STORYMIRROR

SWATI WAKTE

Horror Thriller

3  

SWATI WAKTE

Horror Thriller

भुलभूलय्या भाग 2

भुलभूलय्या भाग 2

4 mins
124

मनालीच्या एका बसमध्ये रुहान आणि रीत भेटतात. रुहानला रीतचा फोन सापडतो. फोन देण्यासाठी रुहान रितला म्हणतो. तुझा फोन.. एव्हडे ऐकून रीतला वाटते की हा पहिल्याच भेटीत फोन नंबर मागतो का म्हणून ती रागाने त्याचा फोन फेकते. पण नंतर कळते की तो तिचाच फोन होता. तो आता कामातून गेला. रीत ही मेडिकलची स्टुडन्ट असते. शिकण्यासाठी ती मनालीला राहते तर रुहानला फिरण्याची आवड असते. तो फिरण्यासाठी मनालीला येतो. बोलता बोलता रुहान रीतला एक म्युसिक कॉन्सर्ट ला चालतेस का? रीत म्हणते तिचे वडील खुप स्ट्रिक्ट असल्यामुळे ती कुठेही फिरली नाही. रुहान म्हणतो आज चंडिंगडच्या बसमध्ये नाही तर कॉन्सर्टला चल तुला छान वाटेल. रीत त्याच्यासोबत म्युझिक कॉन्सर्ट ला चंदीगडची बस मिस करून जाते. तेव्हड्यात बातमी येते की ज्या बसमध्ये रीत चंडिंगडमध्ये जाणार असते तिचा अपघात होतो आणि त्यातले सर्व प्रवासी मरतात. हे ऐकून ती घरच्यांना मी ठीक आहे म्हणून सांगायला फोन करते तर तो फोन तिची बहीण घेते आणि तिला काहीच ऐकू येत नाही. फोन चालूच असताना ती बाजूला सागर असतो त्याच्याशी बोलत असते. सागर असा मुलगा असतो ज्याचे लग्न रीतच्या घरच्यांनी रीतशी ठरवलं असते. पण रितला त्या लग्नात काहीच इंटरेस्ट नसतो. तिकडे जो फोन चालू असते त्यातील संभाषणावरून रितला समजते की तिची बहीण आणि सागर एकमेकांवर प्रेम करतात. हे समजल्यावर ती ठरवते की घरचे आपल्याला अपघातात मेलेले समजतात तर हा त्यांचा गैरसमज तिच्या बहिणीचे आणि सागरचे लग्न होईपर्यंत तसाच राहू द्यायचा. ती रुदानला ह्यासाठी मदत करायला सांगते.

ती रुदानला म्हणते बहिणीचे लग्न होईपर्यंत आपण ठाकूर महल मध्येच लपू. रुदान तिला विचारतो तिथे कुणी आले तर. ती त्याला सांगते तिथे कुणीच येणार नाही कारण सर्वजण त्याला भुत बंगला समजतात. ते ऐकून रुदान घाबरतो. रीत त्याला समजावते भुत बीत काही नसतो. आपण तिथे राहू. ते ठाकूर महल जवळ जातात तर कुलूप आपोआप तुटते. ते बघून रुदान घाबरतो. रीत म्हणते खुप जुने कुलूप आहे. गंजल्यामुळे तुटले असेल.अचानक दरवाजा उघडतो रुदान अजुन घाबरतो. अरे बाहेर हवा असल्यामुळे उघडला असेल. नंतर लाईटही आपोआप लागतात. ते लाईट बघून ठाकूर महालजवळून जाणारा मनुष्य ठाकूरच्या घरी म्हणजेच रीतच्या घरी जाऊन सांगतो की ठाकूर महालात कुणीतरी आहे. हे ऐकून तिथून सर्व जण ठाकूर महालात जातात. तिथे त्या लोकांना आलेले बघून रीत तर लपते. पण रुदान त्यांना सापडतो. रुदान त्यांना सांगतो की मला मेलेल्या लोकांच्या आत्मा दिसतात आणि मी त्यांच्याशी बोलू शकतो. रीतचा आत्म्यानीच मला इथे आणले. तो त्यांना रीत च्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो.ते ऐकून त्यांचा विश्वास बसतो की हा आत्म्यांशी बोलू शकतो. रीतला हे बघून आनंद होतो. ती रुदानला सांगते की तिच्या बहिणीचे आणि सागर चे लग्न ह्याच हवेलीत लावा. ठाकूर आधी नाही म्हणतात पण रीत ची इच्छा आहे हे ऐकून तयार होतात. एका रात्री सर्व झोपले असताना रुदानला एका खोलीतून घुंगरूचा आवाज येतो. ते ऐकण्यासाठी तो जातो त्या खोलीचा दरवाजा तांत्रिकानी मंत्रउपचार करून त्या खोलीत मंजुलिकाच्या आत्म्याला कैद केले असते. रुदान घुंगरूचा आवाज ऐकून उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हड्यात तिथे रीत ची वहिनी अंजुलिका येते. त्याला ती सांगते की ह्यात मंजूलिका चा आत्मा आहे. तु त्या दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करू नको. तु आत्म्याशी बोलत असशील पण हा एक काळी जादू करणाऱ्याचा आत्मा आहे.असे सांगून अंजुलिका मंजूलिकाची गोष्ट सांगू लागते. अंजुलिका आणि मंजूलिका दोघी जुळ्या बहिणी असतात. त्याचे बाबा ठाकूरच्या घरी हिशोबाचे काम करायला कोलकत्तावरून येतात. अंजुलिका ही तिच्या बाबांची लाडकी मुलगी असते. ही गोष्ट मंजूलिका ला बिल्कुल आवडत नाही. मंजूलिका काळी जादू शिकते हे जेव्हा तिच्या बाबाला कळते तेव्हा तिचे बाबा तिला खुप रागावतात. जेव्हा ह्या दोघी मोठ्या होतात. तेव्हा मंजूलिका ला ठाकूरचा मुलगा आवडतो ज्यांच्याकडे तिचे बाबा काम करत असतात. पण ठाकूरच्या मुलाला अंजुलिका आवडते. त्यामुळे अंजुलिका चे लग्न ठाकूरच्या मुलासोबत केले जाते. लग्नात मंजुलिका अंजुलीकच्या साडीचा तुकडा आणि कंगव्यात अडकलेले तिचे केस घेऊन रात्री काळी जादू करते. हे जेव्हा तिचे बाबा बघतात. ते तिला खुप रागावतात आणि मारतात पण मंजूलिका त्यांना मारून टाकते. तसेच ती अंजुलिका ला मारायला जाते तेव्हा झटापाटीत अंजुलिका मंजुलिका ला मारते पण मंजुलिकाचा आत्मा ठाकूरच्या मुलाला पहिल्या मजल्यावरून खाली फेकतो त्यात तो अपंग होतो आणि बोलुही शकत नाही. मंजुलिकाचा आत्मा दुसऱ्या कुणाला काही हानी पोहचवू नये म्हणून तिला एका खोलीत धागा बांधून कैद करतात आणि हवेली सोडून दुसरीकडे राहायला जातात तसेच ती सांगते की मंजूलिकाच्या भुताने त्या घरातील अन्य आठ सदस्यांनाही मारले अशी स्टोरी अंजुलिका रुहान ला सांगते..


काही दिवसांनी रीत रूमच्या बाहेर निघते .. तिला सर्व जण मेलेले समजतात. तिला पाहून एक पंडित सर्वांना सांगतो की रीत जिवन्त आहे. रुदान रीत ला म्हणतो मंजुलिका ला जिथे कोंडले त्या खोलीत लप. तिथे कुणीही शोधणार नाही. रीत त्या खोलीत लपते. काही वेळानी जेव्हा रुदान दरवाजा उघडतो तेव्हा रीत नाटक करते की मंजूलिका तिच्या अंगात घुसली.नंतर दुसऱ्या दिवशी रीत च्या बहिणीचे संगीत असते तेव्हा मंजूलिकाचा भुत सर्व उलथा पालथ करतो. लोकांना ती भिंतीवर चालताना दिसते. सर्वांना वाटते की हा रीत चा आत्मा आहे जो संशय घेतल्यामुळे बाहेर निघाला. पण अंजुलिकाच्या लक्षात येते की हा रीत चा नाही मंजुलिकाचा भुत आहे आणि रीत जिवन्त आहे. तेव्हड्यात मंजुलिका रुदानच्या शरीरात प्रवेश करते. शेवटी समजते जी मेली ती मंजूलिका नाही अंजुलिका असते आणि मंजूलिका अंजुलीकच्या जागी असते. ठाकुरला हे कळते म्हणून त्यालाही ती वरून ढकलते आणि तो पॅरालाईझड होतो. ज्याला ज्याला कळते त्या सर्वांचा खुन ही मंजूलिका च करते. अंजुलिका चा भुत मंजूलिकाला शेवटी मारतो आणि अश्याप्रकारे अंजुलिकाला मुक्ती मिळते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror