#अपेक्षा.....
#अपेक्षा.....
निशा वर्किंग वूमन होती. तिच्या सासूबाई तिला खूप प्रेमळ मिळाल्या होत्या. घरातील स्वयंपाक, नाष्टा त्या पुढे होऊन करत. निशाला येऊन जाऊन फक्त झाडू, भांडी करावी लागत, पण रोज सिंक मध्ये साठणाऱ्या भांड्यांचा निशाला बघताच खूप राग येई. त्यावरून ती नवऱ्यासमोर चिडचिड करत. निशाची अपेक्षा होती ' त्यांनी भांडी ही धुवून टाकावीत.
तिच्या लक्षात हे येत नसे की ती घरी नसताना बाकीचे सगळी कामे सासूबाई कोणतीही अपेक्षा न ठेवता करत होत्या. आजही सकाळी निशाने त्यांनी केलेलं गरमागरम उपीट खाऊन आणि मेथीचा पराठा आणि उसळ टिफिनला घेऊन गेली. हे करण्यासाठीही कष्ट लागतात याचा तिला विसर पडला होता , सासूबाई प्रेमाने किचन सांभाळत होत्या . लवकर उठून निशाचा आणि त्यांच्या मुलासाठी डब्बा बनवत असे.
आज नेहमीप्रमाणे निशा सात वाजता घरी आली. आज नेहमीप्रमाणे तिचा पारा चढला होता. ती नवऱ्याला बोललीच सासूबाई घरीच असतात ना..? त्या कशाला सिंक मध्ये भांडी साठवून ठेवतात. तिच्या नवऱ्यला अभयला तिचा खूप राग आला होता. कारण रोज तो डोळ्याने आई कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करते हे पाहत होता. तरी हिला भांडी खासण्याचा त्रास होतोय त्याला हे अजिबात आवडलं नव्हतं. माझी आई घरी बसते म्हणून तिनच सगळं करायचं का...? सून म्हणून काही हिची पण कर्तव्य आहेत की नाही... !
भांडी घासायलाही हिला जड व्हावीत हे त्याच्या मनाला पटत नव्हतं. अभयने तिच्याशी अबोला धरला होता.
दुसऱ्या दिवशी अभयने आईला देवदर्शनासाठी पाठवलं. तिला ही थोडंसं बरं वाटेल. बाबा गेल्यापासून तीही एकटीच पडलीये या हेतूने चार दिवसासाठी पाठवलं.
इकडं निशाला राग अनावर झाला होता. रोज नाश्ता, जेवण आणि ऑफिस करता करता तिची खूप दमछाक होऊ लागली. अभय ने मुदाम त्याच्या आईची किंमत कळावी म्हणूनच पाठवलं होतं. निशाला आता सिंक मधील भांड्यांपासून ते घरातील सगळी कामं करताना सासूबाईंची आठवन होई. किती करत होत्या त्या तिच्यासाठी....??
पण तिला त्याची जाणीव आणि किंमत आता खरी झाली होती. रोज आयता मिळणारा नाश्ता आणि टिफिन तिला आठवू लागला.
आज रविवार असल्याने दोघेही घरीच होतें. अभय तिच्याशी एका शब्दाने बोलत नव्हता. ती न राहवून अभयकडे माफी मागण्यासाठी गेली. अभय मला माझी चूक समजली आहे. सासूबाई किती करतात माझ्यासाठी आईप्रमाणे आई म्हणून त्यांना कधीच मी पाहिलं नाही. मला त्याची तेव्हा किंमत कळली नाही. खरच त्या माझ्या आईसारख्याच माझी काळजी करत होत्या. मी त्यांच्याशी खूप चुकीचे वागले माफ कर मला अभय पुन्हा मी त्यांच्याविषयीं असं बोलणार नाही.
अभय ही म्हणाला, मी मुदामच तिला देवदर्शनाला पाठवलं नाहीतर तू तिला मोलकरीणच समजत होतीस ना...! शेजारी जाऊन पहा जरा सासवा कशा वागतात सुनांशी . तुझ्या लक्षात येईल तुझी सासू कशी आहे. माझी आई किती तुला प्रेमाने वागवत होती, "अभय रागानेच तिच्याशी बोलत होता.
संध्याकाळी सासूबाई घरी आल्या. निशाने पहिल्यांदाच त्यांच्यासाठी चहा केला. हातात पाणी नेऊन दिलं. सासूबाईना तिच्या वागण्याने खूप बरं वाटल. अभयने ही सगळं विसरून तिला माफ करून टाकलं.
लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लेख मनोरंजणासाठी लिहिण्यात आला आहे.
