Sanjay Udgirkar

Drama Others

3  

Sanjay Udgirkar

Drama Others

बाहुल्याचे लग्न

बाहुल्याचे लग्न

10 mins
152


शुक्रवार हा हुस्नाबाद राज्यात सुट्टीचा दिवस. हुस्नाबाद राज्यात शुक्रवार हा सुट्टीचा दिवस म्हणून लागू होऊन आता पंचाहत्तर वर्षे झाली असावीत. 


हुस्नाबाद हे राज्य स्थापन होऊन शंभर वर्षे झाली होती. मिरअबरार अलीने हे राज्य स्थापन केले होते. मिरअबरार अली तुर्कीहुन पाचशे योद्धे घेऊन इथे आला होता. युद्ध करत करत तो या प्रांतात आला होता असे या राज्याच्या इतिहासात लिहिलेले आहे. मिरअबरार अली पट्टीचा योद्धा होता. स्वभावाने अतिशय क्रूर होता. हुस्नाबाद राज्याच्या स्थापनेसाठी मिरअबरार अलीने हजारो लोकांची हत्या केली. मिरअबरार अलीला राज्य स्थापन केल्यावर लग्न करण्याची आवश्यकता जाणवली. राज्याला वारस हवा होता. मिरअबरार अलीने त्याला लग्न करायचे होते आणि त्यासाठी त्याच्या राज्यातील सगळ्यात सुंदर, बुद्धिमान व मिरअबरार अलीशी लग्न करण्यास तयार असलेल्या मुलीच्या घरच्यांनी मिरअबरार अलीशी सरळ संपर्क साधावा अशी राज्यात दवंडी पिटवली.


मिरअबरार अलीने हेही जाहीर केले की तो ज्या मुलीशी लग्न करेल, तिला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. मिरअबरार अली लग्नानंतर राज्याचे आणि राज्याच्या राजधानीचे नाव बायकोचे जे नाव आहे त्या नावावरच ठेवेल हेही जाहीर केले. मिरअबरार अलीने लग्नाआधीच आपल्या बायकोचे नाव हुस्ना बेगम ठेवायचे असे ठरवले होते. 


मिरअबरार अलीचे लग्न झाले व त्याने म्हणल्याप्रमाणे आपल्या नवनिर्मित राज्याचे नाव हुस्नाबाद असे ठेवले. हुस्नाबादच्या राजधानीचे नावही हुस्नाबादच ठेवण्यात आले.


मिरअबरार अली कालांतराने दिवंगत झाला आणि त्याचा मोठा मुलगा राजा झाला. तोही आपल्या वडिलांसारखाच क्रूर होता. कपटी होता आणि त्याच्या राज्यातील नागरीकांना या राजात अजून एक नवीन गुण दिसला, मिरअबरार अलीचा मोठा मुलगा स्त्रीलंपटही होता. मिरअबरार अलीचा मुलगा जास्त दिवस राज्य करू शकला नाही. तो जसा कपटी होता त्याला त्याच्याहून जास्त कपटी शत्रू मिळाला आणि त्या शत्रूने विश्वासघात करून मिरअबरार अलीच्या मुलाचा प्राण घेतला. 


अशाच काही न काही दुर्घटना होत गेल्या आणि मिरअबरार अलीचे चार वंशज अनैसर्गिकपणे दिवंगत झाले. मिरअबरार अली आणि त्याच्यानंतर त्याचे चार वंशज मिळून जवळपास शंभर वर्षे हुस्नाबादवर राज्य केले. मिरअबरार अलीचा सहावा वंशज मिरगफ्फार अली हा होता. मिरगफ्फार अलीमधे त्याच्या पुर्वजांचे फक्त वाईट गुण तेवढेच आले होते. त्याच्याच वंशजाने त्याचा घात लावून खून केला. 


मिरगफ्फार अलीचा मोठा मुलगा मिरसुलेमान हा मिरगफ्फार अलीनंतर हुस्नाबादचा राजा झाला. मिरसुलेमान अली जेव्हा राजा झाला तेव्हा तो फक्त सोळा वर्षांचा होता. मिरसुलेमान अली अतिशय धुर्त, आतल्या गाठीचा, महाकपटी, भित्रा, षडयंत्र रचणारा, अतिशय कंजूस आणि स्त्रीलंपट स्वभावाचा होता. मिरअबरार अलीच्या सर्व वंशजामधे हुस्नाबादवर सगळ्यात जास्त काळ राज्य जर कोणी केले असेल तर ते मिरसुलेमान अलीने. वयाच्या सोळाव्या वर्षी तो राजा झाला आणि वयाच्या शहात्तराव्या वर्षी तो राजा असतानाच त्याचा मृत्यू झाला. तब्बल सत्तर वर्षे मिरसुलेमान अलीने हुस्नाबादवर राज्य केले. मिरसुलेमान अली मेला त्यावेळेपर्यंत मिरअबरार अलीच्या घराण्याचे हुस्नाबाद राज्यावर एकशे सत्तर वर्षांचे अधिपत्य झाले होते. 


मिरसुलेमान अलीची आई ही मिरगफ्फार अलीची अतिशय लाडकी बायको होती. मिरसुलेमान अली एक वर्षाचा असताना तिला मेंदूचा ज्वर येऊन त्यातच तिचा देहांत झाला. मीर गफ्फार अलीने मिरसुलेमान अलीच्या संगोपनासाठी हलिमा नावाच्या एका दासीला नियुक्त केले. मिरसुलेमान अली हलिमाच्या अंगावरचे दुध पिऊनच लहानाचा मोठा झाला. हलिमा मिरसुलेमान अलीची आईच झाली. हलिमाला मिरसुलेमान अली आईचा जो मान असतो तो देत असे. हलिमा हुशार होती. राजा आपल्याला आईसारखा मानतो म्हणून ती आपली पायरी कधी विसरली नाही की कधी तिने आपली मर्यादा ओलांडली नाही.


मिरसुलेमान अली जेव्हा राजा झाला तेव्हा राज्याचा खजिना रिकामा झाला होता. मिरगफ्फार अलीने ऐयाशी करण्यात सरकारी खजिना रिकामा केला होता. मिरगफ्फार अलीच्या ऐयाशीला कंटाळून मिरसुलेमानच्या विश्वासातील लोकांनी मिरगफ्फार अलीच्या जेवाणात रोज थोडे थोडे विष मिसळले व कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्याचा खून केला. मिरसुलेमान अली आपले जेवण पहिले दास किंवा दासींना खायला लावायचा. दास किंवा दासीने त्याचे जेवण जेवल्यावर मिरसुलेमान अली एका तासानी जेवत असे तेही जर दास किंवा दासीला काही त्रास झाला नाही तरच.


मिरसुलेमान अलीने वयाच्या सोळाव्या वर्षी एका पर्शियन राजाच्या मुलीशी लग्न केले. मिरसुलेमान अलीने आपल्या राज्याचा खजिना आपल्या सासर्‍याकडून कर्ज घेऊन शिगोशिग भरला. मिरसुलेमान अलीने आपल्या पर्शियन सासर्‍याकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे कधीच परत केले नाहीत. मिरसुलेमान अली पर्शियन राजकुमारीशी लग्न झाल्यावर परत कधीही सासूरवाडीला गेला नाही. त्याने आपल्या राणीलाही कधी तिच्या माहेरी पाठवले नाही. मिरसुलेमान अलीचा सासरा दिलेले पैसे परत मागून थकला आणि कालांतराने मृत्यू पावला. मिरसुलेमान अली जेव्हा पंचवीस वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या अंतःपुरात पंचावन्न बायका जमा झाल्या होत्या. त्यापैकी चार बायकांशी त्याने निकाह केला होता आणि बाकीच्या एकावन्न बायका अशाच ठेवून घेतलेल्या होत्या. 


मिरसुलेमान अली अंधश्रद्धाळु होता. त्याच्या कोणत्यातरी सल्लागाराने त्याला सांगितले की त्याची झोपायची खोली जर रोजच्या रोज झाडल्यास देवी लक्ष्मी त्याचा नुरमहाल सोडून जाण्याची शक्यता आहे. या गोष्टीवर मिरसुलेमान अलीचा विश्वास बसला. त्याने नुरमहालामधे काम करणार्‍या सर्व कर्मचार्यांना हुकूम दिला की त्याची झोपण्याची खोली फक्त गुरूवारच्या दिवशी झाडली जाईल. त्याने आपली झोपायची खोली झाडण्याची परवानगी फक्त हलिमाला दिली. हलिमा दर गुरुवारी मिरसुलेमान अलीची खोली झाडायची, धुळ झटकायची आणि फरशी पुसायची, हे सर्व ती स्वतः आणि आपल्या हाताखाली काही सहाय्यक मंडळींना घेऊन करायची. गुरुवारीच राजाच्या पलंगावर असलेल्या गादीवरची चादर बदलण्यात यायची. राजाच्या उशांच्या खोळी बदलण्यात यायच्या.


एका गुरुवारी मिरसुलेमान अलीची खोली झाडताना हलिमाला मिरसुलेमान अली लहानपणी ज्या बाहुल्याशी खेळायचा तो बाहुला लिहिण्याच्या टेबलवर दिसला. मिरसुलेमान अली आपल्या पलंगावर पहुडला होता व डोळे मिचमिचे करत तो हलिमा काय करत आहे हे पहात होता.हलिमाला तो बाहुला हातात घेतल्यावर मिरसुलेमान अलीच्या लहानपणीच्या कितीतरी गोड आठवणी आठवल्या. हलिमा त्या आठवणीत हरवून गेली. मिरसुलेमान अली तिला पहात आहेत हे तिला कळले नाही. पाच मिनिटांनी ती भानावर आली. तिने तो बाहुला पुसून परत टेबलावर ठेवला आणि पुढच्या कामाला लागली. बाहुल्यावरून तिला आपल्या मुलींची आठवण आली. हलिमाला तीन मुलीच होत्या. तिला त्या तिघांच्या लग्नाची काळजी सतवत होती. मुलींचा लग्नाच्या काळजीने काही कारण नसताना हलिमाच्या डोळ्यात पाणी आले.


मिरसुलेमान अलीला हलिमाच्या डोळ्यात आलेले पाणी दिसले. मिरसुलेमान अली बाकीच्यांशी कितीही क्रूरतेने वागत असला तरी हलिमाच्या बाबतीत फार हळवा होता. हलिमावर त्याचे सख्या आईवर असावे तसे प्रेम होते. हलिमाच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून मिरसुलेमान अली पलंगावरून ताडकन उठून बसला आणि त्यांने हलिमाला विचारले की तिच्या डोळ्यात पाणी कशासाठी आले आहे. हलिमा काही नाही डोळ्यात काहीतरी गेले असावे असे म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होती.  मिरसुलेमान अलीने हलिमाचा पिच्छा सोडला नाही. 


शेवटी हलिमा म्हणाली, "तुमच्या या बाहुल्याकडे पाहून मला तुमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आल्या आणि का कोण जाणे पाठोपाठ मला माझ्या मुलींची आठवण आली." 


मिरसुलेमान अली हलिमाला म्हणाला, "तुला तिन्ही मुलीच आहेत ना?" हलीमाने होकारार्थी मान हलवली. मिरसुलेमान अली पुढे म्हणाले, "तुझा नवराही आता हयात नाही ना?" हलिमाने पुन्हा होकारार्थी मान हलवली. मिरसुलेमान अली पुढे हलिमाला म्हणाला, "मी तुला ह्यापूर्वीही बर्‍याच वेळा सांगितले आहे की मी तुला माझ्या आईसारखे मानतो आणि तुझ्या मुली मला माझ्या बहिणी सारख्या आहेत. तुला तुझ्या मुलींच्या लग्नाची अथवा तुझ्या म्हातारपणाची काळजी करायची काही गरज नाही." 


हलिमा काही बोलली नाही. मिरसुलेमान अलीला तिचा चेहरा पाहिल्यावर लक्षात आले की हलिमाच्या मनात काय चालले आहे. मिरसुलेमान अली मनातल्या मनात विचार करू लागला की बहुतेक हलिमाला वाटत असेल की राजाच्या आयुष्याची कोण खात्री देऊ शकतो. आज आहे उद्या नाही. माझे जर का काही बरेवाईट झाले तर हलिमाला कोणी कुत्रेही विचारणार नाही. 


मिरसुलेमान अली मनातल्या मनात या गोष्टीचा विचार करत होता आणि हलिमा त्याच्यासमोर पुतळ्यासारखी उभी होती.मिरसुलेमान अलीच्या डोक्यात अचानक एक युक्ती आली आणि तो जोर जोरात हसू लागला. हलीमाला काही कळत नव्हते की मीर सुलेमान अलीला असे अचानक काय झाले आणि तो असा का हसतोय.मिरसुलेमान अली दोन मिनिटे हसून थांबला. हलिमा त्याच्याकडे पहातच राहिली. मिरसुलेमान अलीने हलिमाला विचारले की तिला तिच्या मुलींचे लग्न करायला आणि म्हातारपण आरामात घालवायला किती पैसे लागतील. हलिमाचा चेहरा एकदम उजळला. तिला वाटले मिरसुलेमान अली तिने सांगितलेली रक्कम ताबडतोब देईल आणि तिची काळजी सदासाठी संपुष्टात येईल. हलिमाने पटापट मनातल्या मनात सर्व हिशोब केला. मिरसुलेमान अलीला ती म्हणाली की जर तिला अडीचशे मोहोरा मिळाल्या तर तिच्या सर्व काळज्या सदासाठी नाहीशा होतील.


मिरसुलेमान अलीला आता मजा येत होती. त्याने हलिमाला अडीचशे मोहोरा कशा खर्च करशील असे विचारले. हलिमा म्हणाली सर्वात पहिले मी अल्लाकडे तुमच्या दिर्घ आयुष्यासाठी, तुमच्या वाढत्या ऐश्वर्यासाठी, तुमच्या वाढत्या राज्यासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या स्वास्थ्यासाठी....मिरसुलेमान अलीने हात दाखवून पुरे म्हणून खुण केली.....दुवा मागेन. हलिमा पुढे म्हणाली मुलींची लग्न झाल्यावर, उरलेल्या मोहोरात एक छोटेसे घर विकत घईन. घर घेऊन उरलेल्या मोहोरात एक शेत विकत घेईन. म्हातारपणी शेतात भाजीपाला पिकवीन आणि तो आणून हुस्नाबादच्या बाजारात विकेन. असा कष्टाने मिळवलेल्या पैशाने उरलेले आयुष्य जगेन. मेल्यावर माझे घर आणि शेत माझ्या मुरशदला देऊन टाकावे असे माझ्या मुलींना सांगून ठेवेन.


हलिमा बोलायची थांबली. तिला तिच्या मुरशदची आठवण आली आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. मिरसुलेमान अलीला यावेळेस हलिमाचे डोळे पाण्याने डबडबण्याचे कारण ठाऊक होते. मिरसुलेमान अलीच्या मनातही हलिमाच्या मुरशदबद्दल नितांत आदर होता. मिरसुलेमान अली हलिमाला म्हणाले की मी तुला आताच्या आता अडीचशे मोहोरा देऊ शकलो असतो पण मी तसे करणार नाही, कारण तसे केले तर नुरमहाल मधील सर्व नोकरचाकरांच्या मनात त्यांनाही असेच पैसे मिळतील अशी आशा उत्पन्न होईल. या व्यतिरिक्त नुरमहाल मधील सर्व नोकरचाकर तुझा द्वेष करू लागतील. माझ्या डोक्यात एक युक्ती आली आहे आणि जर ती युक्ती आमलात आणली तर तुझे कामही बिनबोभाट होईल आणि कुणाच्या मनात तुझ्याबद्दल द्वेशही उत्पन्न होणार नाही. 


हलिमाला मिरसुलेमान अलीचे बोलणे कळत नव्हते. तरीही ती शांतपणे राजाचे बोलणे ऐकत होती. मिरसुलेमान अली पुढे म्हणाला की नुरमहालामधे बरेच दिवस झाले कोणाचे लग्न झालेले नाही. माझ्या दरबारातील मानकर्यांना नुरमहालामधे दावत दिली गेलेली नाही. हुस्नाबाद मधील मान्यवर लोकांना नुरमहालामध्ये येण्याचा बर्‍याच दिवसांपासून योग आलेला नाही.


हलिमा आपण या बाहुल्याचे लग्न या नुरमहालमधे लावूयात. लग्नात सगळ्या दरबारातील मानकर्यांना आणि हुस्नाबाद मधील सगळ्या मान्यवरांना आमंत्रण देऊयात. बाहुल्याचे लग्न धुमधडाक्याने करूयात. हलिमाला वाटले राजा तिची थट्टा करत आहे. हलिमाच्या मुलींच्या लग्नाचा आणि बाहुल्याच्या लग्नाचा काय सबंध.


मिरसुलेमान अली आपल्या पलंगावरून उतरला. त्याने टेबालावरचा बाहुला उचलला आणि कपाटात ठेवून दिला. हलिमाला खोली लवकर साफ करण्यासाठी सांगून आपण स्वतः खोलीबाहेर निघून गेला. मिरसुलेमान अली आपल्या झोपण्याच्या खोलीतून निघून नुरमहालामधल्या त्याच्या कचेरीत आला. कचेरीत बरेचसे लोक आपआपल्या कामात व्यस्त होते. मिरसुलेमान अलीने आपल्या वैयक्तिक अंगरक्षक खुदाबक्शला बोलावले. तो नुरमहालाच्या बाहेर आपल्या विशिष्ट अंगरक्षकांच्या तुकडीकडून रोजचा व्यायाम करवून घेत होता. मिरसुलेमान अलीने आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला आणि हुस्नाबादच्या कोतवालालाही बोलावून घेतले. 


सगळे जमा झाल्यावर मिरसुलेमान अलीने अतिशय गंभीरपणे आपल्या बाहुल्याचे नुरमहालात लग्न करवायचे आहे असा फर्मान सोडला. कोतवालाना बाहुल्यासाठी सुंदर बाहुली हुडकून आणण्याची जबाबदारी दिली. कोतवालच बाहुलीचे वडिलही होणार असा हुकूम मिरसुलेमान अलीने सोडला. खुदाबक्शला लग्नाची सर्व तयारी अगदी उत्तम पद्धतीने करण्याची जबाबदारी दिली. गृहमंत्र्यांना मिरसुलेमान अलीच्या दरबारातील सर्व मानकर्यांना, हुस्नाबाद मधील सर्व मान्यवर आणि मातब्बर मंडळींना मिरसुलेमान अलीतर्फे आमंत्रण देण्याची जबाबदारी दिली. 


लग्न नुरमहालाच्या भव्य पटांगणात करण्याचे ठरले. मिरसुलेमान अलीच्या इच्छेप्रमाणे सगळी मंडळी कामाला लागली. मिरसुलेमान अली आणि उपस्थित मंडळींनी लग्नाच्या खर्चाचा अंदाज काढला. कोतवाल म्हणाला बादशहा सलामतने मला बाहुलीच्या वडिलांचा मान दिला आहे. कोतवाल पुढे म्हणाले मी बाहुलीच्या बापाचे कर्तव्य पार पाडण्यात जराही कमी पडणार नाही. कोतवालाला पगारी शिवाय लाचलुचपतीची बरीचशी प्राप्ती होती आणि ही गोष्ट मिरसुलेमान अलीच्या कानावर आली होती. मिरसुलेमान अलीने जाणून बूजून कोतवालाला बाहुलीचा बाप केला होता. कोतवालाने तिथल्या तिथे दोनशे पन्नास मोहोरा बाहुल्याच्या लग्न खर्चासाठी म्हणून खुदबक्शकडे जमा केल्या. 


मिरसुलेमान अलीच्या नोकरीत असलेल्या सगळ्या लाचखाऊ अधिकार्यांनी हा लग्नखर्च वाटून घेतला. मिरसुलेमान अलीच्या खिशातून एक दमडीही खर्च न होता लग्नाची सर्व तयारी हां हां म्हणता झाली. नुरमहालामधे बाहुल्याच्या लग्नाची बातमी एका तासात सर्वांना कळाली. नुरमहालाचे वातावरण एकदम पार बदलून गेले. सगळीकडे बाहुल्याच्या लग्नाची तयारी दिसून येत होती. मिरसुलेमान अलीच्या अंतःपुरात बाहुल्याचे लग्नात घालावयाचे नवीन कपडे तयार होत होते. मिरसुलेमान अलीच्या राण्या बाहुल्याला सोन्याचे दागिने तयार करवून घेत होत्या. 


हुस्नाबाद राज्यातही ही बातमी वणव्यासारखी पसरली. राज्यातील नागरीक आपआपल्या ऐपतीप्रमाणे, आमंत्रण नसतानासुद्धा बाहुल्यासाठी नुरमहालात भेटवस्तू देऊन जाऊ लागले. हुस्नाबादचे मांडलिक राजे, मित्र देशांचे राजे, शत्रू देशांचे राजे, स्थितप्रज्ञ देशांचे राजे आणि शेजारपाजारच्या देशांच्या राजांकडून सुद्धा मौल्यवान वस्तू बाहुल्यासाठी भेट म्हणून येऊ लागल्या. नुरमहालाची अतिशय सुंदर रोषणाई झाली. संस्कृतिक कार्यक्रम सुरु झाले, नाचगाण्याचे कार्यक्रम सुरु झाले. नुरमहालात जणू जत्रा भरल्यासारखी वाटत होती. अस्थाई मुदपाकखाने उभारले गेले. नुरमहालाच्या भव्य पटांगणात बरेचसे मोठे मोठे तंबू ठोकण्यात आले. प्रत्येक तंबूत वेगवेगळे कार्यक्रम चालले होते. हलिमा हे सगळे पाहून दंग झाली होती. तिच्या अजूनही हे लक्षात येत नव्हते की बाहुल्याच्या लग्नाचा आणि तिच्या मुलींच्या लग्नाचा काय सबंध काय आहे.


ठरल्याप्रमाणे बाहुल्याचे लग्न धुमधडाक्याने पार पडले. जुनी म्हण आहे की जगात तीन हट्ट प्रसिद्ध आहेत. पहिला राज हट्ट, दुसरा स्त्री हट्ट आणि तिसरा आणि शेवटचा आहे बाल हट्ट. या तीनही हट्टासमोर कोणाचेही काही चालत नाही. लग्न झाल्यावर सगळे जिकडच्या तिकडे झाले. बाहुल्याच्या लग्नाची चर्चा हुस्नाबाद आणि आजूबाजूच्या राज्यात होऊ लागली. मिरसुलेमान अलीने बाहुल्याच्या लग्नात भेटस्वरूप आलेल्या रोख रक्कमेचा हिशोब पाहिला. लग्नाचा खर्च पंधरा हजार मोहोरा झाला होता आणि बाहुल्याला एक लक्ष सतरा हजार मोहोरा भेट म्हणून मिळाल्या होत्या. 


मिरसुलेमान अलीने लग्नाच्या खर्चाचे पंधरा हजार मोहोरा ज्यांनी खर्च केले होते त्यांना परत केले. दोन हजार मोहोरा हलिमासाठी काढून ठेवल्या शेवटी उरलेल्या एक लक्ष मोहोरा आपल्या प्रधान मंत्र्याला लोककल्याणकारी कामासाठी खर्च करण्यासाठी सुपूर्द केल्या. हलिमाला कचेरीत बोलावून घेतले. तिच्यासमोर दोन हजार मोहोरांच्या पिशव्या ठेवल्या. मिरसुलेमान अली म्हणाला हलिमा या दोन हजार मोहोरा मी तुला भेट देतो आहे. 


हलिमाला गदगदून आले. ती वाकून मिरसुलेमान अलीचे पाय धरायला गेली असता मिरसुलेमान अलीने तिला धरले आणि आपल्या हृदयाशी लावून घेतले. हलिमा मला माझी जन्मदात्री आई अजिबात आठवत नाही. तुच माझी आई आहेस. खरं तर मी तुझ्या पाया पडले पाहिजे पण हे राजेपण आडवे येते. कचेरीत उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी भरून आले. तिथे असलेल्या लोकांनी मिरसुलेमान अलीला रडताना पाहिले. हलिमा मिरसुलेमान अलीला म्हणाली, मी अशिक्षीत आणि अडाणी बाई, मला एवढ्या मोहोरा सांभाळणे शक्य नाही. मी तुम्हाला सांगितले आहे तेवढे तुम्हीच करा म्हणजे झालं. मिरसुलेमान अलीने ताबडतोब हलिमाच्या कामासाठी एक अधिकारी तिथल्या तिथे नेमला व त्याला त्या दोन हजार मोहोरांच्या पिशव्या दिल्या. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama