Shrikant Dixit

Abstract Others

3  

Shrikant Dixit

Abstract Others

अडगळ

अडगळ

2 mins
232


लाॅकडाऊनचा पीरियड सावित्रीला शाळेला सुट्या लागल्या होत्या. पतिदेव पण घरीच होते.. दोन मुलीच दोन्हीची पण लग्न झाली होती. ड्युटी, घर यामध्ये ही दोघेही व्यस्त. घराकडे पहायला वेळ कोणाकडे??.. पण आता काही नाही.. ही सुट्टी घराकडेच लक्ष द्यायचे..घर आटोपायचे..बरेच दिवस घरातील अडगळीकडे पाहिले नव्हते.. प्रत्येक घरात अशा काही जागा असतात की तेथे आडगळ ठरलेली ..सापडते ..!!


बेड उचलले की, प्लास्टिक बॅग्ज, कागद, पावत्या..या गोष्टी ओघाने आल्याच.. खरं तर मनात सुद्धा असा पसारा पसरलेला असतोच..मग हेवेदावे, शंकाकुशंका, मानापमान, अहंकार म, अहंभाव अशा कितीतरी गोष्टी पहायला मिळतील.. एक एक वेचून बाजूला काढल्या तर अवघे मन प्रसन्न होईल..


तसंच आज घर प्रसन्न करायचा चंगच बांधला होता सावित्रीने..!! बाथरूम वरील लाफ्ट खरं तर प्रत्येक घरातील एक विशिष्ट जाग..हमखास सर्व निरुपयोगी वस्तूंच्या साठवणींचे ठिकाण!! आज कोणतीच अडगळ ठेवायची नाही. पहिला मोर्चा बाथरूमच्या लाफ्टवर..पतिदेव खुर्चीवर उभा राहिले मग खालून यांची ऑर्डर..ती ती.. ट्रंक घ्या खाली..खाली दिल्यानंतर.. एक एक वस्तू बाहेर काढून हातात घेत होती.."अरे, या तर लग्नातील मुंढावळ्या.." दोघांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्या. मनातील हिरवा कप्पा अधिकच हिरवा झाला. दोघेही भाऊक झाले.. 


"ही तर आपली आठवण..!! याला अडगळ कशी म्हणायची..?"


मग पुढे जाऊन एक खुंची टोपडं काढले .. तर ती दोन्ही मुलीनी लहानपणी वापरलेली.. त्यांचे घरभर रांगणे..बागडणे सरकन डोळ्यासमोर तरळले.. राहू देत हे.. नातवंडांना देऊ. असं एक एक वस्तू आठवणी जाग्या करत गेल्या. घर आवरणं दूर पण मनातील एक एक कप्पा उलघडला गेला.. 


"किती गोड.. आठवणी..दोन्ही ठमाया किती गोंधळ घालायच्या..अशा एक एक आठवणी अडगळ कशा म्हणायच्या..?..


"नको.. नको यातलं काहींचं काढायला नको..ठेवा वर!!"


"ते..ते..तिथं मागे काय दिसतंय??.." अगदी टाचा उंच करत विचारलं..


"अगं, तांब्याचा हंडा व पितळेची पातेली आहेत.."


"राहू द्या.. राहू द्या.. नका काढू.. अहो त्यात सासू सासऱ्यांचा जीव आहे हो..उतरा खाली.. काही नाही अडगळ घरात, ज्या काही आहेत त्या आठवणी.. नुसतंच चार भिंतीचे घर असते असे नाही.. असतात एक वेगळेच ऋणानुबंध !!"


असं करत करत काहीच अडगळ मिळाली नाही.. पण रिकामं पण काही झालं नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract