Savita Jadhav

Tragedy Action

3.7  

Savita Jadhav

Tragedy Action

एक प्रवास असाही

एक प्रवास असाही

2 mins
261


साधना...एक पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी.घरची गरिबी असल्याने आजोळी रहायला होती.आजी रोज सकाळी लवकर उठायची.सडा सारवण,गुरांच्या धारा,त्याची चारापाणी सगळं करायची.

टोपलं भरून चपात्या करायची,एकीकडे चुलीवर चपात्या आणी दुसरीकडे चहाच पातेल. सकाळी सकाळी दात घासून तोंड हातपाय धुवायचे आणि चहा चपातीवर ताव मारायचा. खूप भारी दिवस असायचे.

चपात्या झाल्या की लगेच आजी दुपारच्या जेवणासाठी पण भाजी भाकरी आमटी काय असेल तर बनवून घ्यायची,तोवर साधना इकडे कपडे भांडी आटोपून घ्यायची.झाल दहा वाजले की शेळ्यांच्या दोऱ्या सोडायच्या अन शेळ्या घेऊन शेताचा रस्ता धारायचा.मजल दरमजल करत रस्त्याच्या कडेकडेन चालू लागायचं.मधेमध्ये बाकीच्या बायका पण येऊन मिसळायच्या.. आस करत करत सगळ्याजणी मिळून 12 ते 13 किलोमीटर कापत चालत प्रवास करून कामाच्या ठिकाणी शेतावर हजर व्हायच्या.

जाताना नेमक् कोणत्या शेतात जायचं हे माहित नसायचं.त्यामुळे साधना सगळ्यासोबतच नाईलाजान चालायची.दिवसभर आजीसोबत शेतात काम करायची.

काम करता करता खुरपलेलं गवत शेळ्यांना खाऊ घालणं, त्याना पाणी पाजवणं यासारखी काम करायची,पिण्याचे पाणी संपले तर शेजारच्या विहिरवर एक हौद असायचा तिथून पाणी आणायचं..सगळ्यात लहान असल्यामुळे अशी काम सगळे तिलाच सांगायचे..दुपारी झाडाखाली बसून सगळ्यांसोबत जेवण करायचं अनि पुन्हा कामाला लागायचं.पाच वाजता सुट्टी व्हायची..साधना दमून जायची अगदी..पण पर्याय नसायचा..मग रस्त्याच्या कडेन घरी जात असताना मागे पुढे मागे पुढे बघत ती चलायची...का...?

कारण की जातायेता कुणीतरी ओळखीचं दिसेल,आणि गाडीवरून किंवा सायकलवरून तिला घरापर्यंत सोडेल म्हणून...अगदी रोज नाही ..पन् आठवड्यातून एखाद्या वेळी कुणी ना कुणीतरी ओळखीचं भेटायचं..मग साधना ची आजी त्यांना थांबवायची,आणि सांगायची आमच्या पोरीला तेवढं घराजवळ सोडा ,दमलीय दिवसभर काम करून,,,साधना एवढी खुश व्हायची...

सायकल किंवा गाडीवरून लवकर घरी पोचायची,पोचल्यावर हातपाय तोंड धुवून, फ्रेश होऊन आजीची वाट पाहत बसायची.आजी आल्यावर आजीच्या डोक्यावरच गाठोडं नेऊन घरात ठेवायच,शेळ्या बांधायला मदत करायची,चहा ग्यायचा आणि जेवण बनवून होईतोवर अभ्यास करायचं.

दिवसभर काम करून दमलेली असताना एखादि गाडी किंवा सायकल सापडणं म्हणजे तिच्यासाठी जणू विमानाने प्रवास करण्या इतक आनंदाच असायचं.

असा होता साधनाचा सुट्टीच्या दिवसातला रोजचा प्रवास...कसा वाटला नक्की सांगा

आवडल्यास like , comment, share करायला विसरू नका. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy