Archana Dagani

Drama

3  

Archana Dagani

Drama

भांडण

भांडण

3 mins
258


रात्रीचे अकरा वाजले होते, तेवढ्यात फोन खणखणला ..

हॅलो... कोण ??

"मी धन्वंतरी हॉस्पिटल मधून बोलतोय, सिध्दांत कुलकर्णी ह्यांचेच घर आहे का हे ???"

हो.. मी माधव कुलकर्णी, सिध्दांतचा पिता...


"सिद्धांतचा accident झाला आहे, अर्ध्या तासा पूर्वी करवे रोड वर एका बाईक चालकाने त्याला मागून ठोकर मारली आणि बाईक चालक पसार झाला. काही लोक त्याला ईथे घेऊन आले, त्याच्या मोबाईल मधून तुमचा नंबर मिळाला. कंडीशन जरा सिरीयस आहे, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या." आणि फोन कट झाला. माधवरावांच्या डोळ्यावर अंधारीच आली. सुलोचनाबाईंनी पटकन जाऊन त्यांना सावरले. राधा सिद्धांतची पत्नी, लगेच पाणी घेऊन आली.


"काय झाले बाबा ?? कोणाचा फोन होता ??? माधवराव पाणी पितच होते तेव्हढ्यात राधाने प्रश्न विचारला.

लवकर गाडी काढ पोरी धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये जायचे आहे, मी सांगतो सगळे. सुलोचनाबाईं आणि राधा दोघी पूर्ण रस्ताभर प्रश्न विचारीत होत्या पण माधवराव काहीच बोलले नाहीत. हॉस्पिटल मध्ये पोहोचताच त्यांनी चौकशी केली.


सिद्धांतला आय सी यू मध्ये ठेवण्यात आले होते, डोक्याला पट्टी होती, शरीरावर बऱ्याच जखमा होत्या. त्याला ऑक्सिजन लावण्यात आले होते, तो बेशुद्ध होता. बाहेर पोलिस डॉक्टर साहेबां बरोबर चौकशी करीत होते.

सिद्धांतला काचेतून तिघांनी पाहिले, आई आणि बायकोला धक्काच बसला. माधवरावांची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. तिघे ही रडू लागले. डॉक्टरांनी सांगितले " खूप रक्त गेले आहे, धोका अजून तरी टळला नाही. चोवीस तासासाठी निगराणीत ठेवले आहे. तो शुद्धी वर आल्यावरच काय ते सांगता येईल." बोलून डॉक्टर निघून गेले.


माधवरावांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त राग होता सुलोचनाबाई आणि राधासाठी. ते फार संतापले होते.

"तुम्हा दोघींच्या रोजच्या भांडणामुळे माझ्या पोराची ही अवस्था झाली आहे. आज पण तुम्ही त्याला नीट जेवू दिले नाही. भरलेल्या तटावरून तुमच्या मुळे तो न जेवताच उठला आणि रात्री ह्या वेळेला गरज नसतांना बाहेर पडला आणि त्याची ही स्थिती झाली. तुम्ही दोघी त्याच्या या अवस्थेसाठी जबाबदार आहात. तुम्ही दोघींनी कधीच हा विचार केला नाही की तुमच्या अश्या वागण्यामुळे सिध्दांतच्या मनावर काय परिणाम होईल. तुम्ही दोघींनी कधीच त्याचा विचार केला नाही.. खरे तर एक आई म्हणून नक्कीच त्याला आई बद्दल प्रेम असणारच आणि बायको म्हणून राधाची पण तितकीच ओढ असणार, पण तुम्ही तर स्पर्धा सुरू केली होती तुम्हा दोघींन मधून श्रेष्ठ कोण?? हे ठरवण्याची.

तुमच्या भांडणात घराची शांती तर भंग झालीच पण सिद्धांतचे मन पण भरडले गेले. दोघी खाली मान घालून ऐकत होत्या, काहीही बोलण्याची त्यांची हिम्मत नव्हती. माधवराव जे काही बोलत होते ते एका अर्थाने खरेच होते. रोज रोजच्या सासू सुनेच्या वादाला सिद्धांत खरंच कंटाळला होता.


रोज त्या दोघी शुल्लक कारणावरून वाद घालीत असत. कधी स्वंयंपाक कोण छान बनवतो, तर कधी तू लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झालास, तर कधी तूझे प्रेम आईवर जास्त आहे आणि माझ्यावर नाही मग लग्नाचं का केलेस??, अश्या अनेक गोष्टी होत्या ज्याच्या मुळे घरात रोज भांडणे होत. त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आला होता पण असा एकही दिवस नव्हता जेव्हा सासू सुनेचे वाद होत नसत. ना त्याची बायको माघार घ्यायला तयार असचायची ना आई, मधल्या मध्ये त्याची फार घुसमट व्हायची. माधवराव सर्व ऐकायचे पण त्यांचेही बायको पुढे काही चालायचे नाही. आपल्या मुलाचे दोघिंच्या भांडणात मध्येच मरण होत आहे हे समजत असून ते हतबल होते. आजकाल तर त्याला ऑफिस मधून घरी येण्याची पण इच्छा होत नव्हती. फार कंटाळला होता तो. त्यात एककुलता एक असल्यामुळे आई वडिलांना त्याचाच आधार, म्हणून वेगळे राहणे त्याला जमण्यासारखे नव्हतेच. काय करावे त्याला सुचेनासे झाले होते. आज पण जेवतांना भाजी वरून सासू सुनेचा वाद सुरू झाला होता, म्हणून तो अर्धवट पाना वरून उठला होता आणि बाहेर मोकळ्या हवेत थोडावेळ गेला आणि त्याचे accident झाले होते. सासू सुनेची भांडणे त्याला भोवली होती.


माधवरावांचे बोलणे ऐकून दोघी सुन्न झाल्या होत्या. तेवढ्यात सिध्दांत हालचाल करू लागला, त्यांना काचेतून दिसले. डॉक्टरांना लगेच बोलावण्यात आले. पहाटेचे चार वाजले होते. डॉक्टरांनी तो आता ठीक आहे, तुम्ही त्याला भेटू शकता म्हणून सांगितले होते.

तिघेही आत गेले. सिध्दांतच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होते. आई आणि बायकोने त्याची माफी मागितली होती आणि परत कधीही न भांडण्याची शपथ घेतली होती.


धन्यवाद 🙏

काही चुका असल्यास क्षमस्व.कथा आवडल्यास नक्की लाईक, कमेंट,आणि शेअर करा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama