अलोन ...
अलोन ...


दरवाजा वरची बेल वाजली
"अरे सुबोध ये"
"काय काकू कशा आहात"
"मी बरी आहे आणि तू ?"
"मी मस्त "
"काय आज कशी आठवण आली आमची "
"काय काकू आठवण नेहमी येते पण वेळेचं नव्हता आज मिळाला म्हटलं भेटून यावं आणि मीरा कुठे ती फोन रेसिइव्ह करत नाही आहे "
"अरे ती गिटार क्लास ला गेली आहे "
"गिटार "
"हो मॅडम गिटार शिकतायत "
"व्वा ग्रेट "
"काय ग्रेट कसलं ग्रेट "
"काय झालं काकू "?
"काय सांगू सुबोध तू तिचा बालपणीचा मित्र तुला आमच्या घरातलं काही लपलं आहे ह्या पोरीचं काहीच कळत नाही रे लग्नाचं वय झालाय पण लग्न करायचं मनावर घेत नाही रे ...विषय काढला कि टाळते मनात काय झालाय हिच्या काहीच कळत नाही विचारले तर फक्त मला लग्न करायचंच नाही असं असत का वयात आलेली पोर सासरी गेली कि आईबाबा ची काळजी मिटते रे, पण हिला कोण सांगणार नातेवाईक सगळे विचारता.. मग काय चांगलं स्थळ मिळाल नाही म्हूणन सांगतो पण स्थळ पाहिलंच नाही तर मग पुढे आणि काय सांगू शकतो तू तरी समजावं तिला आयुष्यभर आम्ही नसणार तिच्या बरोबर तिला कस कळत नाही "
"काकू बरोबर आहे तुमचं मी पण मस्करीत तिला विचारलेल पण तिनी मला तेच सांगितलेल कि मला लग्न नाही करायचं."
" हो बघ आता काय म्हणावं या पोरीला चिंता मला लागून राहिली आहे आयुष्य असं सोपं नसत रे कोणी आवडत असेल तर सुद्धा विचारले तरी पण कोणीच नाही तीच आपलं एकच मला लग्न करायचं नाही बघ अशी कशी वागते रे ती "?
"काकू मला माहित आहे तुम्हला काय वाटत असेल त्याच मला पण एक बहीण आहे"
"एकदा मीरा सेटल झाली कि आम्ही दोघे जगू आमचे आयुष्य तिचे सुख पहाता पण कुठे काय मनाला नुसता घोर लावला पोरीने"
"काकू मी बोलेन तिच्या शी पण ऐकेल काय माहित नाही खूप हट्टी आहे ती "
"हो रे हट्टी हे मात्र तू खरं बोलास "
"पण तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल "
"होऊ दे रे बाबा बरं बस मी तुच्यासाठी चहा आणते "
"नको काकू निघतो मी मला उशीर होतोय "
"अरे बस "
"नको काकू खरचं "
"बरं बाबा "
"पण मीराचं लग्न ठरलं ना तर जेवायलाच येईन "
"ये रे बाबा तुच्या तोंडात साखर पडो "
"तुम्ही काळजी करू नका काकू "
(त्याच संध्यकाळी सुबोध ने मीरा ला फोन केला )
"हॅलो मीरा"
"हा सुबोध बोल "
"अगं कुठे आहेस तू आज मी घरी येऊन गेलो "
"अरे क्लास ला गेलेले "
"काय म्हणतोस "
"अगं भेटायचं होत तुला उद्या भेटशील "?
"का रे काही नाही गं "
"सहज खूप दिवस भेट नाही झाली ना "
"अरे मग उद्या घरी ये '
"घरी नको बाहेर भेटू आपण "
"बरं उद्या ऑफिस नंतर आपण भेटू "
"डन नेहमी च्या ठिकाणी ओके "
"ओके बाय "
(दुसऱ्या दिवशीची संध्यकाळ कॅफे मध्ये सुबोध मीरा ची वाट पाहत बसला होता )
"हाय कधी पोहोचला तू "?
"अगं पाच मिनिटे आधी"
"मग काय "
"मीरा मला तुच्याशी काही बोलायचं आहे "
"मग बोल ना त्यासाठी आपण भेटलो ना "
"मीरा काल मी तुझ्या घरी गेलेलो काकू खूप टेन्स आहेत तुच्या लग्नाबद्दल "
"मला माहीतच होते तुला आईने सांगितले असणार"
"अगं पण एकुलती एक मुलगी म्हूणन त्यांना तूंचि काळजी असणार ना "?
"हो मी कुठे नाही म्हटलं मग काळजी आहे म्हूणन मी लग्न करावं का ?"
"अगं पण काय हरकत आहे "
"पण मला नाही करायचं "
"पण का अगं आयुष्यभर तू एकटी राहणार आहेस का सोपं नसत ते '"
"का मी आता एकटीच आहे ना आणि खुश आहे आणि मला ना त्या जात्यात नाही दळायचं कोणी सांगितलं ज्या आईबाबांनी आपल्याल्या जन्म दिला त्यांना सोडून लोकांच्या घरी जायचं., त्याना आपलंस करायचं त्याचे ते रीती रिवाज मग तो नवरा सांगतो तेच ऐकायचं. मग आपल्या मनाचं काय मारून जगायचं. कशाला तर नातं टिकवायला हवं म्हूणन ... ते ही लोकांसाठी मला हा कन्सेप्टच आवडत नाही. तुला माहित आहे का, मधुरा माझी चुलत बहीण लग्न झाल्या नंतर अशी बदली कि ती पहिली कशी होती आणि आता कशी आहे .. ह्यावर विश्वास बसत नाही आणि तसं ही मी एकुलती एक माझ्या लग्नानंतर आईबाबाच काय त्याना हवं नको ते कोण बघणार मी दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याची सेवा करणार आणि माझे आई बाबा आणि स्वतःच्या घरी यायला सुद्धा दिवसाची भुभा मग का करू मी लग्न ?ज्याने माझे अस्तित्वच बदलेल? सांग ना खरंच त्यामुळे मी ठरवलं लग्न वैगरे करायचं नाही आई बाबा ची सेवा करत आपले जीवन मस्त पणे जगायचं "
"अंग पण काका काकू ची चिंता आहे म्हूणन तू नाही म्हणतेस का? पण तुला समजुदार जोडीदार पण मिळू शकतो जो त्याची पण जबाबदारी घेईल. जस्ट थिंक ओव्हर इट "
"नो सुबोध, मला कोणावर अवलूंबन नाही राहायचं मेन म्हणजे मला ह्यात पडायचं नाही मस्त आपली आवड जपत लाईफ जगायला हवी जगताना सुद्धा आपण आनंदित असणे गरजेचे आहे . नुसते जगण्याला काय अर्थ सांग ना आहे का अर्थ ?"
आई एम स्पीच लेस मीरा
"मग मला नको विचारत जाऊ हा प्रश्न "?
"ओके "
"'अलोन इस बेटर अँड सेफ थेन लिविंग विथ स्ट्रेंजर सुबोध "