Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pallavi Udhoji

Drama Others


3  

Pallavi Udhoji

Drama Others


अकस्मात

अकस्मात

3 mins 11.8K 3 mins 11.8K

सकाळचे पाच वाजले. अलार्म वाजताच दचकून उठले. मस्त स्वप्नात रंगलेली मी, का जाग आली मला? छान स्वप्न बघत होते ना. जाऊ द्या जर स्वप्न कंटिन्यू करता आले असते तर किती छान झाले असते असे म्हणतच अंगावरचे पांघरूण बाजूला सारून मॉर्निंग वॉक साठी तयार झाले.


    गार्डन मध्ये फिरून झाले की मैत्रिणी सोबत गप्पा करायच्या आणि घरी येऊन ऑफिसला जायची तयारी अस रोजच माझं रुटीन.


     पण कोणास ठाऊक काहीतरी आज घडणार अस माझ्या मनात सारखं का येत होतं कोणास ठाऊक. तयारी करून मी माझे कामाला लागली. ऑफिसची बस दारासमोर उभी राहिली. लगबग करून कशीबशी ऑफिसला जायला निघाली. मनात भीतीचे सावट घर करून बसले. माझ्या कामात दोन तीन चुका झाल्या बॉसचा ओरडा खावा लागला. माझ्या हातून असं कधीच होत नाही. ऑफीसमध्ये ही काही मन लागत नव्हतं. कसबसं काम आटपून घरी आली.


  त्या दिवशी मला प्रवीणची खुप आठवण येत होती म्हणूनही कदाचित मन लागत नसेल हा विचार मनात डोकावून गेला. काही वर्षांपूर्वी प्रवीणचा एका कार अपघातात मृत्यु झाला तेव्हापासून मी आणि अन्वेशा आम्ही दोघी आणि सासरे असे एकत्र राहत आहोत. प्रवीण लहान असतानाच सासुबाई च्या हृदयविकाराने मृत्यू झाला तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत घरात बाईमाणूस नसल्याने मन कोणा जवळ तरी हलक कराव अस जवळच कोणी मैत्रीण पण नाही की तिला आपल्या मनातलं बोलाव असो.


 दिवसांमागून दिवस जात होते अन्वेशा आता मोठी झाली दिसायला अत्यंत देखणी लांबसडक केस, चाफेकळी सारखे नाक, रंग गोरापान अगदी प्रवीण सारखी. तिला खूप शिकून कलेक्टर व्हायचे होते. ती अभ्यासात खूप हुशार. पुढे हीचे कसे होणार ही चिंता मनाला भेडसावत होती.


  ऑफिस मध्ये काम करत असताना मला फोन आला आणि कॉलेजमधून अचानक घरी आले अन्वेशा खूप रडत आहे मी अतिशय घाबरले मन बॉसची परमिशन घेऊन लगोलग घरी आली आईला बघताच अन्वेशा खूप रडायला लागली. काही सांगायला तयार नव्हती. पूर्ण रडून घे मग सांग. झाल्यावर अन्वेशा म्हणाली कॉलेजमध्ये मला मुलींनी चिडवले. विना बापाची लेक आणि पुढे काय ती सांगू शकले नाही.


  खरच एका स्त्रीला तिच्या साथीदार आणि मुलीला वडील नसणे हे समाजासाठी उभा राहिलेला एक प्रश्न होय. एका स्त्रीला पुरुषाच्या किती आधार असतो हे फक्त पती नसलेल्या स्त्रीलाच ठाउक. तिला कसेबसे चूप केले आणि मी माझ्याच विचारात पडले की आपण एक साथीदार निवडायला हवा होता. म्हणजे आज अन्वेशा वर ही वेळ आली नसती. जाऊ द्या असा विचार करण्यात काही पॉईंट नाही.


रूममध्ये गेली अन्वेशा रडून-रडून झोपी गेले मग मी माझ्या कामात गुंतले.


काही वर्षे गेले.. अन्वेशा आज कलेक्टर ची पदवी घेऊन येणार हे खूप मोठे स्वप्न होते. सकाळी लवकर उठली तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता.


आम्ही सगळे कॉलेजमध्ये गेलो. जसा अन्वेशाच नाव जाहीर झालं आणि अन्वेशा स्टेजवर पदवी घ्यायला जाणार. तोच तिला स्टेजवर तिचे बाबा दिसले. त्याक्षणी ती चक्कर येऊन पडली. आई धावत स्टेजवर गेली प्रवीणला पाहता मी एकदम दचकले, प्रवीण माझ्याकडे पाहतच राहिला. अन्वेशा शुध्दीवर आली. नंतर त्याने सांगितले कार अपघात झाल्यावर मी जवळ जवळ एक वर्ष कोमात होतो. अपघातात माझ्या जवळच सगळ सामान चोरीला गेल्यामुळे पोलिसांना कोणाशी संपर्क करावा हे कळत नव्हते. काही वर्ष मी एका गृहस्थाकडे राहत होतो मी माझ्या स्मृती गमावून बसलो. मागचं मला काहीच आठवत नव्हता. आज अशी अचानक भेट होईल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. नंतर ते एकमेकांच्या मिठीत खूप रडले. सगळं सुरळीत सुरू झाला. पुढे काही दिवसांनी अन्वेशा कलेक्टर म्हणून रुजू झाली. आता मला कसलीच काळजी नव्हती. देवाने सगळे सुख मला व्याजासकट परत दिले आणखी मला काय हवं होतं.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Drama