shubham gawade Jadhav

Horror Thriller

3  

shubham gawade Jadhav

Horror Thriller

अनोळखी जागा... भाग १

अनोळखी जागा... भाग १

4 mins
244


पाठीमागच्या भागात आपण पहिलं की शाम आणि शांभवी आता त्या रहस्यमयी गुहेच्या दिशेने निघाले .पुढे काय होणार ते दोघांनाही माहित नव्हतं .

आता पुढे ......

                      आता एक एक पाऊल दोघेही पुढे टाकत होते .त्यांचं प्रत्येक पाऊल एक नवं वळण घेत होत . होत दोघांच्या हृदयाची धड धड त्या भयान शांत वातावरणात एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होती .प्रत्येक पावलासोबत ती वाढत होती .एकीकडे मन उत्सुक होत तर एकीकडे पुढे काय ? या विचाराने काळीज धस्स होत होत .पण थांबेल तो शाम कसला .वाढलेल्या कंबरेइतक्या गवताने फक्त अंशतः त्या गुहेचा भाग दिसत होता .शामच्या एका हातात धारधार कोयता होता आणि दुसऱ्या हातात बॅटरी तर शांभवीच्या हातात मोठं लाकूड होत .दोघेही चौफेर नजर टाकत अगदी काळजीपूर्वक पाऊल टाकत होते जणू त्यांना मिलेटरी ट्रेनिंग भेटली आहे आणि ते एखाद्या मिशन वरती आहेत .हो पण हे त्यांच्यासाठी एक प्रकारचं मिशनच होत .आता त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला होता .

शाम - शांभवी हातातल्या लाकडाला कापड गुंडाळून घे आणि त्याला आग लाव .

शांभवी - हो .

त्याने सांगताच तिने तसच केल कारण पुढे पूर्ण अंधार होता .त्यांना पुढे जाण्यासाठी प्रकाशाची गरज भासणार होती .बॅटरीचा प्रकाश त्यांच्यासाठी पुरेसा नव्हता आणि आगीला बघून हिंस्त्र प्राणी घाबरतात म्हणून त्यांनी आग लावायचं ठरवलं .जुन्या काळात हीच पद्धत वापरायचे .

शाम - बघू ते माझ्या हातात .

असं म्हणून त्याने ती आगोटी तिझ्या हातातून स्वतःच्या हातात घेतली .दोघेही एखाद्या टपून बसलेल्या शिकाऱ्या इतकेच सावध होते कारण ती त्यांच्यासाठी अनोळखी जागा होती.समोरून काहीही येऊ शकत म्हणून येणाऱ्या संकटाला मात देण्यासाठी तयारीनिशी आणि सावध चालत होते .

शाम - सावध रहा .

असं सारखं पण हळू आवाजात शांभवीला बजावत होता .

शांभवी - हो रे .आहे माझं लक्ष .

जसजस पुढे जात होते तसा काळोख दाटत जात होता .दोघांच्याही छातीची धडधड स्पष्ट जाणवत होती आणि श्वास सोडण्याचा आवाजही येत होता .दोघे हळूहळू पुढे सरकत होते .

              अचानक शामच लक्ष बाजूच्या भिंतीवर गेल .भिंतीवर कोरीव काम दिसत होत.वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षा त्यावर होत्या .त्याला ते पाहून खूपच आनंद झाला .कोरीव नक्षीकाम पाहिल्यावर त्याला वाटलं की ही एक लेण्यांची गुफा आहे .आपण त्याचा शोध लावला आहे पण पुन्हा त्याला आठवल की ही जागा प्रथमच आपण पाहत आहोत .हे ठिकाण दिशा ही दर्शवत नाही .त्याच्या मनातली गोष्ट शांभवीने ओळखली .

शांभवी - एवढा खूष नको होऊ .ही सुरुवात आहे .पुढ काही वेगळंच असलं तर ?

शामचा चेहरा लगेच पडून गेला .तो भिंतीकडे पाहू लागला .वेगवेगळ्या स्त्रिया वेशभूषा प्रधान केलेल्या ,नृत्य करत असलेल्या ,देवाची पूजा करत असलेल्या अशा अनेक आकृत्या त्यावर कोरलेल्या होत्या .पुरुष कामे करताना ,वेगवेगळ्या क्रीडा करतानाच्याही आकृत्या त्यात होत्या .

         देवाला मानवाच्या जीवनात किती अनन्य साधारण महत्व आहे आणि स्त्रियांनाही त्याचं दर्शन घडवणारे ते शिल्प होते .ते जसेजसे पुढे जात होते कोरीवकाम दाट होऊ लागलं होत .आता त्यांना त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिसू लागल्या .कुठे झाडाला टांगलेल,समूहातून बाहेर टाकलेलं ,गळफास दिलेलं ,बांधून ठेवलेल ,धारदार शस्त्रांनी टोचलेलं अशी अनेक कोरीवकामे दिसत होती .याचा अर्थ असा की त्यावेळीही न्याय व्यवस्था कार्यरत होती .हे सगळं शाम आणि शांभवी डोळ्यात साठवत होते त्यांची भीती आता थोडी कमी झाली होती .

           पुढे जात असताना अचानक शाम कशाला तरी ठेसकळून खाली पडता पडता सावरला .खाली पाहतो तर त्यांना एक हाडांचा सापळा दिसला आणि दोघेही गरबडून गेले .दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली .दोघांना दरारून घाम फुटला .शांभवी तर किंचाळलीच आणि तिझा आवाज त्या गुहेत आणखीनच भयान वाटला .

शाम ने तिला कसबस शांत केल .त्या दोघांनी त्या सापळ्याच निरीक्षण केल तर त्याच्या हातात कसला तरी नकाशा होता .शामने तो घेतला .पाहिलं तर त्याला काहीच समजत नव्हतं त्या नकाशातलं .पण तो खूपच जुना आणि रहस्यमयी होता .शांभवी आजूबाजूला पाहत असताना तिला एक जून पुस्तक सापडलं .त्यावर लाल अक्षरांनी रहस्य अनोळखी जागेच असं लिहिलं होत .तिने ते शामला दाखवलं .ते खूप जून होत .कमीत कमी तीनशे ते साडे तीनशे वर्षांपूर्वीच असावं कारण त्याची ठेवण अगदी तशीच होती .

शाम - उघडायचं का ?

शांभवी - नको .ह्या सापळ्याला पाहून तर नकोच .कारण त्यानेही हाच प्रयत्न केला असेल आणि तो मेला असेल .

शाम - तुला कस माहित ?

शांभवी - मग हे पुस्तक आणि नकाशा याच्याजवळ काय करत आहे ? आणि हा असा कसा मेला ? अगदी गुहेच्या तोंडापासून काही अंतरावर .

 

      दोघांनाही खूप सारे प्रश्न पडले होते .पुढे जावं की नाही ? हा सापळा कोणाचा ? हा इथे कसा आला ? याच्यासोबत काय झालं असेल ? तिच चूक आपण तर नाही ना करत ? खूप सारे प्रश्न .....

               

                                                           क्रमशः

           



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror