STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग 9 "रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग 9 "रूनझून पैंजनाची"कादंबरी

5 mins
122

कालभ्रमण ा नुसार दिवस, महिने जाऊ लागले राघव आणि सुमेधाच्या विवाहाला वर्ष पूर्ण झाले होते. शहरात वास्तव्याला असल्यामुळे येणारे जाणारे सतत लागून रहायचे कोणी आल्यास सुमेधाचा आनंद द्विगूणीत व्हायचा.ती उत्साहाने सर्वांचा मान पान राखून त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यात सहभागी व्हायची.कधी हॉस्पिटल कधी मार्केटला जाव लागत असे राघव पण वेळ मिळाल्यास सहभागी व्हायचा.

  प्रत्येक सणावाराला माहेरी सासरी जावे लागायचे,

श्रावणात अनेक सणांची पर्वनी आणि नव्या जोडप्याचे स्वागत त्यानिमित्ताने ती दोघेही जात असे परंतू कधी राघवला सुट्ट्या नसायच्या तेंव्हा सुमेधाला माहेरी जाण्याचा मोह आवरत नसे.भावासोबत जेव्हा सुमेधा रक्षाबंधनाला गेली तेव्हा सारखा पाऊस पडत होता मध्येच वादळ पण येऊन गेले सुमेधाला पावसाचे दिवस खूप आवडायचे माहेरी गेली आणि मस्त पावसात भावंडासोबत धमाल केली तिची मैत्रिन सई आली की तिची बडबड सूरू असायची तसाच बालपणीचा मित्र प्रंशात पण होताच, सर्व सोबत मिळून महफिल भरवायचे. सुमेधाला त्या स्वर्गिय आनंदात विवाह झाल्याचा विसरही पडायचा .

  प्रशांत सुमेधाला कंपनी द्यायचा तो आतून पुरता कोलमडलेला परंतू वरून शांत दिसायचा .सुमेधाला काय कुणालाही त्याच्या व्यथेचा मागमूसही नव्हता,आपल्या मनातिल गुपित तो कुणालाच सांगायचा नाही .या ही वेळी सुमेधाने त्याला त्याच्या दुख:चे कारण विचारले होते.परंतू त्याने थांगपत्ता लागू दिला नाही .तरी सुमेधा त्याच्या मागावर राहायची ,त्याचा उदास चेहरा बघताच त्यास विचारायची परंतू

प्रशांत म्हणायचा कुठे काय झालय , काही एक झालं नाही मला तू तुझं सांग ,तू कशी आहेस सुखात आहे ना एवढं बोलून पटकन जायला निघायचा.

पाणावलेले डोळे लपवण्याचा यशस्वी प्रयत्न तो करीत असे आणि लगेच वळून अश्रू बाहेर येण्याच्या आतच तो गिळायचा. त्यास त्याच्या मनातलं काहूर कुणालाच दाखवायच नव्हतं तो त्याच्या हृदयात असंख्य आठवणी भरून असायचा आणि इकडे सुमेधाच्या मनातिल गोंधळ वाढायचा.

मी आधिच भाग ३ मध्ये प्रशांतचा उल्लेख केलेला आहे.

वाचकांनी तसदी घ्यावी.

सुमेधाला माहेरी येऊन चार दिवस झाले होते. सांगितल्या प्रमाने राघव तिला न्यायला आला होता.

सुमेधाने खूप उल्हासून राघवला आपण पावसात खूप मजा केल्याचा वृतांत सांगितला.

राघव म्हणाला !

चला आता आपल्या गावाला जायची तयारी करा. सुमेधा हिरमुसली तिचा चेहऱ्यावर उदासी पसरली होती.

राघव म्हणाला ,का ग अशी उदास दिसते आहे .

सुमेधा म्हणाली, कुठे काय मी कुठे उदास आहे.

राघव म्हणाला ! बर मी नव्हतो ना सोबत म्हणुन रागावलिस वाटते ,चल कुठेतरी फिरून येवूया पाऊस थांबला आहे. सुमेधा नाही म्हणु शकली नाही. दोन किलोमिटरवर एक छोटी लेणी होती.दोघेही तिथे गेले.त्या लेणीत बहूतेक मुर्त्या भंगलेल्या अवस्थेत अक्राळ विक्राळ दिसत होत्या. काहिशी भिती वाटत होती. आंधार पसरला होता.

सुमेधाला आभास झाला की तिला त्या भंगलेल्या मुर्त्या सारख्या बघत आहे आणि ती तेवढ्या गारव्यातही घामाघूम झाली .भर्रकण वटवाघुळाचा थवा उड़ाला डोक्यावरून गिरट्या मारू लागल्या .आजच्यासारखा अनुभव तिला कधीच आलेला नव्हता भेदरलेल्या अवस्थेत राघवला ती जाऊन बिलगली होती.ती आई बाबासोबत या आधी कित्येकदा लेणीत आलेली होती तशी ती लेणी सुंदरच होती परंतु आज तिथे आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते मूसळधार पावसाच्या सरी धो-धो करून बरसू लागल्या सुमेधा अजुनच घाबरली दुपारचे चारच वाजलेले होते तरीपण संध्याकाळ झाल्यासारखा काळोख पसरला होता सुमेधा राघवला म्हणाली! चला इथून मला फार भीती वाटत आहे ,परंतु पाऊस जोरदार पडत असल्यामुळे परत जाणे शक्य नव्हते,विद्युल्लतेचा लखलखाट वाढला होता,तो विजेचा खेळ पाहून मनातच सुमेधा अजूनच घाबरली आणि राघवला म्हणाली !अहो चला लवकर घरी मला इथे काहीतरी वेगळेच वाटत आहे, तसाच राघव म्हणाला , अग बघ ना पाऊस किती धोधो पडतो आहे आणि सुमेधाला आपल्या बाहुपाशात ओढली ,पावसाचे टपोर थेंब सारखे पडत होते.काळे निळे ढग आभाळात बेलगाम धावत होते. राघवच्या मजबूत बाहुपाशात सामावली.

राघवला काय बहानाच पाहिजे होता .तो बेफाम वाऱ्याप्रमाणे तृष्णा मिटविण्यात मश्गूल झाला.. सुमेधा पक्ष्याप्रमाने फडफडत होती.आणि मनातल्या मनातच कासाविस होत होती. राघवला या गोष्टीशी काही संबध नव्हता. परंतू त्याचा सहवास आज सुमेधाला हवाहवासा वाटला तिला या अवर्णीय सहवासाची यापुर्वी जाणिव नव्हती आणि तिला या सोहळ्यात आनंदाची अनुभूती झाली.आणि ती सहर्ष त्या उपभोगात सहभागी झाली अशी अद्वितीय प्रनयाराधन सहवासाने ती सुखावली होती.तिथे क्षणात अद्भुत नजाऱ्याची निर्मिति झाली होती.दोघेही अगदी ओल्याचिंब देहाने इंद्रधनुषी रंग उधळत होते.त्या दोघांच्या प्रनयाने आसमंत ढवळून निघाला गगनातून संततधारा देखिल तालासुरात वेडाऊन पडत होत्या.या अप्रतिम क्षणाच्या सहवासात चिंब चिंब न्हाली ,अद्वितीय स्पंदनात ती मग्न झाली..

 प्रकृतीच्या गाभाऱ्यात सर्वांचा साथ अनंत असतो हे सत्य आहे. सर्वप्रथम नरनारी ही आदमजात प्राण्या सारखी होती ईश्वराने पृथ्वीवर स्त्री पुरुष जन्माला घातले नंतर सृष्टीचा क्रमाक्रमाने विकास झाला आणि अन्य जीव कसे आले ही गोष्ट सुमेधाला नेहमीच भांड्यात पाडायचे, ती नेहमी विचार करायची हा निसर्ग कसा तयार झाला असावा पृथ्वीवर सृष्टी कुठून आली सृष्टीचा जन्मदिवस कोणता असेल ? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालित असे.स्त्री-पुरुषांचा जन्म भगवत गीतेत वाचण्यात आला होता ती मनाशीच तर्क-वितर्क करीत होती तिला अजून पुर्ण समाधान मिळाले नव्हते हल्ली वर्तमान पत्रातून बातम्या वाचून तिला थोडी माहिती मिळायची.सृष्टीवर गॉड कण मिळाले होते त्यानुसार शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न केेलेला होता म्हणे ,ज्या गोष्टीपासून पृथ्वीवर जीव जंतू मानव निर्मिती झाली व सृष्टीवर जीव आले मग निसर्ग कसा उत्पन्न झाला असावा पशुपक्षी कुठून आले असतील ! शास्त्रज्ञांनी विज्ञान दृष्टिकोणातून काही ठामपणे माहिती दिलेली नव्हती. त्याला मराठीत देवकण नाव दिले होते.जर सृष्टीत देव नाही तर देवकण नाव कसे काय दिले असतील.असल्या अनेक गोष्टी तिच्या मनात यायच्या तसा तिचा देवावर गाढ विश्वास होता ती नेहमी भागवत गीता वाचायची तिला श्रीकृष्णाची नीती त्याचा भोळेपणा नवधा भक्ती भावविभोर करायची ती असल्या गोष्टीवर विश्वास करीत नसे परंतू विज्ञान खूप पुढे गेलेले आहे त्यावर भाष्य करणे यौग्य की अयोग्य हे देखिल प्रश्न तिला पडत असे.असो दोघेही दुसऱ्या दिवशी आपल्या हक्काच्या घरकुलात परत आले.

दिवस भरभर जात होते विवाहाला वर्ष झाले होते लग्नाचा वाढदिवस करायला राघव तिला हॉटेलात जेवायला घेऊन गेला होता त्या दिवशी सुमेधाला अस्वस्थ वाटत होते .घरी येताच तिची तब्येत बिघडली तिला चक्कर येऊ लागले होते जीव कासावीस होऊन मळमळुन आले. ती धावतच बाथरूम कडे गेली सुमेधाची तब्येत पाहून राघव घाबरला त्वरित तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला लेडीज डॉक्टरने चेकअप केले आणि सांगितले राघव तुम्ही आता बाबा होणार आहात. आनंदाची वार्ता होती. डॉक्टर म्हणाली सुमेधा आई होणार आहे तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल राघवने आनंदाने डॉक्टरच्या सर्व गोष्टी मान्य केल्या होत्या.


(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama