Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

अलक - गुलमोहर

अलक - गुलमोहर

1 min
207


लग्न होऊन काही महिने झाले होते. जास्मिन आई शी फोनवर बोलताना जरा ठसक्यातच म्हणाली, "तुमच्या वेळी लेडीज कश्या ग इतकं काॅम्प्रमाइज़ करायच्या?" त्यावर आई जरा भूतकाळात हरवत बोलून गेली, "मागच्या अंगणातला गुलमोहर होता माझ्या सोबतीला!"


रोज रात्री जेवणानंतर सूरज आणि निशा शतपावली करायला जायचे. जरावेळ पारावर निवांत बसायचे. दिवसभरातील आपआपला हालहवाल शेअर करायचे. धकाधकीच्या आयुष्याच्या उन्ह-पावसाळी, सगळा शिन विसरून परत ते दोघं ताजेतवाने व्हायचे. त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार तो गुलमोहर आजही तसाच उभा आहे. पण आता त्याला बहर येत नाही.......


सुट्टी म्हटली की त्या दोघी हमखास तिथेच खेळताना सापडणार. मीरा आणि राधा दोघींचीही आवडती जागा म्हणजे त्यांचा गुलमोहर. रुसवे फुगवे यात बहरत गेलेली त्यांची मैत्री कधी एवढी घट्ट झाली कळलंच नाही. अजूनही माहेरी आल्या की तासंतास गप्पा मारत बसतात त्या सावलीत. हे बघून वयस्क गुलमोहर सुखाऊन म्हणतो, "ही सर सोशल मीडिया वरच्या नात्याला कशी येणार!".......



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics