Author Sangieta Devkar

Drama Inspirational

4.7  

Author Sangieta Devkar

Drama Inspirational

अशी ही एक बहीण

अशी ही एक बहीण

4 mins
541


सलमा थांब जरा हे घेवून जा. स्वाती ने चार पुरपोळया एका डबयात कटाची आमटी दिली अग आज गुढीपाडवा म्हणून या पूरणपोळया मुलांना घेवून जा. बर ताई येते म्हणत सलमा निघुन गेली. स्वाती कशाला सारखे काही ना काही देत असतेस तिला. जयेश म्हणाला. अहो असु दे गरीब आहे बिचारी लहान मूले आहेत तेवढेच खातील गोडधोड. पण याने ही काम चुकारपणा करेल . उगाच लाडावून ठेवू नकोस मगितले की पैसे पण देतेस. नाही ओ सलमा ख़ुप चांगली आहे काम पण नीटनेटके करते. आता लॉकडावून मुळे काम वाल्या पण मिळत नाहीत पण तू काळजी घेत जा स्वाती. हो सलमा ला पण आल्या आल्या हात धुवून काम कर म्हणते. पण तुम्ही का इतका राग राग करता तिचा? स्वाती आपल स्टैंडर्ड काय आणि तू किती मिळून मिसळून वागतेस तिच्याशी आय डोन्ट लाईक. हम्म्म्म मी तुमच्या सारखा विचार नाही करत जयेश. शेवटी माणुस इथुन तिथुन सारखाच. भेदभाव करणारे आपण कोण? ओके तुला पटते ते कर म्हणत जयेश गप बसला. सकाळी सलमा चा फोन आला की ती कामावर येणार नाही तिच्या नवऱ्याची तब्येत ठीक नाही.दुसऱ्या दिवशी वाट बघून स्वाती ने सलमा ला फोन केला तर तिच्या नवऱ्याला कोरोना झाला होता आता 15 दिवस तरी ती कामाला येणार नव्हती. स्वाती म्हणाली तू काळजी घे आणि काही लागले तर मला सांग.


जयेश म्हणाला काही नाही ग नाटक असतात यांची कामावर न येण्याची. नाही ओ सलमा खोट नाही बोलणार खरच तस असेल तिचा नवरा फळ विकतो हातगाड़ी वर. ठीक आहे आता तिला महीना भर येवू नको म्हणून सांग. स्वाती आता एकटीच घरच काम करत होती.अधुन मधून सलमा ला फोन करून चौकशी करत होती तिचा नवरा आता बरा होत होता.एक दिवस जयेश ला ख़ुप ताप भरला. तो एक दोन दिवसच ऑफिस ला जात होता. कारण ऑफिस स्टाफ कमीत कमी बोलवत असत. जयेश ला घेवून स्वाती हॉस्पिटल ला गेली सगळ चेकिंग झाले आणि जयेश कोरोना पॉझिटिव्ह निघाला. स्वाती तर घाबरुनच गेली. एक तर मदती ला कोणी नाही घरी दोन लहान मूल सासु सासरे गावाकड़े जिल्हा बंदी असल्याने त्यांना आता इकड़े यायला जमनार नव्हते. जयेश ला एडमिट करावे लागले त्याचा एक मित्र फ़क्त स्वाती सोबत होता. जयेश ची सगळी सोय करून स्वाती घरी आली मूल घरी एकटीच होती. आता तिला जयेश ला भेटता पण येणार नव्हते. घरी येऊन ख़ुप रडली ती मूल विचारु लागली आई बाबा कुठे आहेत तसे ती अजुनच रडू लागली. हळूहळू सोसायटी भर ही बातमी गेली मग काय सगळयानीं जणु स्वाती ला वाळीतच टाकले. सलमा ला ही बातमी समजली तशी ती तड़क स्वाती कड़े आली. तिला धीर दिला आणि कामाला येईन म्हणाली. तिचा नवरा आता पूर्ण बरा झाला होता.जयेश ची चौकशी फ़क्त फ़ोनवरून स्वातीला समजत होती


अचानक जयेश ची तब्येत खराब झाली त्याला तातडीने प्लाझमा चढ़वने गरजेचे होते आता रक्तदान कोण करणार हा मोठा प्रश्न स्वाती समोर उभा होता. नेहमी सारखे सलाम कामाला आली स्वाती ला बघून म्हणाली ताई कसला विचार करत आहात काही टेंशन आहे का? तसे स्वाती ने सलाम ला सांगितले की जयेश ची तब्येत खूप खराब आहे त्याला रक्त चढवायला हवे. ते ही अशा माणसाचे ज्याला कोरोना होऊन गेला आहे आणि आता तो माणूस पूर्ण बरा असेल. मग सलमा पटकन बोलून गेली ताई माझा माझा नवरा देईल रक्त जर तुम्हाला चालत असेल तर. तशी स्वाती खुश झाली म्हणाली अग का नाही चालणार उलट तू माझी खुप मोठी मदत करशील.तू बहीणी सारखी मदतीला धावून आलीस बघ. ताई आमचा धर्म वेगळा म्हणून विचारले. सलमा जिथं देवाने माणसाला जन्माला घालून कुठलाच भेदभाव नाही केला मग आपण कोण भेदभाव करणारे आणि मी तुला तस कधी वागवले आहे का सांग. नाही ताई उलट वेळोवेळी मला तुम्ही मदतच केली आहे माझा नवरा ही तुमचं नाव काढतो. आता त्याच्या आजारपणात तुम्हीच तर पैशा ची मदत केली बाकीच्या लोकांनी मला घरात पण नाही येऊ दिले. सलमा उद्या तुझ्या नवऱ्याला घेऊन ये हॉस्पिटलमध्ये . हो ताई नक्की येईन म्हणत सलमा घरी गेली.


दुसऱ्या दिवशी सलमाच्या नवऱ्याचे रक्त जयेश ला चढवले प्लाझमा जयेश ला मिळाला. त्याने जयेश लवकर बरा झाला. आज तो घरी येणार होता. स्वाती जयेश ला घेऊन घरी आली. सलमा ने आरती चे ताट तयार ठेवले होते स्वाती ने जयेश ला ओवाळून आत घेतले. मुल बाबा ला बघून खुश झाली. स्वाती ही सलमा काय करते इथे ? कधी पासून येते कामाला? जयेश आज तुम्ही पूर्ण बरे झालात ते सलमाची आणि तिच्या नवऱ्याची मेहरबानी आहे. म्हणजे काय? जयेश तुमची कंडिशन खुप क्रिटीकल झाली होती. तुम्हाला प्लाझमा चढवने गरजेचे होते आणि कोरोना होऊन गेलेला माणूसच असे रक्त देऊ शकतो मग सलमाचा नवरा काही अडेवेडे न घेता तुम्हाला रक्त दान करायला तयार झाला. जयेश ला खूप गिल्टी फील झाले त्याने सलमा समोर हात जोडले तिचे आभार मानले. दादा तुम्ही मला भावा सारखे आहात मी काही मोठं काम नाही केले. जयेश ने तिला नवऱ्याला भेटायला घेऊन ये अस सांगितले. स्वाती तू बोलली ते खरं आहे माणूस महत्वाचा असतो बाकी त्याच स्टेट्स बँक बॅलन्स याला काही ही किंमत नाही. मग जयेश ने सलमा च्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतःवर घेतला. त्यांना जितके शिकायचे तितका खर्च तो उचलणार होता. माणूस हा पहिला माणूसच असतो जात धर्म याला मूल्य काहीच नाही.


आजचा काळ खूप कठीण आहे. कोरोना जात, धर्म, गरीब श्रीमंत बघत नाही मग आपण का जाती भेदाच्या भिंती उभा करतो? आज ज्याला गरज असेल त्याला जमेल तेवढी मदत करा हीच सर्वांना कळकळीची विनंती आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama