असा केक सुरेख बाई
असा केक सुरेख बाई


माझं लग्न झालं आणि मी शहरातून खेड्यात आले.
तसं आज-काल खेडेगाव आणि शहर यात फारसा फरक उरलेला नाही. शहरात मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी गावाकडे देखील मिळतात. गावातील बरेच लोक शहरातील लोकांचे अनुकरण करीत असतात .एखादी फॅशन आज-काल शहरात येण्याआधी सिरियल आणि टीव्ही बघून गावात येते .एकदा मी टीव्ही वरची केक बनवण्याची रेसिपी बघितली आणि आपणही केक करून सासरच्या माणसांना खुश करावं आणि त्यांच्यावर थोडे इम्प्रेशन मारावं या विचाराने मी त्यांना म्हणाले अहो उद्या येताना लिस्ट देते त्यातील सामान घेऊन या. मी केक करणार आहे
मी यांना सामानाची लिस्ट दिली त्याने तालुक्याला जाणाऱ्या कोणाकडे तरी लिस्ट पाठवून केक ला लागणारे सामान मागवले. चॉकलेट पावडर मिल्क पावडर बेकिंग सोडा मैदा सर्वकाही मागवले. पद्धतीने केक साठी मैदा फेकून घेतला त्यात साखर चार अंडी सर्व घालून फेटले. पण बेकिंग पावडर मात्र चमचा न घेता थोडा पुडा हलवून, त्यात मी टाकत होते. एवढ्यात माझा भाचा वय वर्ष आठ धावत धावत आला आणि नवी मामी काय करते, नवी मामी काय करते असे म्हणत माझ्या कमरेला गच्च मिठी मारली.त्याच्या धक्क्याने माझ्या हातातली अर्धी पावडर मिश्रणात पडली. काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती काय निघत नव्हती. शेवटी विचार केला जाऊ दे आता पडलीच तर फेटून टाकू, आणि मी ते मिश्रण कुकरच्या भांड्याला लावून शिट्टी काढून घेतली. आणि पाणी न घालता तो गॅस वर चढवला. अर्ध्या तासाने कुकर बंद केला व खाली उतरला . नंतर उघडला तर कुकर मधला केक एकदम फुगून भांड्याच्या बाहेर आला होता.
सर्वांची जेवणे झाल्यानंतर मी मोठ्या कौतुकाने तो केक सर्वांच्या पुढ्यात नेला. आज मी तुम्हा सर्वांना जेवणानंतर स्वीट डिश देणार आहे
डार्लिंग मला मात्र दुसरी स्वीट डिश पाहिजे हे माझ्याजवळ येऊन कुजबुजले.
आम्ही नाही जा मी लाडाने मान वाकडी करून त्यांना जीभ दाखवली.
मग सुरीने केकचा चांगला एक नाजूक चौकोनी तुकडा काढला आणि पहिला तुकडा पुतण्याच्या तोंडात घातला आणि बाकीच्या चौकोनी तुकडे कापून ठेवले होते.
अय्यो! काकू तू कसला केलास नुसता खारट खारट लागतोय.
थू थू करत तोंडातला केकचा तुकडा खाली टाकून पळाला माझा चेहरा पटकन उतरला. पण यांनी माझी बाजू सावरण्यासाठी केकचा तुकडा उचलून स्वतःच्या तोंडात घातला. आणि तोंड वेडेवाकडे करत कसाबसा गिळला. यांचे तोंड बघितल्याबरोबर मी समजून गेले की आपल्या केकचे बारा वाजलेले आहेत आणि नंतर घरातल्या एका एका सदस्याने तेथून काढता पाय घेतला.
सुनबाई आज जरा जास्तच जेवण झालंय तुझा केक मी उद्या खायला असे म्हणून सासरे झोपायला निघून गेले सासूबाईंनी देखील त्यांचेच अनुकरण केले वहिनी मी जरा डायटिंग करतो आहे
दर रविवारी चिकन चापणारा आणि ते नसले तर घरामध्ये दंगा घालणारा माझा दीर बोलला.
मी तर बाई नॉनव्हेज सोडून दिले असंच जाऊ बाईनी नाक मुरडत सांगितलं पण एरवी साधा आमलेट देखील त्यांना दोन अंड्याचं पाहिजे असायचं
अगं निता तू तरी चव घेऊन बघ मी नणंदेला आग्रह केला
वहिनी मला की नाही गोड आवडत नाही माझ्या लग्नात चढाओढीने गुलाबजाम खाणारी नणंद बोलली
<p>आता माझा केक खायला कोणीच वाली उरला नव्हता यांनी माझ्याकडे आता मीच बिचारा बळीचा बकरा अशा नजरेने पाहिले की आता तुम्ही पुन्हा एकदा केक खा असे म्हणण्याची माझी हिम्मत झाली नाही
या घरात नवीन आल्यापासून या मंडळींना मी नेहमी नेहमी दर संडेला नवीन नवीन रेसिपी करून खाऊ घातल्या कधी पाणीपुरी कधी शेवपुरी कधी पावभाजी डोसे बटाटेवडे त्यांना खाण्याचे माहित नव्हतं हे सारं मी करून टाकलेलं होतं आणि सर्वजण माझी तारीफ पण करत होते पण आज मात्र सारेजण उलटले
याला त्याला आग्रह करण्यापेक्षा तू स्वतः का खाऊन बघत नाहीस आमचे आहे बोलले आहो बोलले
अरे हो मीच का तेच कळत नाही टेस्ट करत नाही असे म्हणून मी केकचा एक पिस उचलून तोंडात टाकला आणि अगगगग काय ती चव वर्णावी बेकिंग पावडर जास्त झाल्याने खारट केळीत गिळगिळीत अशी त्याची चव झाली होती
व्याक व्याक करीत मिच तोंडातून तो केक थुंकला. हे माझ्याकडे बघत मिश्कीलपणे हसत होते मला खूप शरम वाटले आणि स्वतःलाच खूप राग आला मी स्वतःवरच खुप रागावले होते. एक तर एवढा खर्च, एवढी मेहनत, सारं काही वाया गेलं त्यात सासरी इम्प्रेशन मारायचं तर दूरच पण उलट माझी फजिती झाली.
मी रागारागात सर्व केक उचलला आणि घरच्या पाळीव कुत्र्या पुढे ठेवला पण त्या कुत्र्याने पण माझ्या केकला तोंड लावलं नाही हे तिरप्या नजरेने माझी फजिती बघत होते मला म्हणाले तुझा इतका उत्कृष्ट झालाय की त्याला कुत्रे पण तोंड लाविना मग तर मला खूपच राग आला सगळ्यांचा राग कुत्र्यावर काढला चांगला एक रट्टा त्याच्या पेकाटात घातला त्याबरोबर ते क्याव क्याव करत पळून गेले.
आता या केक लागीर आई कोण गिराईक कोण असा विचार मी करत होते आणि समोरच उतरल्यावर उकिरड्यावर एक गाढव सरत होते चरताना दिसले मी सगळे केकचे भांडे त्या गाढवापुढे चालते केले पालथे केले. त्या गाढवाने मात्र माझा अवमान केला नाही मोठ्या चवीने त्याने माझा केक खाल्ला लोक उगाच म्हणतात गाढवाला गुळाची खायचं गाढवाला गुळाची चव काय बँकेत चिचवे देखील केकची देखील चव कळली होती आणि त्याने आनंदाने माझा केक खाल्ला चला कोणी नाही तर किमान गाढवाने तरी आपला केक खाल्ला वाया तर दिला नाही म्हणून मी समाधानाने घरात वळले
दुपारच्या जेवणानंतर सगळेजण वामकुक्षीसाठी आपापल्या खोल्यातून आडवे झालेले होते जरासा कुठे झुणका लागला आणि जाग आली ती रामा बेलदाराच्या आवाजाने.
आबा अहो आबा जरा वाईच बाहेर या बरं! तसे दुपारचे जरा झोपलेले सासरे बाहेर आले आमचं पोरगं म्हणत होतं तुमच्या सूनबाईने माझ्या गाढवाला काहीतरी खाऊ घातलं तोंडाला बघा कसा झालाय फेस आलाय रामा बेलदार बोलला त्याच्या बोलण्याने घरातील सर्व मंडळी बाहेर आले खरोखर त्याच्या पाठीमागे गाढव उभे होतं त्याच्या तोंडातून फेस गळत होता आणि फुर्र फुर्र आवाज करीत ते गाढव मान हलवत तोंडाचा फेस झटकत होतं
ते बघितल्यावर मला पण एकदम हसू फुटले आणि माझे बघून घरातील सर्व मंडळी खुदुखुदु खुसूखुसू करत एकदम खो-खो हसत वर आली
अरे रामा काही घाबरू नको तुझ्या गाढवाला सुनबाई ने चांगली मेजवानी घातलेली आहे त्याला काही होणार नाही चांगला किलो भराचा केक खाऊ घातलेला आहे
नव्या सूनबाईने केलेला नवा केक