अधूरे प्रेम- भाग५
अधूरे प्रेम- भाग५
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या.
अंजलीला कधी एकदा कॉलेजला जाईन असे झाले होते.
कॉलेजचा पहिला दिवस...फारसे कुणी येणार नव्हते...
पण अंजलीला ओढ होती समीरला भेटायची.
समीरही पहिल्या दिवशी लवकरच आला होता....
फारशी मूले नसल्यामुळे त्या दोघांना बोलता येणार होते..... पण झाले भलतेच....
प्रिंसिपलनी एका तासानंतर लगेचच सुट्टी जाहीर केली.
आता काय....
एकतर इतक्या दिवसांनी बोलायला मिळणार होते.....
मग तिने समीरला विचारले ,
"आपण कुठेतरी बाहेर जाउया का ?खूप बोलायचं आहे तुझ्याशी.... पण कुठे जायचं?"
समीरच्या गावाबाहेर त्याची शेती होती. तिकडे फारसा कुणी फिरकत नसायचे... तिकडेच जायचे ठरले. एसटीने दहा मिनिटे लागणार होती... पण गेली तरीसुद्धा...पहिल्यांदा एवढे मोठे पाऊस उचलले... घरात न सांगता...फक्त समीरसाठी....एसटी तून उतरून शेताच्या दिशेने चालू लागली.समीर धनगर समाजातील मुलगा... एकुलता एक.
शेताकडे जाताना वाटेवर बकऱ्या चारायला आलेले लोक पाहून समीर अंजलीला चिडवायला लागला...."लग्न झाल्यावर तुलाही असचं माझ्या सोबत बकऱ्या राखायला यावे लागल हा...उन्हात हिंडावे लागेल, जमेल ना?".
"तुझ्या सोबत कोणत्याही परिस्थितीत रहायला आवडेल मला.".....
बोलता बोलता दोघेही शेताजवळ पोचले.
डोंगर पायथ्याशी होते. चहुबाजूंनी आंब्याची झाडे,मधोमध देवीचे मंदिर आणि शेजारीच
एक विहीर...तुडुंब पाण्यानं भरलेली. खूपच सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर होता.जवळच असलेल्या एका मोठ्या दगडावर दोघेही हात हातात घेऊन बसली.. सगळ्या गोष्टींचा विसरच पडला होता जणू !खूप गप्पा मारल्या... भविष्यात काय करावे, कसे करावे आणखी बरेच काही.....
बोलता बोलता समीर मधेच थांबला...
मंदिराच्या शिखराकडे पाहू लागला.....
अंजलीला काही कळेना...तसा समीर उठला...
अंजलीला हाताने उठवत मंदिराच्या खांबावर बोट दाखवून बोलू लागला ,"प्रेम करणारी जी जोडपी इथे येतात त्यांनी आपल्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांची नावे या खांबावर कोरलेली आहेत...एक दिवस मी पण आपल्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून असच नाव कोरणार आहे.... पण ते मंदिराच्या शिखरावर."समीरचे बोलणे ऐकून अंजली अगदी लाजून चूर झाली...सगळं खरं पण घरातील लोकांनी विरोध केला तर काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.अंजलीने समीरपुढे एक प्रस्ताव मांडला.
"हे बघ समीर,तू उंच रूबाबदार आहेस, मग तू आर्मी मध्ये का जात नाही..... त्यामुळे काय होईल की एकतर तुला मानसन्मान असणारी नोकरी मिळेल.....देशाची सेवा करायची संधी मिळेल......
आणि राहिला प्रश्न आपल्या लग्नाचा...... तर तुला नोकरी मिळाली की ..........घरातील विरोध झाला तरीही तु तुझ्या पायावर उभा असणार .....
मग आपण लग्न केले तरीही अडचण येणार नाही.....
घरचे काय थोडा वेळ निघून गेला की स्विकार करतीलच आपला."
अंजली बोलताना समीर एकटक तिच्या कडे पाहत होता. तिच्या या बोलण्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता...अंजलीच्या या समंजसपणा बद्दल त्याला खूप कौतुक वाटले होते.त्याने अंजलीला जवळ घेतली. तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन कौतुकाने तिला म्हणाला,"सगळं तुझ्या मनासारखं होईल. फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा".
बराच वेळ झाला होता....
घरीपण जायचं होतं...
समीरने अंजलीला एसटी मधे बसवले आणि दोघेही आपापल्या घरी गेले.
❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
जानेवारी महिन्यात होणाऱ्या संक्रांत सणाच्या दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये तिळगुळ समारंभ होणार होता.सगळ्या मुलींनी साडी नेसून यायचे ठरले.ठरवल्याप्रमाणे अंजली पण साडी नेसून गेली.
चॉकलेटी रंगाची साडी......
त्याच्यावर सोनेरी रंगाची सुंदर नक्षीकाम....
सोनेरी रंगाचेच छानसे ब्लाउज...
मोकळे सोडलेले लांबसडक केस...
केसात माळलेला मोगरा नि अबोलीचा गजरा.....
हलका-फुलका सौम्य मेकअप......
खूपच सुंदर दिसत होती अंजली.
अंजलीला अशा रूपात बघून समीर एकटाच नव्हे तर सगळेजण चकीत झाले.... साधीसुधी राहणारी अंजली इतकी सुंदर याआधी कुणीही पाहिले नव्हती.
समीर तर एकदम घायाळ झाला..... तिच्याकडे एकटक बघतच राहिला.मधल्या सुट्टीत त़ो अंजलीकडे गेला.....अंजली मला तुझ्या सोबत फोटो काढायचाय.येशील का ? अंजलीला एकटे समीरसोबत फोटो काढणे शक्य नव्हते... मग त्यांनी ग्रुपमध्ये फोटो काढायचा ठरवलं....
मैत्रीणीच्या वडिलांचा फोटो स्टुडिओ होता तिकडे जाऊन फोटो काढले.
कॉलेज सुटल्यानंतर अंजली घरी जायला निघाली...
पण समीरला तिच्या सोबत वेळ घालवायचा होता...
मग तोही तिच्या बरोबर तिच्या एसटीने जायला निघाला.दोघेही शेवटीच्या सीटवर शेजारी शेजारी बसले.पूर्ण रस्त्याभर समीर तिच्या कडे बघतच राहिला...अंजलीचे गाव आले..तसा तोपण उतरला.. आता मात्र अंजली घाबरली..घरापर्यंत येतोय की काय असे वाटले तिला.तो तसे काही करणार नाही याची खात्री पटली नि तिला हायसे वाटले.तो अंजली दिसेनासे होईपर्यंत तिथेच थांबला आणि परत माघारी गेला.
बारावी झाल्यावर सगळ्या मैत्रीणी अलग होणार म्हणून त्या प्रत्येक आठवड्यात एकीकडे असे एकमेकीच्या घरी जायचं ठरवलं.
असच एकदा समीरच्या गावी जायचं ठरवलं. मैत्रीणीने समीरला आधीच याची कल्पना दिली होती..
गावात शिरताच पहिल्यांदा समीरचे घर होते म्हणून त्याच्याच घरी गेले सर्वजण.समीरची आई घरी नव्हती म्हणून त्यानं काकूला चहा ,पोहे बनवायला सांगितले होते...
समीर अंजलीच्या समोरच बसला होता.... मनापासून खूश दिसत होता.... त्याची सगळ्यात प्रिय व्यक्ती,होणारी बायको पहिल्यांदा घरी आली होती.
अर्थातच कुणाला याची माहिती नव्हती.
अंजलीला देखील असच काहीतरी वाटत असावे.
पोहे पुढ्यात होते पण घास घशाखाली जात नव्हता....
तसचं ठेवले तर ते वाईट दिसेल..
काय करायचं...
पण म्हणतात ना प्रेम करणारे एकमेकांना नीट ओळखतात तसेच झाले... अंजलीला पोहे संपत नाही हे लक्षात आलं त्याच्या... त्याने हळूच आपली प्लेट तिच्या कडे सरकवली आणि त्यात कमी कर म्हणून खुणावू लागला... मैत्रीणीने हे पाहिले आणि चिडवायला लागली... उष्टे पोहे खाल्ले म्हणून.
समीरच्या घरातील चहापोहे झाल्यावर एकेक करून सगळ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन झाले. दिवस कसा गेला कळलेच नाही.