Author Sangieta Devkar

Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Drama Inspirational

बावरा मन (भाग 4 अंतिम)

बावरा मन (भाग 4 अंतिम)

4 mins
396


तिने एक छान फ़ोटो पोस्ट केला पन आशु ने तो पाहीला ही नाही. इतरांचे कमेट आले पण आशु ची कमेट नाही याच तिला वाईट वाटले. तिचे तिलाच समजेना की हे काय होतय. दोन दिवस आशु आणि मेघा बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी मेघा ला राहवेना तिने आशु ला मेसेज केला. बोल आशु मी नाही राहू शकत तुज्याशी न बोलता. हो मला समजले आहे की मला ही तू आवडतोस. आशु लगेच आला ऑनलाइन बघ आता तुला ही पटले ना मेघा तो म्हणाला. हो आशु आय लाईक यु. मग ते दोघे आपल्याच विश्वात रममाण झाले. मेघा सतत फोन वर असायची. एक दोनदा संदीप म्हणाला पण मेघा हल्ली सारख त्या मोबाईल मध्ये गुंग असतेस. तेव्हा मेघा बोलली हा मैत्रीणी बोलत असतात ना मग रिप्लाय द्यावा लागतो. .आशु मेघा शी सतत प्रेमाच्या गप्पा मारत असे. आपण भेटूया एकदा मला तुला जवळून पाहायचे आहे. फोटोत इतकी सुंदर दिसतेस मग प्रत्यक्षात कशी दिसत असशील? तो असा बोलला की मेघा मोहून जायची. आशु म्हणायचा मेघा तुला मला घट्ट मिठीत घ्यायचे आहे आणि तुझ्या ओठाचे चुंबन घ्यायचे आहे. तो असा बोलत राहायचा आणि मेघा ला ते बोलण आवडत असायचं. तिला ही आशु ला भेटण्याची ओढ लागली होती.

मग एक दिवस धाडस करून मेघा त्याला भेटायला तयार झाली. छान तयार होऊन ती आशु ने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघाली. ती रिक्षा करून निघाली होती. रिक्षा वाला त्याच्या फोन वर कोणाशी तरी बोलत होता. नाही रे मी तिला संधी नाही देणार शेवटी चूक ती चूक. तू सांग तुझ्या बायकोने बाहेर असे लफडे केले असते तर तुला चालले असते का? किंवा माझं काही लफडं असत तर बायकोने मला माफ केले असते का? विश्वास म्हणून काही तरी गोष्ट आहे की नाही. मला नको असली विश्वास घात करणारी बायको. त्याच बोलणं मेघा ला स्पष्ट ऐकू येत होते. तिच्या मनात आले आपण पण आशु सोबत हेच तर करत आहोत. आणि उद्या संदीप ला समजले तर? आणि मुलांच्या मनात आई म्हणून माझी काय किंमत असेल मी असे अविचाराने कसे काय वागू शकते. संदीप मला वेळ देत नाही मूल माझी विचारपूस करत नाहीत कारण ते त्यांच्या व्यापात मग्न आहेत . म्हणून मी अशी त्या फेसबुक सारख्या आभासी जगात रमले मी अशी त्या फेसबुक सारख्या आभासी जगात रमले आणि ही चूक केली आणि आता चक्क आशुतोष ला भेटायला निघाले आहे. नाही हे बरोबर नाही तिच्या मनानेच तिला ग्वाही दिली. संदीप च थोडे आपल्याकडे दुर्लक्ष झाले तर आपण त्याचा विश्वास घात करायला निघालो. रिकामा वेळ म्हणून हे असे उद्योग? आणि उद्या आपली बदनामी झाली तर? तो आशु खरंच विश्वासु आहे का? उद्या काही झालं तर तो मला स्वीकारले का? संदीप आणि मुलां शिवाय मी जगू शकेन का? नाही नाही असे मेघा जोरात ओरडली. तिला घाम फुटला.

अहो मॅडम काय झालं बरे वाटत नाही का तुम्हाला? रिक्षा वाला तिला विचारत होता. नाही मी ठीक आहे दादा असे करा परत रिक्षा माघारी घ्या. बर म्हणत रिक्षा वाला पून्हा माघारी निघाला. मेघा घरा जवळ आली. रिक्षा चे पैसे देऊन घरात गेली. आणि बेडवर पडून रडू लागली. आपण किती चुकीचे वागत होतो याची तिला जाणीव झाली. मन रडुन हलके झाले तसे उठली आणि तोंडावर पाणी मारून स्वतः साठी चहा करून घेतला. चहा घेत विचार करत राहिली. आज मी आशु ला भेटायला गेले असते तर किती मोठा अनर्थ घडला असता माझ्या हातून देवाने वेळीच मला सावध केले. इतक्यात तिचा फोन वाजला विद्या चा होता तिने घेतला कॉल. बोल विद्या काय म्हणतेस. अग मेघा तू कॉलेज मध्ये असताना क्राफ्ट च्या वस्तू बनवत होतीस ना ? ग्रीटिंग, दिवाळी चे दिवे,तोरण,गिफ़्ट बॉक्स तर माज्या शेजारी एक आजी आहेत त्यांना दिवाळी साठी दिवे आणि तोरण हवे होते तू बनवून देशील का? विद्या खूप वर्ष झाली ग आता मला जमेल की नाही काय माहीत. मेघा अग आपल्या कडे असणारी कला कधी ही संपत नाही ग आणि विसरली पण जात नाही.थोडं प्रॅक्टिस केलेस की जमेल तुला. बघ आणि विचार करून सांग मला. मेघा विद्याच्या बोलण्याचा विचार करू लागली. इकडे फोनवर आशु चे मेसेज येत होते तीला नोटिफिकेशन येत राहिले. एक मात्र काळजी तिने घेतली होती की आशू ला आपला मोबाईल नंबर दिला न्हवता. तो खूप मागे लागला होता नंबर साठी पण तिने दिला न्हवता.मग तिने यु ट्यूब ओपन केले आणि क्राफ्ट चा व्हिडीओ बघू लागली. तिला वाटले हो हे तर मी करू शकते मला जमेल. मग तिने मनाशी एक निश्चय केला की मी माझी कला पुन्हा नव्याने सुरु करेन. माझा वेळ या माझ्या कलेसाठी सार्थकी लावेन. फेसबुक चा वापर किती आणि कोणत्या कामा साठी करायचा हे मी ठरवेन. मग मोठ्या आत्मविश्वासाने तिने तिची कला सुरू करण्याचे ठरवले विद्या ला तिने फोन करून सांगितले की ती दिवे आणि तोरण बनवून देईन. तिने फेसबुक ओपन केले आणि आशुतोष ला ब्लॉक करून टाकले. आणि दिवाळी साठी आकाश कंदील,सजावटी च्या वस्तू ऑर्डर प्रमाणे करून मिळतील अशी पोस्ट टाकली.एक मोठी चूक आपल्या हातून होता होता ती सावरली याच समाधान जास्त वाटत होते तीला .

कसे असते ना आयुष्याच्या एका वळनावर एक फेज अशी येते तेव्हा आपण एकटे आहोत. आपल्या साठी कोणाला वेळच नाही. माझी विचारपूस कोण करत नाही असे वाटत राहते. त्यातून रिकामा वेळ भरपूर असतो. सोशल मीडियावर वेळ घालवावा पण किती आणि कसा त्याचा वापर करायचा हे आपणच ठरवायला हवे. काही मोहाचे क्षण येतात तेंव्हाच तर आपली कसोटी असते. शेवटी पुरुष हा शिकारी असतो आपण त्याच सावज बनायचे की नाही हे आपणच ठरवायचे. आणि आपल्यात असलेली कला गुण पुन्हा नव्याने विकसित करायचे. त्या कलेचे रूपांतर छोट्या व्यवसायात पण होऊ शकते. 

 कथा काल्पनिक आहे कशी वाटली नक्की सांगा. लाईक आणि शेयर जरूर करा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama