Author Sangieta Devkar

Drama Romance

4.6  

Author Sangieta Devkar

Drama Romance

बैरी पिया

बैरी पिया

8 mins
698


अरे माझा प्रोजेक्ट होता तो मी किती कष्ट घेतले त्या साठी आणि आता माझ्या कडून काढून त्या पार्थला दिला हे सगळ पॉलिटीक्स आहे बॉस च दूसर काही नाही. अर्जुन कॉल वर त्याच्या मित्राशी बोलत होता. कॉल वर बोलत होता आणि कार ही ड्राइव्ह करत होता. त्याच्या विचारात तो डिस्टर्ब होता. अचानक एक मुलगी त्याच्या कार समोर आली म्हणजे ती रोड क्रॉस करत होती सिग्नल पडला होता पण याच लक्षच नवहत. तिला बघून अचानक याने ब्रेक दाबला. ओ मिस्टर दिसत नाही का तुम्हाला? मीरा त्याच्या कार जवळ येत म्हणाली. समोर अर्जुन ला बघून क्षणभर गप्प झाली. तो ही तिला बघून ब्लँक झाला. मीरा तू? आय एम सो सॉरी. खरच लक्ष नवहत माझं. ईट्स ओके अर्जुन. तिच्या सोबत एक लहान मुलगी ही होती. मीरा मी सोडू तुला कुठे जायचे? नको अर्जुन मी जाईन. प्लिज मीरा अर्जुन ने रिक्वेस्ट केली मग ती तयार झाली. मग ती कार मधये बसली आणि छोटी सई पण तिच्या मांडीवर बसली. मम्मा हे कोण आहेत आपण का यांच्या कार मध्ये बसलो सई ने विचारले. सई हे अंकल आहेत आपल्याला घरी सोडतील. मीरा ही तुझी मुलगी? हो अर्जुन . सेम तुज्या सारखी दिसते. हम्मम आय नो.

तू लग्न केलेस मीरा? अर्जुन मला माझ्या बद्दल काही ही बोलायची इच्छा नाही ना तुला काही सांगायची . तो अधिकार ही तू गमावला आहेस.मीरा प्लिज इतकं पण रूड नको बोलू ग. अर्जुन झालया गोष्टी आता पुन्हा उगळत बसू नको. सगळं मागे टाकून मूव्ह ऑन झालेय मी. मला त्या आठवणी सुद्धा नको आहेत. अर्जुन थांबव इथे गाडी उतरते मी. मग त्याने कार थांबवली थँक्स अर्जुन. मीरा एकदा भेटशील प्लिज मला बोलायचे आहे. नो अर्जुन. मग मीरा सई चा हात धरून निघून गेली. अर्जुन थांबला होता मीरा कुठे राहते बघायला पण मीरा पुढे जाऊन एका कॉर्नर वरून वळून गेली त्यामुळे ती नेमकी कुठे राहते हे त्याला नाही समजु शकले. मग निराश होत अर्जुन तिथून निघाला. मीरा घरी आली पण आज दोन वर्षांनी अर्जुन ला समोर बघून तिचा बांध फुटला. प्रेम करत होती ना जीवापाड त्याच्या वर. तो म्हणेल ते सगळं करत आली त्याच्या साठी. त्याला नाही म्हणणं तिला कधीच जमलं नाही. पण अचानक आलेलं तिच्या आयुष्यातल वादळ तिने एकटीने पेललं तेव्हा अर्जुन नवहता सोबत. किती त्रास यातना तिने सहन केल्या. आई वडिलांशी नातं तुटलं फक्त अर्जुन मूळे आणि त्याला काहीच किंमत नवहती तिची ना तिच्या प्रेमाची. अर्जुन जणू वादळ बनून तिच्या आयुष्यात आला आणि त्यात तिला एकटीला टाकून निघून गेला, ती काय करेल आपल्या शिवाय कशी जगेल याचा त्याने अजिबात विचार नाही केला. आणि तोच अर्जुन मला भेटायचं म्हणतो? का भेटू मी तुला अर्जुन आणि कशा साठी? मी खेळणं नाही रे तुझ्या मनात आलं तू जवळ करणार आणि तुझं मन भरले की दूर करणार. ती स्वहताशी बोलत रडत होती. सई होती म्हणून ती जगत तर होती.

अर्जुन ही इकडे मिराच्या आठवनीत जागा होता. मी मीरा सोबत ख़ुप चुकीचा वागलो माझ स्वप्न माझ करियर याच्या पुढे मीरा च निरागस प्रेम मला दिसलच नाही. एका क्षणात तिचे प्रेम लाथालाडले मी . तिचा तिच्या भावनांचा विचार केलाच नाही. ती एकटी काय करणार याचा ही विचार नाही केला.ख़ुप स्वार्थी बनलो होतो मी. आता तीची माफी मागायला हवी. ब्रेकअप केल्या नन्तर तिची साधी चौकशी पण नाही केली कधी. इतका मी निष्ठुर कसा काय वागलो. अर्जुन या विचारात कधी तरी झोपी गेला. मीरा बैंक मध्ये आली होती तीच काम होत . गर्दी ख़ुप होती त्यामुळे बैंकेत थांबने भाग होते. ती बसली होती चेयर वर. अचानक बैंक मैनेजर ने पियून ला आवाज दिला पाणी घेवून ये बोलले पटकन. त्यांच्या केबिन मध्ये असणारी व्यक्ति अचानक त्यांना चक्कर आली होती. पियून पाणी घेवून गेला. मैनेजर ने परत त्याला सरबत आनायला सांगितले. मि. अर्जुन तुम्ही ठीक आहात का? मैनेजर अर्जुन ला विचारत होते. त्यांच् बी पी हाय झाले होते. सरबत घेऊन जरा अर्जुन ला बरे वाटले. तुम्ही घरी जाल ना व्यवस्थित मैनेजर ने विचारले. ओके आय एम फाइन अर्जुन बोलला. मग त्याला मैनेजर केबिन बाहेर घेवून आले. मि. अर्जुन तुम्ही ड्राइव्ह करत नका जावू मी तुमच्या साठी कँब बुक करतो . यू नीड रेस्ट. नको मी ठीक आहे आय विल मैनेज सर डोन्ट वरी अर्जुन बोलला. त्याला बघुन मीरा त्याच्या जवळ आली. काय होतय अर्जुन ऐनी प्रोब्लेम? मैडम तुम्ही यांना ओळखता का मैनेजर ने तिला विचारले. हो मी ओळखते. मग चांगलेच आहे. हे अर्जुन आमचे टॉप कस्टमर यांचे बी पी मे बी हाई झाले आहे तुम्ही यांना घरी सोडाल का मिस? हो सर मी सोड़ेन म्हणत मीरा अर्जुन सोबत बाहेर आली. तो पर्यंत मैनेजर साहेबांनी कैब बुक केली होती पाच मिनिटात कैब आली. मीरा अर्जुन त्याच्या घरी आले. घरी कोणीच नाही बघुन मीरा म्हणाली अर्जुन एकटाच राहतो का? हो स्वयपाकाला मावशी येतात. पण तुझे बी पी हाई कसे झाले ? ते मला बी पी चा त्रास आहेच सकाळी मी टैबलेट घ्यायला विसरलो. ओके आता घे मीरा म्हणाली. तू जेवुन रेस्ट कर अर्जुन मी निघते. मीरा प्लीज तू ही जेव माझ्या सोबत आणि मला तुझ्याशी बोलायचे ही होते थोड़े. मीरा ख़ुप प्रेम होत तीच अर्जुन वर आणि आता तो प्लीज म्हणतो आहे जो व्यक्ति ज्याने कधी प्लीज किंवा सॉरी हे शब्द ख़ुप कमी वेळा बोलला असेल तो अर्जुन आज वेगळाच भासला तिला. ठीक आहे म्हणत ती ही थांबली. दोघांनी जेवण केले. मीरा मला तुझी माफी मागायची आहे ग प्लीज मी तुझा गुन्हेगार आहे. पुन्हा कधी तू भेटणार नाही माहित सो आय रियली सॉरी फ़ॉर ऑल. मला तुझी माफी मागन्याचा पण अधिकार नाही. मी लायक ही नाही तरी ही माझ्या समाधाना साठी मला एकदा माफ कर.

अर्जुन तुला कल्पना तरी आहे का रे गेली दोन वर्ष मी कस जगत आले. कोणत्या वादळाला सामोरी गेले . एकटी ने कसे दिवस काढले . तुला माफ करण ख़ुप सोप आहे रे पण त्याने मी भोगलेल्या यातना कमी नाही होणार रे. मीरा मी चूकलो मला मान्य आहे माझी चूक. अर्जुन तू वादळ बनून माझ्या आयुष्यात आलास आणि एकटी ला पुन्हा एका वादळात सोडून गेलास.

आज ही तो दिवस मला आठवतो .......नेहमी प्रमाणे तुला भेटायला मी आले होते अर्जुन मी प्रेग्नेंट आहे. मीरा काही काय बोलतेस. अर्जुन खरच बोलते आहे मी. मग अबॉर्शन करून घे मीरा कारण आताच मी लग्नाच्या फंदात नाही पडणार मला माझ करियर आहे ख़ुप स्वप्न आहेत माझी. ख़ुप पुढे टॉप ची पोझिशन मिळवायची आहे. त्या नन्तर आपण लग्न करू. अर्जुन यात कीती दिवस जातील हे तुला माहित आहे? आणि लग्न झाल्या वर करियर होत नाही असे कोणी सांगितले. आता ही चांगला जॉब आहे तुला मी ही जॉब करते. मीरा तुला नाही माहित बाहेर ख़ुप कॉम्पिटिशन आहे त्यात टिकून राहायला ख़ुप काम आणि डेडीकेशन हवे. अर्जुन तू लग्न करणार आहेस की नाहीस. मीरा मी बोललो तुला आता लग्न पॉसिबल नाही तेव्हा हे मूल नको ठेवूस नन्तर ही तुला मूल होतील. आता तू ही करियर वर फोकस कर. म्हणजे अर्जुन प्रेम भावना याला काही कीमत नाही तुझ्या लेखी तुला फ़क्त पैसा आणि स्टेटस हवे आहे. मीरा उगाच इमोशनल फूल नको बनुस प्रैक्टिकली विचार कर. तुला जमते तसा विचार करायला अर्जुन मला नाही. मग काय करणार आहेस तू मीरा? मी या मुलाला जन्म देणार तू साथ दे अगर नको देवूस. मीरा आर यू क्रेजी? पुन्हा एकदा विचार कर. माझ ठरले आहे अर्जुन मी अबॉर्शन नाही करणार. आणि गुड़ बाय पुन्हा मला भेटण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. मीरा ऐकुन तरी घे माझ अर्जुन तिला आवाज देत होता पन मीरा निघुन गेली. त्या नन्तर त्याने ख़ुप वेळा तिला कॉल केला मेसेज केला पण तिने रिप्लाय नाही दिला. त्यांच् ही प्रेम होतच मीरा वर पन सध्या च्या परिस्थितित त्याला लग्ना पेक्षा करियर महत्वाच होत. नन्तर मीरा ने तिचा फोन नम्बर ही चेंज केला. आता अर्जुन ला तिला संपर्क साधता येणार नव्हता. एकदा तिच्या घरी ही गेला पण मीरा इथे राहत नाही अस तिचे आई वडील बोलले. मग अर्जुन चा नाइलाज झाला. त्या नन्तर आता दोन वर्षांनी मीरा त्याला अचानक भेटली होती. मीरा च्या आई वडिलांनी ही तिला अँबोर्शन चा सल्ला दिला पण तिने साफ नकार दिला मग तिने आई वडिलांची बेइजती होऊ नये म्हणून घर सोडले आणि एका वर्किंग वूमन हॉस्टेल मधये राहू लागली. तिथल्या मेट्रन बाई खूप कडक होत्या त्यांना जेव्हा समजले की मीरा प्रेग्नंट आहे त्यांनी तिला हॉस्टेल सोडायला सांगितले. मीरा ने खूप रिक्वेस्ट केली पण त्या आपल्या मता वर ठाम होत्या. मग मीरा ला ते हॉस्टेल सोडावे लागले. एका अनाथ आश्रमात मग ती राहू लागली. नोकरी वर सुद्धा तिला लोक नाव ठेवू लागली. कुमारी माता म्हणून हिनवू लागली. कसे बसे तिचे नऊ महिने पूर्ण झाले. आश्रमातील इतर बायकांनी तिला खूप मदत केली. मीरा कडे असणारे सेविंगज ही आता संपत आले होते. मग तिने नोकरी साठी प्रयत्न सुरू केला. अगोदरची नोकरी सोडली होती. बाळा ला आश्रमात ठेवून ती रोज नोकरी साठी वणवण फिरत होती. मग एके ठिकाणी तिला जॉब मिळाला. सई वर्षाची झाली मग तिने आश्रम सोडण्याचा विचार केला कारण सई ला त्या वातावरणात तिला मोठं करायचं नवहते. एके ठिकाणी एक वृद्धा राहत होत्या त्यांची मुल परदेशी होती. त्यांच्या बंगल्यातल्या दोन रूम मिराला रेंट ने मिळाल्या. सई ला पाळणाघरात ठेवून मीरा जॉब वर जायची संध्याकाळी सई ला घेऊन घरी यायची असा तिचा दिनक्रम ठरला होता.

हे सगळं अर्जुनला सांगताना मीरा रडत होती. मीरा खरच माझे चुकले माझ्या मूळे खूप त्रास तुला सहन करावा लागला ना. अर्जुन आता जे झाले ते झाले. पण मला प्रायश्चित्त करण्याची एक संधी तर दे मीरा. मीरा माझं आज ही तुझ्यावर प्रेम आहे पहिल्या सारखंच. मी पैसा स्टेस्टस पोझिशन सगळं मिळवलं पण प्रेम करणार आपलं माणूस मला नाही भेटले कोणी. पैशा साठी बरयाच मुली माझ्या मागे लागल्या पण तुझ्या सारख निस्वार्थ प्रेम कोणा कडेच नवहत. मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला पण तू तुझा नंबर ही चेंज केला होतास. मीरा मी लग्न नाही केले रादर करणारच नव्हतो पण आता तू भेटली आणि सई आपलीच मुलगी आहे ना? हो अर्जुन सई तुझीच आहे. मीरा लग्न करशील माझ्याशी ? हो अर्जुन म्हणत मीरा ने त्याला मिठी मारली. खूप दमलेय रे मी अर्जुन सगळं एकटीने सहन केले. संकटे अडचणी यातून एकटीच मार्ग काढत आले. वादळात सापडले होते कोणीच सोबत नवहते अर्जुन. मीरा आता मी आहे कायम तुझ्या सोबत तुला आणि सई ला एकटीला कधीच सोडणार नाही. मला माफ कर मीरा. हो अर्जुन तुला तुझी चूक समजली ना मग केले माफ आफ्टर ऑल आय लव यु अर्जुन. आय लव यु टू मीरा. त्याने तिचे अश्रू पुसले. मीरा सई कुठे आहे मला आता भेटायचे आहे तिला. सई पाळणाघरात असते अर्जुन चल आपण जाऊ मीरा बोलली. दोघे सई ला आणायला बाहेर पडले. मिराच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.

समाप्त  



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama