अनोळखी जागा...... 1
अनोळखी जागा...... 1
शामला समोर पाहून काहीच सुचत नव्हते. त्याला ज्या ठिकाणी पोहचायचं होत तो तिथे नव्हताच .आजूबाजूला गर्द झाडी ,दिवसाही सूर्यकिरणे खाली पडत नव्हते ,रात्रकिडे दिवसाच किर्रर्रर्र किर्रर्रर्र असा आवाज करत होते .शाम तसा धाडसी होता .आपण या जंगलात तर खूप वेळा आलोय ,जंगलाचा कप्पा न कप्पा आपल्याला माहित आहे मग ही जागा आपल्या नजरेतून कसकाय सुटली बरं .याचाच तो विचार करत होता .त्याने कंपास बाहेर काढून दिशा पाहायचा प्रयत्न केला पण कंपास तर गोल गोल फिरत होत .ते दिशा दाखवायलाच तयार नव्हतं .शाम ने त्याला दोन तीन वेळा हातावर जोरात आपटलं पण तरीही ते गोल गोलच फिरत होत .शाम रागाने बोलला , "आत्ताच खराब होयच होत का तुला ?" शीट .आत तो आसपास पाहू लागला .समोरच एक वेलींची गुंतागुंत दिसली .त्याकडे तो रोखाने पाहत होता .आजूबाजूपेक्षा तिथे जरा जास्तच अंधार दिसत होता .तो हळूहळू त्या दिशेने निघाला .त्याने स्वतःच्या रक्षणासाठी एक जाडजूड लाकूड हातात घेतले आणि हळूहळू पुढे सरकत होता .तो जसजसा पुढे सरकत होता तशी त्या ठिकाणी हालचाल वाढू लागली होती .तो आपल्या पावलांचा आवाजही होऊ देत नव्हता तरीही तिथे हालचाल होती .तो जवळ पोहचला तशी हालचाल जास्त वेगाने झाली आणि त्यातून मोठ्याने चिइइइ चिइइइ असा आवाज करत वटवाघूळ बाहेर पडली. तो एक पाऊल पुढे झाला तेवढ्यात पाठीमाघून आवाज," शाम " असा आवाज झाला आणि शाम दचकलाच त्याने फिरून हातातले लाकूड उगारले .पण पाहताच वाकून खाली करून बोलला ,काय यार ? जीव घेता का आता .घाबरलो नाही मी .तो आवाज त्याच्या मैत्रीण शांभवीचा होता .त्याने तिझ्याकडून कंपास घेतले आणि दिशा पाहू लागला पण तिझही कंपास दिशा दाखवण्याऐवजी गोलगोल फिरत होत .
शाम - its impossible .असं कस शक्यय .दिशा का दाखवत नाहीये हे .
शांभवी - काय झालं आता ? बघू .
शाम - अरे हे कंपास इथे काम करत नाही .दिशाच दाखवत नाही .
शांभवी - कस शक्यय .काहीपण .
शाम - हे घे तूच बघ .
शांभवी चेक करून पाहते तर तिलाही तेच दिसत जे शामने पहिलं .दोघांचीही शंका वाढली .
शांभवी - आपण कित्येक वेळा या जंगलात आलोय पण ही अनोळखी जागा आहे असं नाही का वाटत तुला .
शाम - तेच तर आपल्याला ही जागा याअगोदर कधीच आढळली नाही .its strange.
शाम आणि शांभवी हे दोघे भटकंतीचे शौकीन .जुनागढच्या जवळच्या जंगलात सुट्टीदिवशी मनसोक्त हिंडायच हा त्यांचा छंद .नवनवीन जागा शोधायच्या आणि माहित करून घ्यायच्या .सगळं जंगल त्यांनी ओळखीचं बनवून घेतलं होत .तिथे झाड लावणं ,पक्ष्यांसाठी पाणी प्यायची ठिकाण बनवणे हा त्यांचा सुट्टीच्या दिवशीचा दिनक्रम असायचा .पण आज त्यांना कधीच नव्हती अशी अनोळखी जागा आढळली होती .तिथे कंपास ही काम देत नव्हतं. त्यांना काहीच समजत नव्हतं की काय होतय. ती जागा भयानक,रहस्यमयी आणि रोमांचक असू शकती .पुढे समोर ज्या जागेतून वटवाघूळ बाहेर पडले त्या ठिकाणी एक गुहेसारखा आकार होता .दूरवरून ते ठिकाण भयानक वाटत होत.यांच धाडसही होत नव्हतं कारण हे दोघेच होते आणि कोणाला माहीतही नव्हतं की हे दोघे इकडे जंगलात आलेत .
त्यात पुढे काय असेल ? कदाचित काही नसूही शकत किंवा असूही शकत .दोघेही एकमेकांच्याकडे काय करायचं या प्रश्नाने पाहत होते .त्यांना रहस्यमयी जगण्यात वेगळीच मजा येई .शांभवीला शामच्या डोळ्यात एक उत्सुकतेची चमक दिसली .तिला समजलं की आता शाम ते रहस्य शोधल्या शिवाय राहणार नाही .कारण तो माणूसच तसा होता .त्याच्या अंगी शांत बसणे हा गुणच नव्हता .प्रत्येक गोष्टीत त्याला काही ना काही रोमांचक हवं असतं .दोघांनीही आपापल्या जवळ असणाऱ्या साधनांची तपासणी केली .बॅटरी ,रस्सी ,लायटर ,खायच्या प्यायच्या वस्तू ,सौरक्षणासाठीचे धारदार हत्यारे सगळं काही होत .त्यांना माहित नव्हतं आता आपण एका रहस्यमयी प्रवासाला जाणार आहोत .पुढे काय होणार ते फक्त देवालाच माहित .
क्रमशः

