अधूरे प्रेम - भाग ४
अधूरे प्रेम - भाग ४


समीर..
अंजलीला आवडलेला मुलगा.
स्वप्नातला राजकुमार.
तिच्या वर्गातच होता.
दिसायला देखणा... उंच...रूबाबदार
अभ्यासात जेमतेमच होता. पण त्याच्या साधेपणा अंजलीला खूपच मनाला भुरळ पाडून गेला.
कुठल्याही मुलीकडे तो कधीही बघायचा नाही... इतर मुलांप्रमाणे हुल्लडबाजी नाही... नाकासमोर चालनारा...कुणाच्या आध्यात ना मध्यात. शांत स्वभावाचा होता खूप. अंजली च्या मनासारखा....
समीर च्या शेजारी राहणारी मुलगी अंजलीची मैत्रीण बनली होती. समीर नेहमीच उशिरा यायचा. एसटी उशिरा यायची. पण प्रिंसिपल सरांना माहिती होते हे त्यामुळे तिकडच्या मुलांना वेळ झाला तरीही वर्गात घ्यायचे.
अंजली सतत त्याच्या कडे बघत असायची. त्याच्याही ते लक्षात आले होते बहुतेक.... कधी तो आला नाही तर ती कावरीबावरी व्हायची... कशातच लक्ष लागायचे नाही... पण हे त्याला कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता.वाढदिवस होता अंजलीचा....मैत्रिणी नी कॉलेज ला आल्याबरोबर तिला शुभेच्छा दिल्या. पण अंजली मात्र समीरची वाट बघत होती. पण समीर आलाच नाही त्या दिवशी.खूपच उदास झाली ..कॉलेज सुटले तशी समीरच्या घराशेजारी राहणारी मैत्रीण अंजलीकडे आली आणि हात पुढे कर म्हणाली...
अंजली काही ऐकून घ्यायला तयार नव्हती तिला समीरच्या बद्दल चौकशी करायची होती...
तिनं विचारले मैत्रीण ला समीर ठीक आहे ना गं ? आला का नाही तो ? मैत्रिणी ला हसू आवरेना..
.अंजलीकडे पाहून... तिचा उतावळेपणा पाहून मैत्रीण आणखीन हसू आवरत होती. अंजलीला काही कळेना का हसतेय ते....
अग काय झाले सांगशील का?....
मैत्रिणीने हसू आवरले आणि सांगितले की समीरच्या घरात काहीतरी काम आहे म्हणून तो आला नाही.... पण त्यानं तुझ्या साठी काहीतरी दिलय माझ्या कडे
हेच हवे होते न तुला ?असे म्हणून मैत्रिणी ने एक चिठ्ठी आणि कानातले इअरिंग्ज अंजलीला दिले. आता मात्र अंजलीला काय करावे कळेना... कावरीबावरी झाली.... तिनं ते इअरिंग्ज कानात घातली... पहिल्यांदा कुणीतरी अस गिफ्ट दिले होते. आया उत्सुकता होती चिठ्ठीत काय लिहिले होते याची....
प्रिय अंजली....
मला माहिती होते तच आज माझी वाट बघत असणार.
मला अचानक घरी काम निघाले म्हणून कॉलेज ला येता नाही आले.... म्हणून ही चिट्ठी पाठवली आहे. मी कधीच चिठ्ठी वगैरे काही लिहिले नाही... पहिल्यांदा तुझ्या साठी लिहिले आहे.... काही चुकले तर समजून घे...सगळ्यात आधी तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अंजली.... हे तुला प्रत्यक्ष सांगता आले असते तर किती छान झाले असते ...पण ठीक आहे....
अंजली,,,,,
मला माहिती आहे मी तुला आवडतो....
तु माझ्या कडे पाहतेस ....हे पण समजतं गं मला....
मी कुणाला आवडेल असं कधीच वाटले नाही....
पण तुझ्या डोळ्यात ते दिसले... मैत्रीण कडे तु सतत माझी विचारपूस करतेस...सतत माझ्या बद्दल बोलतेस हे सुध्दा मला माहिती आहे. ........मलाही तु आवडते गं......पण सांगायला हिम्मतच होत नव्हती...... म्हणून चिठ्ठीत लिहून दिले. मी सुद्धा तुझ्या नकळतपणे तुझ्या कडे पाहत असतो...
तुझं हसणं,बोलणं खूप आवडते मला पण ...तू नसली की मलाही कॉलेज मधे थांबावे वाटत नाही.... करमतच नाही... तू सारखे नजरेस
मोर असावी असे वाटते.... मी पण खूपच प्रेम करतो तुझ्या वर....बस्स इतकचं... मला यापेक्षा काही नाही लिहता येत...तु समजून घेशील ना ?
तुझा फक्त तुझा...
समीर
आता तर अंजलीला आभाळ ठेंगणे झाले. याच उत्तर कसं द्यायचे.... मग तिने एक कविता पाठवली...
वाचली होती कुठेतरी....
पहिल्यांदा मी पाहिलं तुला....🌷
नजर भिडली नजरेला...🌷
सांगून गेली ती मजला....🌷
जीव हा तुझ्या वर जडला...🌷
नकळत हे कसं रे झालं...🌷
समजून सुध्दा नाही रे आलं...🌷
मन माझं तुझ्या कडे ओढलं....🌷
सगळं कसं क्षणात घडलं.🌷
झालं .....
या कवितेतून अंजली तिच्या मनातल्या सगळ्या भावना बोलून रिकामी झाली. आणि अंजली..... समीर यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.
अंजली आणि समीर ने एकमेकांना आपल्या भावना बोलून दाखवली.एकमेकांना कधीही न सोडण्याची शपथ देखील घेतली.त्या दोघांना एकमेकांची इतकी सवय जडली होती.... की दोघापैकी एकजण गैरहजर असेल तर दुसरा देखील अर्ध्यातून कॉलेजमधून निघून जायचं.वार्षिक परिक्षा जवळ आली होती. अभ्यास तर चालू होताच पण अधिक काळजी होती ती सुट्टीत काय करायचं.... एकमेकांना भेटायला मिळणार नाही.... कसं व्हायचं.मग समीर ने एक उपाय शोधून काढला. एस टी च्या डेपोला लागून एक एसटीडी बूथ होते. जे समीर च्या मित्राचे होते. समीरने तिथला फोन नंबर अंजलीला दिला.तिला सांगितले की प्रत्येक सोमवारी दुपारपर्यंत मी तुझ्या फोनची वाट बघेल.अंजली ने पण होकार दिला. परीक्षा झाली.दोन महीने उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या.
सुट्टी लागल्यावर पहिल्या सोमवारी ठरलेल्या प्रमाणे समीर अंजलीच्या फोनची वाट पाहत होता. पण अंजलीच्या घरी अचानक पाहुणे आले त्यामुळे तिला घराबाहेर निघता आलेच नाही. समीर वाट बघून निघून गेला. पुढच्या आठवड्यात मात्र काही झाले तरी समीर ला फोन करायचाय असे तिने पक्के ठरवले.
सोमवार उजाडला. आई बाबा दोघेही शेतावर गेले होते. अंजलीने पोटात दुगतय असे सांगत घरीच राहिली. आणि ठरवल्याप्रमाणे फोन करायला गावातील एसटीडी बूथवर गेली. तिनं फोन लावला. पलीकडच्या बाजूने आवाज ऐकू येताच,
"समीर आहे का तिकडे ? "असे विचारले.
"अहो वहिनी, समीर वाट पाहून आत्ताच गेला...काही निरोप असेल तर सांगा...मी सांगेल समीरला."
वहिनी....हे शब्द ऐकताच अंजली एकदमच बावरल्यासारखे झाली.ही गोष्ट जर सगळ्याना समजली तर काय होईल.समीरलाएवढे पण कळू नये का ?उगीच कशाला सांगत बसायचे.. आणि त्यात अंजलीचा चूलत भाऊ त्याचे मित्र नेहमीच त्या बूथवर असायची. चुकुनही कुणाला समजले तर खैर नाही.अंजलीचे समीरशी बोलणं तर झाले नाही पण काळजी मात्र वाढली.
नंतरच्या सोमवारी अंजली पुन्हा फोन करायला गेली. यावेळी मात्र समीरने फोन घेतला.... एकमेकांना आवाज ऐकून खूपच भारावल्या सारखे झाले. सुखावली दोघेही.. खूप दिवसांनी .....
नव्हे पहिल्यांदा बोलत होती ती.
पण वेळेची आणि पैशाची मर्यादा होती. त्यामुळे जास्त बोलू शकत नव्हते.अंजलीने तर कुणाला काही सांगू नको म्हणून ताकीद दिली.....आणि आता कॉलेज सुरु झाल्यावर बोलू...मला सारखे फोन करायला यायला जमणार नाही म्हणून सांगितले. समीरला देखील हे पटलेच...फोनवरच एकमेकांना निरोप देऊन ते दोघेही आपापल्या घरी गेले.