वच्छ सुंदर अक्षरात लिहुन देता येईल. असा विचार मि केला आणि माझं नाव पुकारल्या नंतर मि पुढे गेले.


मी कवितेबद्दल थोडक्यात सांगत, माझी कविता सुरू केली. एक कडवं संपलं तोच “वाह, क्या बात है” असे कौतुकाचे शब्द माझ्या शिक्षकांच्या तोंडुन बाहेर पडले. हि पंजाबी ड्रेस काय बोलणार. असं बोलणारर्यांची बोलतीच बंद झाली. पुर्ण वर्गात टाळ्यांचा नुसता कलकलाट सुरू होता. टाळ्यांचा आवाज थांबल्यावर मि पुढचं कडवं म्हणायला घेतल, तेवढ्यात माझ्या संघाला मिळालेला वेळ संपला. मि माझ्या जाग्यावर बसायला निघाले खरी पण सगळ्यांनीच कविता पुर्ण करण्याचा आग्रह धरला. “तसंही कविता पुर्ण झालेली नाही” असं सांगुनही शिक्षकांनी आग्रह धरला. कदाचीत माझ्या लेखनीतुन माझ्या मनातील जे भावा अवतरले होते, ते शिक्षकांच्या मनापर्यंत पोहचले असावे.


मी माझी कविता पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवली, तसा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सर्वांकडून माझ्या अर्धवट कवितेस उत्तम दाद मिळाली. ज्यांच्यासाठी म्हणून कविता लिहिली होती, त्या सर्व शिक्षकांकडून तोंड भरून कौतुक झाले.

या आभासी दुनियेत, आपण कपड्यांच्या फॅशन मध्ये माघे असलो तरी कला आणि कौशल्याच्या फॅशन मध्ये पुढे असल्याचे समाधान व्यक्त करत मि व्यासपिठाची रजा घेतली. तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला मला मि सापडण्याचा प्रवास. माझ्या शब्दांच्या जादुने सगळ्या शिक्षकांच्या मनात मला एक वेगळे स्थान निर्माण करून दिले. त्यानंतर कविता, वादविवाद, वकृत्व, कथा लेखन, कथा कथन, निबंध लेखन अश्या सर्वच स्पर्धांची माहिती आणि मार्गदर्शन मला माझ्या शिक्षकांकडून लाभले. यातूनच सुरु झाला माझा साहित्य क्षेत्रातील एक विलक्षण प्रवास.


Rate this content
Log in