भुताची पंगत -भाग 1
भुताची पंगत -भाग 1


"अय पोराSSS, हिकडं इ रं जरा."
"कोण हायस तु? गावात नवा दिसतुयास."
"हो. मि वरच्या आळीच्या नाना पाटील यांचा नातु. उन्हाळ्या सुट्टीला आलोय. आदर्श नाव आहे माझं."
"झ्याक नाव हाय की रं तुझं. घी ही बोरं घी. अत्ताच आणल्याती राणातनं तोडुन. ग्वाड हायती खायाला. घी."
"नको आजी. आईने सांगितलयं, अनोळखी व्यक्ती कडुन काहीही घ्यायच नाही."
"आरं घी रं. कायं न्हाय म्हणतं तुझी आय. तिला सांग विठा म्हातारीनं दिल्याती."
"बरं द्या. येतो मी."
आदर्श विठाम्हातारीने दिलेली बोरं घेऊन घरी निघाला. तो त्याच्या मामा आणि भावंडांसोबत, भुईचं अंथरूण आणि नभाचं पांघरुन करून झोपायची सवय नसताना भावंडांसोबत मस्ती करायला मिळेल म्हणुन शेतात झोपायला गेला. पहाटेची वेळ होती. थंड वारा सुटला होता. त्या काहीश्या बोचर्या थंडीने आर्दशची झोप मोड झाली, ती त्याला परत येईनाचं. आर्दश हा नुसताच दहावीची परीक्षा दिलेला, पंधरा-सोळा वर्षांचा अगदी लाडावलेला मुलगा. झोप येत नाही म्हणुन तो रडायला लागला. घरी आईकडे जायचा हट्ट करु लागला. त्याच्या मामाने त्याला खुप समजवायचा प्रयत्न केला. पण आर्दशचा रुद्र अवतार बघुन त्याच्या मामाने, त्यांच्या सालगड्याला त्याला मोटरसायकलवर घरी सोडुन यायला सांगितलं. सालगडी आदर्शला घेऊन घरी निघाला खरा, पण तेवढ्यात त्यांची गाडी बंद पडली. काही केल्या गाडी काय चालु होईना. आर्दशला उभ्या उभ्या झोप यायला लागली.
शेवटी आर्दशच म्हणाला, "काका ,असही घरं जवळचं आलयं. मि जातो एकटा तुम्ही जा परत शेतात."
सालगडी त्याला एकट्याला सोडायला तयार नव्हता, पण आर्दशने हट्ट केला आणि सकाळी लवकर तालुक्याला झेंडुची रोप आणायला जायचं होतं, म्हणुन सालगडी शेतात निघुन गेला.
पहाटेची काहीशी बोचरी थंडी, कानात घोंघणारा रातकिड्यांचा किर्र आवाज, कुत्रांच्या भुंकण्याचा आवाज, हे सगळ एैकुन, आपण भलतचं धाडस केल्याचं आर्दशच्या लक्ष्यात आलं. तेव्हा त्याने झपाझप पावलं टाकतं घराची वाट धरली.
तेव्हाचं त्याला वाटेत, विठाम्हतारी भेटली. तिने दिलेली बोरं घेऊन, आर्दशने पुन्हा घरची वाट धरली. पण थोडसचं पुढं गेल्यावर त्याला विठाम्हारीचे शब्द आठवले. तिने बोरं अत्ताच शेतातुन तोडुन आणली होती. पण तिच्या हातात कंदील किंवा टॉर्च यातलं काहीच नव्हत. मग तिला अंधारात बोरं दिसली कशी? आणि येवढ्या रात्री कोण शेतात बोरं तोडायला जातं? हे सगळ लक्षात येताच आर्दशने माघे वळुन बघितलं तर म्हतारी गायब. तिला आवज दिला तर ती हाकेला ओ देखील देईना. आर्दशला तर दरदरून घाम फुटला. त्याने आधी हातातली बोरं फेकुन दिली, आणि पळतचं घर गाठलं.
येवढ्या अंधारात घाबरतं आर्दश अचानक घरी आल्याने त्याची आई स्वातीही घाबरली. तिने आधी त्याला घरातं घेतलं. त्याला पाणी दिलं. त्याचा घाम आपल्या पदराने पुसला. आईचा स्पर्श होताचं आर्दश काहीसा शांत झाला. तेव्हा स्वातीने त्याला विचारलं, "असा अचानक एकटाच का आलासं?"
आर्दश- "आई, एकटा नाही मला त्या शेतातल्या काकाने सोडलं. मला झोप येत नव्हती. जवळचं त्यांची गाडी बंद पडली मगं मिच म्हणालो मि जातो घरी एकटा, म्हणुन ते गेले परत".
स्वाती- "ते ठिक आहे, पण तुला येवढा घाम का फुटलाय भुत बघितल्या सारखा?"
आर्दश- "खरं खोट माहित नाही, पण कदाचीत भुतचं बघितलं".
स्वाती- "म्हणजे. जरा निट सांग कायं झालं".
आर्दश- "अगं आई, ते शेतातले काका मला सोडुन गेल्या नंतर मि घराच्या दिशेने चालायला लागलो. तेव्हा मला एक आजी भेटल्या. त्या म्हणाल्या 'मि अत्ताच शेतातुन बोरं तोडुन आणलीतं. घे.' मि नको म्हणालो, तर त्या म्हणाल्या तुझ्या आईला माझं नाव सांग. ति तुला काही नाही बोलणारं. मग मि ति बोरं घेऊन निघालो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, कि त्यांच्या कडे कंदील नव्हतं मगं त्यांनी येवढ्या अंधारात बोरं कशी तोडली. मि तसचं माघे वळुन बघितलं तर त्या आजी गायब झालेल्या होत्या. मि खुप घाबरलो. तेव्हाच मला येवढा घाम फुटला. मग मि आधि ति बोरं फेकुन दिली आणि पळतचं घरी आलो."
एरवी स्वातीने विश्वास ठेवला नसता पण आज अमावस्या होती. आणि आर्दशकडे बघुन तो खोट बोलतोय असं वाटत नव्हतं.
स्वाती- "त्या आजींनी त्यांच नाव काय सांगितलं?"
आर्दश- "अंSSS विठाम्हतारी."
विठाम्हतारीचं नाव एैकुन स्वाती केवढ्याने तरी ओरडली. तिचा तिच्या कानांवर विश्वासचं बसत नव्हता. विठाम्हतारीला मरुन कित्तेक वर्ष झाली, मग ति आर्दशला कशी काय दिसु शकते? हा सगळा काय प्रकार आहे हे तिला कळतं नव्हतं. स्वाती फार घाबरली आणी…
(क्रमशः)