भाग 54 --- रूनुझूनु पैंजनाची"..कादंबरी
भाग 54 --- रूनुझूनु पैंजनाची"..कादंबरी
भाग 54 --- रूनुझूनु पैंजनाची"..कादंबरी"..
सुमेधाच्या बाबतीतही तसेच काहीतरी तिची सहनशीलता काटेकोरपणे तिला जराही ढळू देत नव्हते...…. निस्वार्थपने कर्म करत सुमेधाचे आयुष्य चालले होते.....
खूप कमी माणसं केलेल्या मैत्रीला शेवटच्या क्षणापर्यंत निभावतात
वेळ सरली तरी दुर्दैवाने इतर नात्यांप्रमाणे "मैत्री" गरजेनुसार बदलण्याची सवय ज्यांना नसते ते "तिथेच" अडकून पडतात आणि एकाकी होतात.
मैत्रीचा पाया आपल्या विचाराने कितीही मजबूत असला तरी "वेळ आणि गरज" नावाचे जादुगार तो खिळखिळा करताना आपल्या भावना आणि वेदना दोघांचाही विचार करीत नाहीत.....
एकाकी प्रवासात सोबत गरजेची असते.आयुष्यात ही सोबत करणारे मित्र मैत्रिणी हे कधी फुलासारखे तर कधी फुलपाखरांसारखे येतात... फुलासारख्या मैत्रीची सुरवात हळूवारपणे होते कालांतराने ती पूर्णपणे बहरते पण मग जशी जशी नात्यांची प्राथमिकता बदलते, कर्तव्य आणि व्यवहार याचा ताळमेळ बसविण्यात वेळ जावू लागतो तशी तशी जीवापाड जपलेली "मैत्री" देखील कोमेजू लागते......
दोष कुणाचाही नसतो तरी जो मैत्रीला जपण्यासाठी धडपडतो त्याच्या मनात खंत ही रहातेच की "त्याच्याकडे वा तिच्याकडे आता आपल्यासाठी वेळ नाही"...मग हळूहळू तोही "त्या" मोहातून बाहेर पडतो..…...
कितीतरी असे संवाद तिच्या मनात सारखी घालमेल करून तिला स्वस्त बसू देत नव्हती ना शांत झोप लागत होती....
निरागस रिया स्वप्न बघता बघता झोपी गेली होती...!!
खरंतर स्वप्न ही संकल्पनाच किती मजेशीर असते! आपल्या कल्पनेतून आपल्याला हवं असलेलं सुंदर विश्व निर्माण करायचं स्वप्नातल्या या विश्वात मखमली रस्त्यावरून चालायचं अगदी नकळत्या वयापासून स्वप्नांची ओढ मनाला लागलेली असते...
नकळत वयासोबत स्वप्नांचं विश्व सुद्धा बदलत जातं असंच हे स्वप्न कोवळ्या वयात जपलेलं, युवक युवती तारुण्यात येतात तेव्हा नक्कीच बघतात तारुण्याचे हे दिवस म्हणजे फुलपाखरांसारखे रंगांनी रंगलेले,गंधाने माखलेले,प्रत्येकच गोष्ट काव्यमय वाटावी असे हे मंतरलेले गुलाबी दिवस.....!!
असे हे स्वप्नांत गुंगणारे दिवस पुन्हा स्वप्नातच पोचवणारे कुणाची तरी स्वप्नात येण्याची दिवसरात्र वाट बघणारे पण सगळीच स्वप्नं खरी कुठे होतात ! खरं तर कुठलीच स्वप्न खरी होत नसतात किंवा ज्यांची स्वप्न खरी होतात त्यांनी स्वताला भाग्यवंत समजावं.
डोळ्यांच्या अथांग डोहात कितीतरी स्वप्न बुडालेली असतात. काही अप्राप्य बनलेली एखाद्या निवांत क्षणी डोळ्यातली ही स्वप्न मनाला खुणावतच असतात. आभाळात दिसणाऱ्या चंद्रकोरी सारखी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापेक्षाही ही चंद्रकोर मनाला आकर्षून घेत असते कदाचित तिची भंगलेली अवस्था , आपल्या मनाची समजूत घालत असते आणि तसं पाहिलं तर स्वप्न प्रत्येक वयात आपली साथ देतात. पण तारुण्यातले स्वप्नं मात्र एक वेगळाच रंग घेऊन येतात. परी कहानीत रमणारं हे वय वास्तवा पासून दूर, स्वप्नांच्या जगात रममाण झालेलं असतं.....!!
मावशीचे उपदेश:- समाजामध्ये राहत असताना एकमेकांशी विचारांचे आदानप्रदान होणे ही एक सहज बाब आहे. मात्र हा संवाद साधत असताना बऱ्याचदा आपण त्याचे विज्ञान किंवा मानसशास्त्र समजून घेतलेले नसते. घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी, मित्र परिवारामध्ये तसेच नातेवाईक यांच्याशी चांगले संबंध राहायचे असतील तर व्यक्तीमधला संवाद हा सुसंवाद कसा करता येईल ते जाणून घेणे आवश्यक आहे.....…!!!
दूर असूनही जवळ असण्याची भावना - हीच प्रेमाची खरी परीक्षा आहे. अंतर असलं तरी मनं जोडलेली असतात. शारीरिक दूरी मानसिक जवळीक कमी करू शकत नाही.
दूर असलेल्या प्रेमात एक वेगळाच सौंदर्य आहे. प्रत्येक संदेशाची वाट पाहणं, प्रत्येक कॉलची उत्सुकता, पुन्हा भेटण्याची आस - या सगळ्यांत एक गोडवा आहे......!!
अंतर असलं तरी विश्वास असतो. विश्वास की आपण एकमेकांसाठी आहोत, की ही दूरी तात्पुरती आहे. हा विश्वास प्रेमाला मजबूत करतो ,दूर असताना प्रेम अधिक जाणवतं. भेटीची किंमत कळते. एकत्र असलेला प्रत्येक क्षण मौल्यवान होतो. दूरीमुळे प्रेम कमी होत नाही, तो अधिक खोल होतो....!!
आपण पाहतो की ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी किंवा एखादा अधिकारी सर्वांचा आवडता असतो. तो समोरून आला की सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, स्मित येते. त्याने एखादे काम करायला सांगितले तरी आनंद वाटतो. त्याचवेळी असे काही जण असतात की प्रत्येक जण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. हे असे का होते? त्याच्या मागे काही कारण आहेत का..!...याचा पण विचार करता येऊ शकते.....!!
प्रत्येक व्यक्तीची संवेदना वेगळ्या प्रकारची असते त्यांचे काहींना ध्वनीची संवेदना जास्त असते. काहींची ड्राइंग,कलर पेंट , फिगर संबंधी जास्त असते. तर काहींची भावना संबंधी संवेदना जास्त असते तर त्याच्या संवेदनानुसार संवाद साधला जाउ शकतो त्यास मिळणारा प्रतिसाद चांगला मिळू शकतो......!!
समोरचा व्यक्ति आपल्याला काहीतरी सांगत आहे तर अशा वेळी मोबाईल फोन पहात राहणे योग्य आहे का? डोळे वर करून पहाणे सुद्धा कुणी टाळत असतो त्याच्या मनातली भावना पुढील व्यक्ती पटकन ओळखतो की तो आपणास टाळत आहे प्रत्येक व्यक्तीचे आपापले अंदाज असतात त्यामुळे आपले नाते कमकुवत होत जाते मान अपमान मनामध्ये घर करतो....
त्याऐवजी जर आपण हातातील सर्व काम बाजूला ठेवून नजरेला नजर घेऊन शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐकून घेतले, त्यावर योग्य प्रतिसाद दिला तर तुमचे नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते.
मावशीचे उपदेश:- कौटुंबिक संबंध निकोप ठेवण्यासाठी सर्वांनी एक वेळ तरी एकत्र जेवण करणं गरजेचं असतं. जेवताना मोबाईल नको, समोर टीव्ही नको तर सर्वांनी एकमेकांशी बोलायला हवं. जेवताना लहान मुलांना काहीतरी सांगायचं असतं, रोज ते काहीतरी शिकत असतात. त्यांचं कौतुक केलं की ते खूश होतात. गृहिणीला पण काहीतरी शेअर करायचं असतं. ते ऐकून घेतलं तर त्यामुळे कुटुंबाचे बंध मजबूत होऊ शकतात. ज्या घरांमध्ये हे घडत नाही, त्या घरातील नातेसंबंध हळूहळू दुरावतात......!!
व्यावसायिक नातेसंबंधात देखील संवाद महत्त्वाचा असतो. वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सुदृढ नातेसंबंध व्यवसाय मोठा करण्यास हातभार लावतात. तसेच ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणारा उद्योजक हळूहळू मोठा होत जातो. समोरच्या व्यक्तीच्या मतांचा योग्य प्रमाणात आदर ठेवला, मतभेद असेल तर त्यावर योग्य शब्दात चर्चा केली तर त्यातून मार्ग निघतो.
एकूणच समाजामध्ये राहताना आनंदी राहायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर सुसंवाद व लक्ष देऊन ऐकणं ही यशाची पहिली किल्ली आहे.......!!
©® मीनाक्षी कीलावत (अनुभूती) वणी
.........क्रमश: ......

