Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग 6"रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग 6"रूनझून पैंजनाची"कादंबरी

7 mins
134


सुमेधा सासरी पोहोचली होती, जेवण करून रात्री झोपायला गेली.तसाच राघवचा फोन आला होता त्याच्याशी बोलून निवांत झोपी गेली होती..

दुसऱ्या दिवस उजाडला होता ती पहाटेला लवकर उठली हा दिवस सुमेधासाठी खुप आनंदाचा होता राघव आज घरी परतणार होता. सुमेधाने सडा टाकून रांगोळीमधे अनेक रंग भरले सुंदर रेखिव रांगोळी अंगनात सजविली आणि आंघोळीला गेली.

बेसन , हळदी, मलईचे उटणे कोमलतेने सर्वांगावर लावून ती मनसोक्त न्हाली होती. आपल्या अवयवा वरती अलगद हात फिरवून त्या कोमल स्पर्शाचा अनुभव घेऊन मनाशीच म्हणाली सुमेधा खरंच तू फारच सुंदर आहे बरं का तुला ईश्वराने भरभरून सौंदर्य दिले आहे.

स्वत:च ती आपल्या सौंदर्याची मनोमनी तारीफ करीत होती मनाशीच म्हणाली! तू आपल्या राजाला खूपच आवडली आहे तुझा राघव तुझ्याविना कधीच राहू शकणार नाही ,परंतु तो तर माझ्या पासून दूर गेला मला निष्ठुरच वाटतो बाई, असा मला एकटीला आपल्या विरहात सोडून गेला. ते ही एका अर्थाने बरेच झाले म्हणा दूर राहून मला माझे प्रेम कळले ना,तसेच आमचं एकमेकांवरच प्रेम जन्मोजन्मीचं आहे ही गोष्टही तेवढीच सत्य आहे.आता बघ मी त्यास आपल्या प्रेमात कशी बांधून ठेवते ,येवूच दे त्याला घरी!

अशी अनवरत मतांतर सुरू असतांना हळूच आपल्या बांधेसूद शरीराकडे बघून आरशासमोर स्वतःचे प्रतिबिंब बघून लाजली व पूर्ण शरीर पुसून काढले .

 छानशी गुलाबी रंगाची ठेवणीतील साडी घातली त्यावर लाल बुट्टीची फुलदार डिझाईन होती ती साडी सुमेधाला खूप आवडायची, नाजुकसे दागिने घातले नीट नेटकी तयार होऊन ती बाकीचे कामे करायला सज्ज झाली.

तिला पहिल्या रात्रीची आठवण झाली राघवाच्या आवडी-निवडीचा ती सतत विचार करीत होती त्याच्या खाणपाणाबद्दल ही विचार करीत होती त्यास कोणता पदार्थ आवडतो याची तिला आताशी पुर्ण कल्पना होती. तसा राघव बऱ्यापैकी खादाड होता हे तिने बघितले होते दूध तूप त्याला प्रिय होते ते लक्षात घेऊन तिने रात्रीच दूध फाडून पनीर तयार केले होते तेवढ्यातच राजीव म्हणाला! मी दादाला घ्यायला बसस्टॅन्डवर निघालोय आता पटकन घेऊन येतोय दादाला आणि तो निघून गेला.

 लवकरच राजीव राघवला घेऊन घरी आला आई त्वरेने बाहेर आली व म्हणाली, कसा आहेस माझा बाळ आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली आईच्या डोळ्यात अथाह ममतेचा सागर लहरत होता. राघवने आई बाबाचे चरण स्पर्श केले व घरात आला.

  किचनच्या दारामागुन सुमेधा राघवला बघत होती राघव ने एकदाही तिकडे बघितले नाही. तरी त्याला माहित होते सुमेधा तिकडे असेल म्हणुन ,सर्वांनी मिळून जेवण केले खूप गप्पागोष्टी केल्या नंतर सर्व आपापल्या कामाला लागले राघव म्हणाला! आई मी माझ्या मित्रांना भेटून येतो काही काम वगैरे तर नाही ना? आई म्हणाली जाऊन ये ,लवकर येतो म्हणून राघव निघून गेला आवराआवर करून सुमेधा आपल्या रूममध्ये गेली आणि उदास होऊन चुपचाप बसली व रागात म्हणाली इतक्या दिवसानंतर माझा प्रिय पती आला आणि माझ्याशी न बोलताच बाहेर गेला ,ही तर हद्द झाली ती सारखी मनातून तडफडत होती. आतल्या आत जाम वैतागली होती. एक शब्दही माझ्याशी बोलता आला नाही मी इतके दिवस चातका सारखी वाट बघत होते त्याची , कशी आहेस म्हणून सुद्धा मला विचारलं नाही ,आणि माझ्याकडे एक नजर सुद्धा टाकली नाही फोनवर तर खूप बोलतोय,

वेणीला लावलेला गजरा कोमेजून गेला होता तो तिने झटक्यात काढला व त्या फुलाच्या पाकळ्या कुस्करून जमिनीवर टाकू लागली तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. किती रडतेस सुमेधा! राघवचा आवाज कानावर पडला तशिच ती बावरली, पटकन नजर फेरली दुसरीकडे पाहू लागली, तोच राघव आपल्या ओठाने तिच्या अश्रुचे थेंब टिपायला लागला होता. उष्ण गरम ओठ सुमेधाला आतून सुखावून गेलेत पण मुखातून ब्र शब्द न बोलता तिने मौन धारण केले.

राघवने झडप घातल्यागत दोन्ही हाताने तिला आपल्या बाहुपाशात घेतले व तिच्या मस्तकावर ओठ ठेवून मेघमल्हार सारखा तटस्थ उभा राहिला स्तब्ध वातावरणात दोन हृदयाचे धडधडणारे स्पंदन अन् उष्ण श्वासोश्वास भावविभोर मनस्थिती दहा मिनिट राघव तसाच उभा होता.वितळणारा गारवा तना-मनाला विभोर करीत होता. 

सुमेधाचे डोळे बंद होते तरी जसा तप्त उन्हात दरवळणारा सुगंधाचा झोका तिला धुंद करीत होता.ती आपल्या श्वासातून आत रंध्रा रंध्रात भरून रोमांचित होत होती .दोघांचीही मनोदशा मद्यप्यासारखी झाली होती . "सुमेधाचा राग पार लयाला जाऊन शीतल सरीतेच्या निर्मळ जळाच्या धारे प्रमाणे सरपट धावत सागराला आपल्या कवेत घेण्याची इच्छा बळावली होती.आताशी ती शितलतेचा अनुभव करीत होती. आदरांकित नजरेने राघव कडे बघत होती तिचा राग केव्हाच निर्मळ पाण्यासारखा वाहून गेला होता. राघव म्हणाला, काय ग सुमू माझा राग आला होता ना तुला, बापरे काय तापली होतीस गं तू मी जर का थोडा वेळ अजून आलो नसतो तर तू स्वतःची काय जाळून नुसती राख केली असती कां?

    त्यावर सुमेधा म्हणाली मग तुम्ही असे निष्ठूरासारखे का वागलेत माझ्याशी?

 राघव म्हणाला ! अग तू समजून घे ना मला ,असं आई-बाबा समोर तुझ्याशी कसा बोलणार , पुन्हा आपलं नवीन लग्न झालेलं त्यात असा हशा व्हायला नको म्हणून मी काळजी घेतली, नाहीतर बायकोचा दादला म्हणून हशा झाला असता आपला, अग बाई ! खरंच की हो ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही ..

राघव म्हणाला !

पटलंय ना तुला माझं म्हणणं ?

सुमेधा म्हणाली ! तुम्ही तर फारच ग्रेट आहात बुवा. 

मी आलेच बसा तुम्ही चार वाजलेत बाबांची चहाची वेळ झालेली आहे मी चहा मांडते तुम्ही घेणार ना चहा ?ती पटकन बाहेर गेली.

 सर्वांचा चहा झाला आई म्हणाली ! राघव सुमेधाला आपल्या वाडीत घेवून जा फिरायला तिचे संध्याकाळ थोडे फिरणेही होईल तसेच तू गेल्यापासून सुमेधा कुठेच गेलेली नाही.

राघवने लगेच होकार दिला ,आणि म्हणाला चल सुमेधा तुला वाडी दाखवून आणतो आणि राजीवला म्हणाला, गाडीमध्ये पेट्रोल तर आहे ना ,

राजीव म्हणाला !

होय दादा ही घे गाडीची चाबी, म्हणत चाबी दिली .

आई म्हणाली ! राघव आज जवळची वाडी दाखवून दे सुमेधाला उद्या आपण सर्व आपल्या मणगावच्या शेतात डबा घेऊन जाऊया आणि दिवसभर तिकडेच घालवूया,आता या तुम्ही.

 सुमेधाला गाडीवर घेऊन राघव वाडीच्या दिशेने निघाला तसेच रस्ता ओबड धोबड होता ,राघव म्हणाला मला पक्के धरून बैस नाहीतर पडशिल , आता जवळच आली आहे आपली वाडी तिथून आपण पायी जाऊया तिकडे गाडी जाणार नाही.

सुमेधा प्रथमतः राघवच्या गाडीवर बसली होती आणि

जरा हळू चालवा म्हणून सतत सांगत होती.

राघव म्हणाला ! तुला भीती वाटते कां गाडीवर 

सुमेधा म्हणाली ! भीती नाही वाटत हो,तुम्ही आहात ना सांभाळायला ! जर सांभाळणारा असला तर पडण्याची काय भीती, वाडी येईपर्यंत सतत बोलत राहिली एव्हाना सुमेधा खुलत चालली होती.गाडी थांबली राघव म्हणाला! चला आता ही बघा आपली वाडी आली. काळी माती बघून माहेरची आठवन झाली. तिला आवडायचे शेतशिवारात जायला तिच्या माहेरी पण शेतीवाडी होतीच तिथे कधी आईसोबत,भावंडासोबत कधी प्रंशात सोबत जायची खूप मस्ती करायची पण ते तर माहेर होते.तिथली गोष्टच काही और होती.चालता-चालता तिला आठवणीने घेरले.

लहान असतांना किती मजा केली. इथे काय तसं थोडंच करता येईल, गारगार वारा जिकडे तिकडे हिरवळ पाण्याचा ओहळ ,तुषार सिंचन ,चिमन पाखरांचा कलरव ,गुरांच्या गोठ्यात बैलांच्या गळ्यातील घुंगरूंचा नाद ,मोहक सुंगध , सर्व कसं मोहून टाकणारं वातावरण होतं, मृदगंध दरवळत होता सुमेधाने भरभरून श्वास घेतले ,गोलगोल गिरक्या मारून इकडून तिकडे भरधाव चालायला लागली. इकडे सगळीकडे पाणीच पाणी होते एरीगेशन केलेलं होतं .

राघव म्हणाला!

बघ इकडे तिकडे जाऊ नको माझ्या मागेमागे ये, सुमन मुकाट्याने राघवच्या मागे मागे चालू लागली.राघव सांगू लागला इकडे संत्री-मोसंबीची बाग आहे .उन्हाळ पीक म्हणून आम्ही गहू आणि चना पेरत असतो त्या बाजूला अमराई आहे सर्व प्रकारची आंब्याची झाडे आहेत तिकडे धुर्‍यावरती चिंचेचपण झाडं आहे . विशेष म्हणजे चंदनाची ,खजुराची पण दोन-दोन झाडे आहेत केळी,पेरू लिंबू अंजीर ही झाडेपण आहेत फार काळजी घ्यावी लागते म्हणून जास्त लावली नाही बाबा काय काय करणार राजीव शिकतो आहे तरीपण थोडीफार मदत तो करतोय बाबाला.

तेवढ्यात आ ~आ ~ आईग च्या आवाजाने राघव दचकला

काय झालं सुमु आणि धावतच तिच्याजवळ आला

काही नाही हो पाय खड्ड्यात पडला राघव म्हणाला तुला वारंवार सांगितलं होत नां. त्यास चिंता झाली त्याने विचारले खूप काही लागलं नाही ना?

 चल तुला उचलूनच घेऊन जातो आणि पटकन तिला आपल्या खांद्यावर अलगद उचलले तिला खूप बरे वाटत होते किती काळजी घेतो राघव माझी आणि मनातल्या मनात मिश्किल हसली.

तिथे शेतीचे अवजार बैलबंडी एक पाण्याचा माठ इतर भांडे पण होती.

सुमेधा म्हणाली !. इथे कोणी दिसत नाही.

राघव म्हणाला! गडी आहे पण सुट्टी घेतली असेल त्याने. किंवा रात्री येईल तो ,इथेच झोपतात गडी ,उभ्या मालाला कुणी छेडायला नको म्हणून जागली करतात .वरती मळ्यावर झोपतात आणि तिथून चौफेर नजर ठेवतात.सुमेधा म्हणाली आपण चढायचं का वरती माळ्यावर ?

राघव म्हणाला .!.अग तुझ्या पायाला लागलय ना ?

सुमेधा म्हणाली!.

आता बरा झाला आहे माझा पाय आणि सर सर वरती मळ्यावर चढाया लागली राघव म्हणाला हळू जा वरती मी पण येतो आहे. वरती माळ्यावरून चारही बाजूला सुमेधा पाहू लागली थंड वारा सुटला होता. लालभडक लाली सूर्यास्ताची वेळ पश्चिमेला अस्त होतानाचे सुंदर दृश्य ती भावविभोर होवून बघण्यात दंग झाली.मनाला भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य रंगीत आवर्तने घरट्याकडे जाण्याच्या तयारीत चीमन पाखरे बघून त्या दृश्यात ती हरवुन गेली होती.

राधव अलगद मागाहून तिच्या लांबसडक वेणीला आपल्या हातावर गुंडाळून पाठमोरी आकृती निहारत होता ,तिच्या गोऱ्यापान मानेवर राधवने आपले ओठ टेकले, तेव्हा सुमेधा दचकून चेहरा फिरवणार तेवढ्यातच राघवने तिचे ओठ आपल्या ओठात घेऊन चुंबनाची झडी लावली होती.

रेशीमलडी सारखी अलगद त्यात सुमेधा वाहवत होती.

असले सुंदर क्षण सुरेख जीवनानुभव देणारे होते. हळू आवाजातच तिने अनुनय विनय केले..

राघव सोड ना मला नशेत असल्यागत आवाज अडखळत होता सर्वांगावर रोंमाच उभे झाले होते .

तिची विरोध करण्याचा क्षमता लयाला गेली होती. दोघेही रती मदनाच्या बाणाने घायाळ झालेले होते. अंगाअंगावर राघवच्या ओठाचे ठसे होते एकही अवयव त्यांनी सोडला नव्हता.दोन जीवाचे प्रणयाराधन दिनदुनियेचा विसर पडलेला होता.परंतू त्या मधुरसात डुबलेले लव बर्ड्स कुणाचीही तमा न बाळगता आतुरतेने एकजीव झालेली होती.

वनराईच्या सानिध्यात निसर्गाच्या साक्षिने घालवली होती.गार वारा वृक्षवल्ली फुले फळे सर्वांनी त्यांचे मधुमीलन आनंदाने बघितले असेल , या मैफिलीत ते ही मनसोक्त रंगले असेल कदाचीत ,ही दुसरी मधूचंद्राची भेट होती....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama