Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग23" रूनुझूनु पैंजनाची कादंबरी

भाग23" रूनुझूनु पैंजनाची कादंबरी

14 mins
150


 भाग 23"रूनुझूनु पैंजनाची"कादंबरी

आनंदात येऊन प्रशांत सुमेधाला म्हणाला सुमे आता बघ कुठे नेतो तुला, तिथला नजारा पाहून तू खूप खुश होशील पुन्हा गीत वाजू लागले.. एकाहून एक सरस गझल गीतांचा आनंद घेत घेत प्रवास चालू होता....

बिना तेरे दिलकश नजारा हम न देखेंगे

तुम्हें ना हो पसंद उसको दोबारा हम ना देखेंगे

तेरे ख्वाबों को गहनों की तरह खुद पर सजा लेंगे

कसम तेरी कसम तकदीर का रुख मोड़ लेंगे हम।।

तेवढ्यात तेवढ्यात एक दर्गा दर्गा आला निसर्गरम्य वातावरणात तो दर्गा होता आणि नदीमधून दगडांच्या पुलावरून लांब लांब ठेवलेले होते दुसऱ्या बाजूला जायचे होते तिथे उंच डोंगर उभा होता डोंगरावरून धो धो करून दुग्ध धवल जलप्रपात पडत होता..

प्रशांत नदीच्या या तीरावर उभा होता आणि दर्गाह त्या तीरावर पहाडाच्या पोकळीत होता....पाण्याच्या धारी वेगाने पडत होत्या.धारेखाली दगडी गुफा होती आणि तिथे काझी बाबाचा मकबरा होता..त्या नदीची खोली खूप जास्त नव्हती आरपार स्वच्छ पाणी दिसत होते इकडून तिकडे जाण्यासाठी सुरक्षित अंतरावर मध्ये मध्ये दीड दोन फुटावर मोठाली गोल दगडे ठेवली होती जाणे-येणे करण्याकरिता दुसरा मार्ग नव्हता ..

अश्या मार्गावरून सुमेधाला घेऊन जाणे कितपत योग्य अयोग्य आहे हा विचार न करता प्रशांत सुमेधाला खांद्यावर घेऊन निघाला प्रशांतचा जर का पाय इकडे तिकडे पडला असता ना तर दोघेही नदीत पडले असते वरून पडणारा हा धबधबा,,,अश्या विकट जागेवर प्रशांत सुमेधाला घेऊन पोहोचला...आणि सुमेधाला घेऊन तिथे मजारसमोर लेटविले. काझी बाबाने मोरपंखाचा पीसारा सुमेधाच्या अंगावरून तीन वेळा उतरवला..

"आणि म्हणाले अल्लाह तुम्हारे सब दुख दर्द खत्म करेगा" संध्या नमाजची वेळही झालेली होती प्रशांतने काझी बाबासोबत अल्लाची प्रार्थना केली आणि म्हणाला! "अल्ला पाक मेरी सुमू अगर ठीक हो गई तो चादर चढाउंगा , गरिबो को खाना खिलाउंगा काझी बाबाचे आशीर्वाद घेऊन तो परत निघाला सुमेधाला खांद्यावर घेऊन हळूहळू पावले टाकत दगडावरून नदी ओलांडून वरती आला ,अर्धा किलो किलोमीटरवर गाडी ठेवली होती गाडीत येऊन बसला सीटबेल्ट लावले सुमेधाला मी ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला स्पीकर चालू झाला तेव्हा पुन्हा तो गीत गुणगुणायला लागला..

प्रशांत म्हणाला काय गं सुमू तू हा मुंबईचा भाग पाहिलाच नव्हता ना आता मी तुला पुर्ण मुंबई दाखविणार आहे आपण दोघे खूप खूप भटकूया तुला आवडेल ना बघायला ,,पण त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नव्हतं आणि तो उत्तराची वाटही बघत नव्हता एखाद्या तरुणाची जशी दिल फेक अदा असते त्याप्रमाणे  तो वागत होता ...त्यावेळी प्रशांत वेगळाच भासत होता ...

प्रशांत सुमेधाला घेऊन गाडी जवळ आला गाडीत सुमेधाला बसवली सीटबेल्ट लावला आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला बसल्यानंतर सावकाश गाडी पुढे घेऊन गेला आणि स्पीकर ऑन केला...

पुन्हा वातावरण संगीतमय झाले आणि प्रशांत

गाणे ऐकू लागला आणि सुरात सूर मिसळू लागला त्या गाण्याचे बोल असे होते...

याद आ रहा है तेरा प्यार,,जहां हम वहां तुम ,,

हुए तुम कहां गुम,आ भी जा,,आ भी जा एक बार,,

गाडी संथ गतीने जात होती हेमंत ऋतुचा थंडावा तनामनाला भावणारा आल्हाददायक होता. वातावरण मस्त उल्हास देणारा होता..त्यातच गीताचे अमुल्य असे योगदान मिळाले..

पुन्हा वातावरण संगीतमय झाले आणि प्रशांतला भावनात्मक सहयोग लाभला मनाला वेधनारे कित्तेक गीतांचा संचय त्याने केला होता ...

ऐ दिल मैं वही तू वही,,वही है यह दुनिया के मेले

बिछड़े वह दिन जाने कहां ,,

रुठे सब यहां हम तो रह गए अकेले,,

आवाज दे किसको यहां.....

प्रशांत आज खूप खुशीत होता ड्रायव्हिंग सीटवरच तो थिरकत होता.कारणही तसेच होते त्याची प्रेमिका त्याच्या सोबत होती..खरंच तो सुमेधाला जिवापाड प्रेम करीत होता..तिच्या प्रेमात तो दिवाना झालेला होता...

आपलं सर्वस्व मानून तो असा वागत होता ...

पुढे गाण्याचे बोल अजूनच विदीर्ण करणारे होते.

"वादा वादा रहा साथी ,मैं तेरे लिए गाता चला जाऊं,

तू मेरा दिल तू मेरी जान जीना जीना मेरा जीना,

तेरे लिए जिंदगी लुटा दूं ,तू जो नहीं क्या है यहां,

याद आ रहा है तेरा प्यार........

तेवढ्यातच प्रशांतला एक चर्च दिसली तेव्हा तिथे गाडी थांबवून सुमेधाला घेऊन त्या चर्चमध्ये तो गेला, भव्यदिव्य येशू ख्रिस्ताची मूर्ती क्रॉसवर लटकत होती..

जे दुसऱ्याचं भलं करतात त्यांनाच या दुनियेमध्ये का बरं त्रास होत असेल?. प्रशांत डोळ्यात अश्रू भरून प्रार्थना करू लागला म्हणाला , तू सर्वांचा मसीहा आहे माझ्या सुमूचे दुःख दूर कर तिला पाहू दे हे जग आम्ही सर्व तुझी लेकरे आहोत मग तू असा काय बघत बसलाय,कर काहीतरी हसव ना माझ्या सुमूला आधीसारखी तुला काय पाहिजे ते मी देईन की जरी मी देऊ शकत नाही तरी मी प्रयत्न करेन आणि कन्फेशन रूम मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या तिकडून फादर म्हणाले देर है अंधेर नही जिद्द असूदे बाळा तुझं कल्याण होईल ..प्रशांतने थँक्यू धन्यवाद केले आणि तिथून सुमेधाला घेऊन गाडीत येऊन बसला सुमेधाला सीट बेल्ट वगैरे व्यवस्थित लावली आणि ड्रायव्हींग सिटवर जाऊन बसला स्पीकर ऑन केले व प्रवासाला सुरवात केली....

या गीताचे बोल अधिकच हृदयाचे तुकडे करणारे होते.

"सजदे किए है लाखो ,लाखो दुआएं मांगी,,

पाया है मैंने फिर तुझे...

चाहत की तेरी मैंने हक में दुआएं मांगी,,

पाया है मैंने फिर तुझे....

 प्रशांत सुमेधाला म्हणाला , तुला काही त्रास नाही ना होत झोप वगैरे येत आहे का भूक तर नाही लागली ना तहान लागली काय आज खूप थकलो ना फिरून ,आता आपण लवकरच घरी पोहोचू आजच्या दिवसाला बस इतकेच ,पुन्हा उद्या येऊ फिरायला ...

दुसऱ्या दिवशीही लवकरच तयारी करून प्रशांतने सुमेधाला गाडीत बसविले आणि घरून निघाला आधी त्याने गौतम बुद्धाच्या तपोभूमीकडे गाडी वळवली त्या वातावरणात खुपच शांतता होती .इथे बरं वाटेल सुमू तुला ,,हे शांत ठिकाण तुझ्या हृदयाचे ठोके सुद्धा ऐकतील चला आत ,गौतम बुद्धाची खूप मोठी कोरीव रेखीव प्रतिमा शांत मुद्रेत आसनस्त होती .ती मुर्ती जरी लांबून दिसत होती तरी तिथे जायला बराच कालावधी लागला ..सुमेधाला खांद्यावर टाकून छोट्या बाळासारखी केअर करून तिला अलगद उचलून हळूहळू पावले टाकित होता...

आणि पोहोचल्यावर भल्यामोठ्या चबुतऱ्यावर बुद्ध प्रतिमेसमोर सुमेधाला लेटविले आणि डोळे बंद करून शांतचित्ताने प्रार्थना करू लागला...

तो म्हणाला , हे सत्याच्या मार्गावर चालणारा शांतीच्या मार्गावर विचरण करणारा ,माझ्या सुमूला बर कर तुला वाटेल ते मी देईल तशी माझ्या देण्याचे सामर्थ्य नाही तू एवढा सामर्थ्यवान तुला मी काय देणार म्हणा पण असं बोलायचं म्हणून बोलतो रे राग वगैरे येऊ देऊ नकोस आणि फक्त एकच काम कर तू माझ्या सुमूला स्वास्थ प्रदान कर,बघ ना बुद्धा किती महिने लोटले तरी ती जागेवरच बसून आहे , कुणाशी जास्त बोलत नाही किंवा कुणासोबत हसत नाही फक्त ती थोडेफार माझ्याशीच बोलते आणि आधीसारखी नाही रे माझी सुमू तिचं दुःख दूर कर तुला माझी शपत आहे , आणि त्याचे नयन पाझरू लागले.आर्जवी स्वरात त्याने विनयशील प्रार्थना केली .संध्याकाळ झालेली होती.

सुमेधाची औषध आणि जेवण द्यायची वेळ झालेली होती तिथे खूप छान त्या रम्य परिसरात त्यांचा वेळ कधी गेला ते कळलंच नाही अरे बापरे आता सुमूला भूक लागली असेल घरी जायला हवं घराच्या दिशेने गाडी वळवली..

आज सुमेधाच्या चेहऱ्यावर विलोभनीय तेज दिसले, प्रशांतचा उत्साह वाढला आणि त्याला ठाम विश्वास होता की आता सुमूची तब्येत लवकरच ठीक होणार , आणि तो आनंदाने डोलु लागला, गाण्याच्या तालासुरात स्वतःला त्याने झोकून दिले.. परत आपल्या बंगल्यावर सुमेधाला घेऊन आला, पांडू काकाने धावत येऊन गेट उघडले आणि सुमेधाला आणायला मदत करू लागला आणि प्रशांतचे अपार प्रेम पाहून नियती ही संभ्रमात बघत होती......


   भाग 29" रूनझून पैंजनाची"..

" कहाणी सुमेधाची

आयुष्यात जगायला तुझ्या प्रीतिची फारच गरज आहे. मी तुझ्या हृदयात नाही वसलो परंतु तुला मी माझ्या पूर्णतया तना-मनात, रक्तवाहिन्यात वसवले आहे .. माझी प्रीती अशी स्वार्थी नाही ग सूमे तुझ्यासाठी वाट्टेल ते मी करू शकतोय श्वास थांबला तरी चालेल मी हसत हसत प्राण देईन ...अनिश्चित असू दे माझे भविष्य तरी मी तुझ्या आठवणी हृदयी ठेऊन जगेन..

इकडे राघवणे आपली ड्युटी जॉईन केली त्याच्या लाडक्या मुलींवर ही तो लक्ष देवू लागला काय हव नको बघायला लागला आणि प्रेमाने त्यांना त्यांची विचारपूस करू लागला परंतु समाजाने राघवला माफ केलेले दिसत नव्हते कुणी त्याच्याशी बरोबर बोलत नव्हतं त्याला अश्या असंख्य गोष्टींचा सामना करावा लागला समाज प्रत्येकाला त्यांनी केलेल्या चांगल्या कर्तुत्वाचे इनाम देत असते आणि वाईट केलेल्या कार्याचीपण दखल समाज घेतो, चांगल्या कार्याचे चांगले कौतुक होते वाईट कामाचे वाईटच बखान होत असतं....

तसा हा समाज सर्वांनाच काही चांगलं म्हणेल याची काही शाश्वती नाही कधी असं होतं की चांगल्या माणसांनाही त्रास होतो आणि निर्दोष व्यक्तींनाही समाजाचे डंख झेलावे लागतात ..काही व्यक्ती न केलेल्या गुन्ह्याची ही सजा भोगत असतात परंतु समाज आहे म्हणून आपण आहोत समाजात जर चांगले कामे केली तर एक ना एक दिवस समाज आपल्याला सांभाळून घेतो कमीतकमी विरोध करीत नाही....

मनुष्य हा चांगले कार्य केल्याने कर्तुत्ववान ठरतो समाजात त्याची प्रतिष्ठा वाढते आणि तो लोकप्रिय ठरतो आणि वाईट कर्म करणाऱ्यांची वाईट प्रसिद्धी होते.. बदनामीला समोरे जावे लागत असते.... समाजाचे राघवला खूप अनुभव आलेत.. त्यामुळे

मनातल्या मनात त्याने आपल्या पापाचे क्षालन करावयाचे ठरवले ..तो सतत त्या प्रयत्नात त्याने कधी कुणास ही हजर जवाब दिला नाही कुणी काही म्हटलं तर निमूटपणे ऐकून घेतले त्याच्या अंगी तशीही विनम्रता होतीच ती अधिकच आणली ..

आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे बदनामीमुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे रूसुन जातील त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे तो प्रत्येकाने आनंदाने स्वीकार करावा...

तो वेळेवर नियमित कारखान्यावर जाऊ लागला मुलींवर ही लक्ष देऊ लागला.. मुलींना ही आई दूर असल्यामुळे आपल्या बाबांचा आधार वाटू लागला, तसे आजी-आजोबा खूप जीव लावायचे ,काका काकू ही प्रेम करीत होते . तसेही त्या निरागस बालिका त्यांना काहीच माहिती नव्हती फक्त आईची कमी खटकत होती ..तितकस समजत पण नव्हते दिवस वाऱ्या गत उडत होते समजूतदारपणा यायला लागला होता आणि आजी आजोबाच्या सहवासात या दोघी रमू लागल्या होत्या....

राघवदादाच्या करणीने आणि सुमेधा वहिनीच्या कोमात गेल्याने राजीवचे मन काही लागेना...

तिकडे राजीवला कृषी विद्यापीठात पाहुणे म्हणून बोलावल्या जात असे, कृषीदिवसाच्या निमित्ताने त्याला सभेत आमंत्रित केले असले तरी त्याची भाग घ्यायची इच्छाच होत नव्हती , त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता मन खिन्न होते अस्वस्थ होते.

तेव्हा त्याची पत्नी संध्याने त्याला परोपरीने समजावून आपली प्रतिष्ठा कायम ठेवायचा सल्ला दिला आपण कमावलेल्या प्रतिष्ठेला मिळविण्याचा प्रयत्न करावा म्हणून तो कार्यक्रमात उपस्थित होऊ लागला सर्वांचे प्रयत्न वेगवेगळे असतात तसा त्याला कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा मनस्ताप जाणवला नाही तो नव्या उमेदीने कार्य करू लागला....

इकडे सुमेधांची सेवा करणारा प्रशांत तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देत होता विशेष तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार असायचा , सुमेधाला बरी करणार ही जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती,काहीतरी इच्छा घेऊन तो रोज काही ना काही वेगवेगळे उपचार करायचा तिच्याशी संवाद साधायचा त्या दिवशी सकाळच्या वेळी तो सुमेधा जवळ बसला होता आणि त्याच्या हातात मोगऱ्याची सुगंधित फुले होती तो एक एक करून त्या फुलांचा सुगंध तिला भरवित होता तिच्या नाकाला लावीत होता तिच्या अंथरूणावर आजूबाजूला फुलेच फुले अंथरली होती,सुमेधाच्या बेडरूम मध्ये ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट भरला होता सुमेधाच्या शरीरावर दागिण्यासारखा मोगरा सजविला होता . हे कार्य बघून पाहणाऱ्यांनी प्रशांतला वेड्याची उपमा दिली असती .

परंतू त्याला कुणाची पर्वा नव्हती , प्रशांत या कामात एवढा तल्लीन झाला होता कि त्याला आजूबाजूचे काहीच भान नव्हते .तिच्या बाजूलाच बेडवर तो पहुडला होता प्रत्येक अवयवाला स्पर्श करीत होता,तिला आपल्या उबदार मिठीत घेऊन हृदयाची स्पंदने चेतवत होता ...

आतल्या विसव्याला प्रेमाचा स्पर्श मिळाला की ती उठून उभी होईल ही समजूत करून तो तिच्याशी गुजगोष्टी ही करू लागला...

तेवढ्यात प्रशांतचे लक्ष तिच्या डोळ्यावर गेले त्या मृगनयनी डोळ्यातून अश्रू झिरपत होते.त्याक्षणी हर्षाने तो भाव विव्हल होऊन आपल्या कवेत घेऊन त्याने तिला गच्च मिठी मारली आणि आनंदाचे अश्रू त्याच्या गालावरून थेट तिच्या ओठात पडले होते तेव्हा तिचा अस्फुट स्वर त्याच्या कानावर आला तिने प्रशांत म्हणून आपल्याला आवाज दिल्याचा त्याला आभास झाला .

तो दचकला आणि वारंवार तिला आपल्या छातीशी कवटाळून घेतले.सुमेधा म्हणून तिच्यावर चुंबनाचा वर्षाव तो करू लागला .

तिच्याशी अविरत बोलत होता, बोल ना सुमे पुन्हा एकदा मला आवाज दे ना! तू पूर्ण जागी झालीस ना सूमे उठ ना ,सुमेधाला बसवण्याचा प्रयत्न करू लागला.त्याने बसवून तो बाजूला झाला तोच तिचा देह निपचित बेडवर पहूडला, प्रशांत तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होता तिला हलवून पहात होता सुमेधा शांत मुद्रेने एकटक शून्यात बघत होती पण तिच्या डोळ्यातले अश्रू अजून सुद्धा वाहात होते प्रशांत काकुळतीला आला होता आणि सुमेधाला म्हणत होता असं काय करतेस तू आत्ताच मला आवाज दिला ना ! मग अशी गप्प का झालीस , बोल ना ! आणि तू का बरं अशी रडते आहे , तुला काय वेदना होत आहेत सांग ना एकदा , तुझे दुःख दूर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन पण तू माझ्याशी संभाषण तरी कर , उठ ना खूप झाले आता तुझे लाड , कौतुक अशी का बर माझ्यावर रुसलीस तुझा हा अबोला मला किंचितही सहन होत नाही गं सुमे , तुझ्यापेक्षा मला अधिक वेदना होतात आहे मी तडफडतोय तुझ्या प्रेमासाठी सुमेधासमोर एक याचक भिकारी बनून वारंवार भिकेचे दान मागत होता पण सुमेधा काही समजण्याच्या स्थितीतच नव्हती.

प्रशांतने डॉक्टरांना फोन करून सुमेधाची स्थिती सांगितली

तेव्हा डॉक्टर म्हणाले पेशंटला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन या ,,

ज्या व्यक्तीने तिच्या व्यतिरीक्त कुणावर ही इतके प्रगाढ        प्रेम केले नाही.त्याचा कोणताच प्रयत्न त्याच्या अंतर्मनापर्यत पोहोचत नाही तेव्हा प्रशांतच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे वेगळे सांगणेच नको ..

तिच्याकरीता आपल्या प्राणाची आहूती द्यायला तयार आहे ,सारखा धडपडत आहे त्यात त्याला सक्सेस नाही मिळाला तर अश्रू ढाळण्याशिवाय अन्य काहीच मागे उरत नाही ,प्रेमाचे अंकुर असे वाळले की त्याच्या जीवनातला प्राणवायूच संपतो. त्याचा भरवसा संपल्यावर माणसाला दुसरं काही जवळचं वाटत नाही .तो पुरता खचला होता..अश्या वेळी जर कुणीही समजूत घातली तरी काहिच फायदा होत नाही, कोणत्याही शब्दाने समाधान होत नाही .असच काहीतरी प्रशांत सोबत घडत होतं..

प्रशांतने फोरविलर मध्ये बसवून तडक तिला घेउन हॉस्पिटलला निघाला डॉक्टरची भेट घेतली डॉक्टरांनी सुमेधाचे चेकअप केले आणि म्हणाले सर्व व्यवस्थित आहे घाबरू नका प्रशांतराव अश्रू बद्दल विचारले असता

डॉक्टर म्हणाले ! डोळ्यातून सारखे अश्रू वाहत आहे तेव्हा तिला अंतरात्म्यात दुःख सुख जाणवायला लागले आहे ....

तुम्ही तिची सेवा करता ती बघत आहे पण ती बोलू शकघत नाही त्यामुळे ती फक्त अश्रू गाळणेच तिच्या हातात आहे , तीला तिची आत मधली शक्ती जागृत करण्यासाठी तिला वारंवार प्रोत्साहित करत चला तिला हिम्मत देत चला जेव्हा ती आतून सक्षम होईल आणि तिला वाटायला लागेल की आता पडून राहणे शक्य नाही मला उठायला हवं तेव्हा ती पटकन उठून उभी राहू शकते तिच्या जीवनातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगत चला तिला तिच्या मुलींची पण आठवण देत चला..

तिचा आत्मविश्वास वाढला पाहिजे जेणेकरून ती स्वतःहूनच आपली शक्ति जागृत करून परत येऊ शकेल त्यात तुम्ही तिचे सहकार्य करा तिला तिच्या यातनेतून व्यथेतून तुम्हीच काढू शकाल. वारंवार तिला चांगली होण्याबद्दल ठासून सांगा,तिच्या कानात ते शब्द गेले पाहिजेत त्यावर ती हमखास अमल करेल.

काय करायला हवं ते तुम्ही ठरवा . तुमची सुमेधा चांगली होण्याच्या स्थितीत आलेली नाही वेळ लागेल धीर ठेवा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल विश्वास ठेवा.

प्रशांत सुमेधाला घेऊन घरी आला त्यानंतर कित्येक सकाळ कित्येक संध्याकाळ कित्येक रात्र कित्तेक अमावस्या पौर्णिमा गेल्यात तो हतबल असहाय बघत होता. फक्त त्याच्याजवळ अश्रूच होते त्याचे मित्र परंतू

वाहून वाहून ते ही संपल्याची जाणीव झाली. प्रेतवत शरीर ना भाव, ना भावना , ना संभाषण ,ना हालचाल

ती आपल्याच दुनियेत मस्त जगत होती. एक दिलासा प्रशांतच्या मनात तेवत होता ....

" कोणास ठाऊक कुणाच्या पापाचे सजा भोगती आहे माझी सूमू ती तर भोळीभाबडी अगदी लहान बाळासारखी निरागस होती तिने कुणाचेही अहित केलेले नव्हते मग पूर्वजन्मीचे भोग म्हणतात कोणी तू तर भोगावी लागत नसतील ना..

पूर्वजन्मी कुणाचातरी शाप लागला असेल का प्रशांतच्या डोक्यात वावटळा सारखे विचार येत जात होते .त्याच डोके गरगरायला लागले होते आणि त्याच्या अवतीभोवती स्मशान शांतता पसरली होती.....

प्रशांत विदुशकासारखे तिच्या अवतीभोवती फिरून तिला जुन्या गोष्टी सांगू लागला आणि तिच्या लग्नाची,मुलींची आठवण देऊ लागला तिच्या लहानपणीच्या काही आठवणी त्याने करून दिल्या तो जीवानीशी तीच्या स्मृती जागृत करण्यामागे लागला होता परंतु काहीच फायदा त्यास दिसला नाही , तो अंधकारात खोल विहिरी सारख्या गड्यात उभा होता , तिथून त्याला निघता ही येई ना तेव्हा तो अतिशय घाबरला...परंतू ते स्वप्नच होते..

आज मनोमनी काहीतरी निश्चय करून प्रशांत निघाला

नव्या उमेदीने नव्या वाटेवर, आज त्याला काही वेगळा उपचार सुमेधा वर करण्याचे ठरविले, म्हणून तो एकटाच गाडी घेऊन निघाला तब्बल दोन तासानंतर गाडी एका

अनोळखी गावात पेहोचली,एका अनोळखी माणसाला त्याने तो पत्ता विचारला आणि कच्च्या रस्त्यावर गाडी घेतली तो भाग जंगलाचा होता , पुढेपुढे अजूनच घनदाट जंगल दिसत होते हिरवीगार वनराई दिसत होती अगदी छोटा रस्ता असल्यामुळे काही वृक्षांच्या फांद्या गाडीला रोखत होत्या पण त्या फांद्यांना न जुमानता प्रशांत आपली गाडी पुढे नेत होता.....

भर दुपारची वेळ होती त्या वनात भयानक शांतता पसरलेली होती त्याला मध्येच वन्य प्राणी ससे , हरीण , नीलगायी अनेक प्रकार प्रकारचे पशु पक्षी दिसले अजून काही अंतर पुढे गेल्यावर एक प्रशस्त तलाव दिसला.

तो तलाव पाण्याने तुडुंब भरलेला होता.. त्यात असंख्य मगर, जलचर जलक्रीडा करीत होते ...थोडे अधिक समोर गेल्यानंतर जंगलात एक झोपडीवजा घर त्याला दिसले , गाडी पार्क करून तो गाडीतून बाहेर निघाला आणि झोपडीकडे वळला, झोपडीचा दरवाजा म्हणजेच बासाचा ताटवा होता.. त्या ताटव्या जवळ उभा राहून त्याने सर्वदूर निरीक्षण केले एवढ्या भयंकर जंगलात बाबा एकटे राहतात यांना पशुपक्ष्यांची भीती वाटत नाही काय वरून कच्च्या झोपडीत असतात त्यांना कुणाची भीती कशी नाही. प्रशांतला खूपच आश्चर्य वाटले.. परंतु मनातले असंख्य विचार त्याने मनातच गडप केले आणि टकटक आवाज करून कुणी आहे का बाबा बाबा म्हणून आवाज दिला.....

 काही वेळाने ताटवा उघडण्यात आला . आतून आवाज आला ! कोण आहे ? एक वृद्ध बाबा बाहेर आले, बाबाच्या हातात काठी होती काठीच्या सहाय्याने ते बाहेर आले बाबा खूप वयस्कर दिसले सफेद फटक दाढी-मिश्या वाढलेल्या होत्या ,डोळे खोल गेलेले देहयष्टी अगदी बारीक सडपातळ रंग करडा थोडा पुढे वाकलेला बांधा ,कमरेपासून खाली पाठीचा कणा वाकलेला होता..

प्रशांत ने पूर्ण व्यवस्थित निरीक्षण केले तो पहिल्यांदाच त्या बाबांना भेटायला गेला होता बाबा म्हणाले कोण तुम्ही ? कुठून आलात ?

प्रशांत म्हणाला ! बाबा मी इथे मुंबईत असतो तुमचे नाव मी खूप ऐकले आहे.म्हणून मी आलो तुमच्याकडे,

बाबा म्हणाले या आत बसा!

प्रशांतने आतल्या झोपडीचे ही निरीक्षण केलं एक तुटके फुटके खाटले होते ,त्यावर फाटक्या चिंध्या अंथरलेल्या होत्या त्याही खूपच काळवंडलेल्या होत्या आणि खाटल झोळी सारखं लोंबकळत होतं.प्रशांत विचार करू लागला या माणसाच्या हातात येवढा गुण आहे तरी पण अश्या घनदाट जंगलात का बर राहतात ...अशी परिस्थिती का आणि कशी झाली असेल ..गुणी माणसाची अशी अवहेलना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. 

बाबा म्हणाले !

बोला साहेब माझ्याकडं काय काम काढल,

प्रशांत म्हणाला !

आपणास न्यायला आलो आहे ..

बाबा म्हणाले !

पेशंटला इकड घेऊन याचं असतं मी बहुतेक बाहेर गावी जात नाही प्रशांतने पेशंटची अवस्था सांगितली इतक्या लांब मी तिला नाही आणू शकणार तेव्हा

बाबा थोड्यावेळाने म्हणाले ..!

मी तुमच्या सोबत उद्या येऊ शकतो ते ही सकाळच्या वेळी आता संध्याकाळ झालेली आहे मला गाडीने परत आणून सोडणे ही तुमची जबाबदारी राहील तेवढे बोलून बाबा चुप राहीले ..

प्रशांत म्हणाला ..!

बाबा तुम्ही जे म्हणाला मी ते करायला तयार आहे फक्त तुम्ही माझ्यासोबत चला हिच विनंती आहे..

बाबा म्हणाले..!

मी आजच औषध वगैरे तयार करून ठेवतो..

प्रशांत म्हणाला ..!

बाबा मी तुम्हाला तुमच्या जागेवर व्यवस्थित पोहोचवेल माझ्यावर विश्वास ठेवा, बाबा मी उद्या सकाळी येतो आणि प्रशांत परतीच्या मार्गावर निघाला.

रात्री प्रशांतला अजिबात झोप नव्हती त्याला असं झालं होतं की मी बाबा कडे केव्हा केव्हा जातो आम्ही बाबाला केव्हा घेऊन येतो आणि माझी सुमेधा केव्हा बरी होते..

नित्य नित्यकर्म आटोपून आंघोळ करून पटकन फ्रेश झाला, देवाला प्रार्थना केली दिवा लावला आणि तो तडक निघाला. आणि भरधाव वेगात गाडी घेऊन बाबाच्या गावी पोहोचला ...

तिथे बाबाची ही तयारी झाली होती आज बाबाने स्वच्छ कपडे घातले होते सदरा आणि धोतर ते नीट नेटके दिसत होते डोक्यावर टोपीपण घातली होती ... त्यांना घेऊन प्रशांत आपल्या निवासावर आला ...पांडू काकाला चहा नाष्टा करायला सांगितला बाबाने आणि प्रशांतने दोघांनीही नाष्टा केला चहा घेतला व सुमेधाच्या रूम मध्ये गेले..

जबाबाने सुमेधाची अवस्था बघितली नाडीपरीक्षा केली नंतर काही न बोलता स्तब्ध राहून सुमेधाच्या पायाकडे वळले पायाच्या तिसऱ्या बोटाला धरून त्यांनी त्या बोटाला जोरात झटका दिला दोन्ही पायाचे बोटे धरून तीन वेळा झटके दिलेत आणि

सुमेधाच्या हाताच्या बोटाना काहीश्या अश्याच पद्धतीने उपचार केला व वेगळ्या पद्धतीचा एकूप्रेशरचाच प्रकार होता..

बटव्यातील औषध काढून सुमेधाच्या नाकात टाकली आणि तिथेच खुर्चीवर बसून सुमेधा वर काहीशे अनेक उपचार केलेत... 


,,,,,,,क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama