अवघ्राण
अवघ्राण
बाहेर मस्त पाऊस पड़त होता. आणि इकडे तन्वीच्या कँनव्हासवर रंगांचा पाऊस बरसत होता. नीळा समुद्र त्यावर दिसणारा लाल तांबूस सूर्याचा गोळा. क्षितिजावर भरून रहिलेला केशरी रंग जणु आभाळ केशरी रंगात न्हावून गेले आहे अस बघितले की फ़िल होत होते. हाड़ाची कलाकार होती तनु. खिड़की शेजारी कँनव्हास स्टैंड वर ठेवून तनु आपल्याच दुनियेत मग्न होती. अचानक पावसाचा जोर वाढला तसे तिचे लक्ष खिड़कीतुन बाहेर गेले.आणि पावसात दिसू लागला त्याचा चेहरा असाच तो पाऊसवेडा वेदांत ! एकदा दोघे असेच हातात हात घालून पावसात मस्त फिरत होते त्याच्या केसातुन पावसाचे थेंब टपटप त्याच्या चेहऱ्यावर पड़त होते तसा वेदांत अजुनच आकाशा कड़े तोंड करून पाऊस चेह ऱ्या वर झेलु लागला. वेदांत कीती छान दिसतोस तू असा पावसात भिजलेला हे दृश्य मी माझ्या कँनव्हास वर रेखाटनार आहे.असा तू आकाशा कड़े पाहनारा. तनु तुला सगळी कड़े चित्रच दिसतात का ग.? हो मग माझी नजर एका आर्टिस्ट ची आहे म्हंटले. मग चिम्ब भिजुन झाल्यावर रोड च्या बाजूला असणाऱ्या टपरी वर गरम भजी आणि चहा घेत उभे राहिले. वेदु पुढे काही ठरवलेस का? तनु आय विल ट्राय माय बेस्ट डियर. आय डोन्ट वॉन्ट टू लूज यू.
अस बोलून त्याने तिला कपाळावर हलके किस केले. वेदांत जेव्हा असा इमोशनल व्हायचा तेव्हा तनु ला असच किस करायचा. वेदु एक विचारु का ,तू नेहमी मला कपाळाला का किस करतो? तनु आय लाइक द मोस्ट. हळूवार कपाळ चुंबन मला आवडते. आणि तुला माहित आहे का मला आता एक गोष्ट आठवली. कोणती वेदांत? तनु ने विचारले.
आम्ही आर्ट्स चे स्टूडेंट्स ना सगळ्या लेक्चरला नुसता धींगाणा करायचो. प्रोफेसर जाम चिड़ायचे आमच्यावर एक दिवस मराठी च्या लेक्चर ला सरांनी एक शब्द दिला म्हणाले ,या शब्दाचा अर्थ शोधा आणि त्यावर काही लिहून आणा. मग काय शब्द दिला त्यांनी तनु ने उत्सुकतेने विचारले . गेस व्हाट त्यांनी शब्द दिला "अवघ्राण" . काय कसला हा शब्द आणि अर्थ काय याचा तनु शब्द ऐकुनच गोंधळली. तनु आम्ही पण असेच गोंधळुन गेलो, वर्गात फ़क्त एका मुलीने त्याचा अर्थ सांगितला की अवघ्राण म्हणजे कपाळा वर हलके चुम्बन देणे. ओह्ह कसला कठिन शब्द आणि अर्थ कीती मस्त ना वेदांत. तनु म्हणाली. हो ना मग कीती दिवस आम्ही सगळे अवघ्राण बोलत होतो आणि हसत होतो.
तनु आठवणीतुन बाहेर आली .कीती वेडा होता खरच वेदांत प्रत्येक क्षण आनंदात जगनारा. त्याच्या घरच्यांना मान्य नव्हते आमचे लग्न का तर कास्ट इश्यु .त्याची कास्ट उच्च आणि माझी खालची कास्ट! मीच म्हणाले की घरच्यांच्यां विरोधात नको जायला आणि आमचे मार्ग वेगळे झाले.
शेवटचा ब्रश तनु ने आपल्या चित्रा वरुन फिरवला. चित्राला नाव दिले "अवघ्राण". तनु गरमा गरम कॉफी घे निखिल दोन कॉफी चे मग घेवून आला होता. वा कीती सुंदर काढले आहेस चित्र तनु ऑसम! आणि हे नाव असले कसले ग अवघ्राण म्हणजे काय ? निखिल हे बघ या चित्रात हे आकाश जणु समुद्राला टेकले आहे असा भास होतो की नाही? हो तसच दिसते आहे आकाश जणु पाण्यात उतरले आहे असे.आणि इकडे बघ हा केशरी सूर्याचा गोळा तो ही या क्षितिजाला हलक स्पर्श करतो आहे अस दिसते हो ना? येस बरोबर निखिल म्हणाला. म्हणजे जणु हा सूर्य किंवा हे आभाळ त्या समुद्राला हलक चुम्बन देत आहे असे प्रतीत होते ना? हो ग तनु ते क्षितिज ही आभाळाच चुंबन घेत आहे जणु. हो म्हणुन चित्राला हे नाव अवघ्राण म्हणजे कपाळाच हलक चुंबन घेणे समजले का तनु हसत निखिल ला म्हणाली. हो समजले असच ना म्हणत निखिल ने तनु च्या कपाळाला किस केले.आज पुन्हा एकदा पावसा सोबत वेदांत ची आठवण झाली आणि नकळत त्याचा तो शब्द नव्हे त्याचीच आवडती किस स्टाईल आज या चित्रात तनु ला दिसली.
( *अवघ्राण म्हणजे कपाळावर हलके चुंबन घेणे)

