STORYMIRROR

Shrikant Dixit

Inspirational

2  

Shrikant Dixit

Inspirational

मी श्रमिक बोलतोय...

मी श्रमिक बोलतोय...

2 mins
132

हो मी श्रमिक बोलतोय....

होतो अत्याचार सहन करत मी..


माझ्या कामाला कधी घड्याळ लागलंच नाही.. फक्त काम एके काम. ना कामाच्या तासांना मर्यादा कि ना साप्ताहिक सुट्टी!!..गुलामगिरीचा पिळवटून टाकणारा इतिहास वाचनालय ना?.. अगदी जेरबंद म्हणजेच साखळदंडात अडकवून ठेवल्यासारखी स्थिती. हे सर्व सहन करत असताना मन थाऱ्यावर व्हायचं, अगदी पेटून उठायचे. पण यातून बदल होणे शक्य नव्हते भ, कारण आम्ही संघटीत कोठे होतो, लढा देण्यास??...अल्पशा पगारात बारा ते चौदा तास राबवायचे शिवाय सुट्टी नावाचा प्रकार नाही. जीव धोक्यात घालून काम करायचे, कोणतेही सुरक्षिततेचे निर्देशांक नाहीत!!..


मग यातून झाली ना औद्योगिक क्रांती!!..पण प्रश्न सुटले का?? पिळवणूक ही व्हायची. यातूनच आमची एकजूट वाढत गेली. कोणत्याही औद्योगिक क्षेत्रातील महासत्तेला न जुमानता आंदोलन उभा राहिले. मग एक एक मागणी बळ धरू लागली.मग त्याकाळात दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाली. या सर्व मागण्या वर प्रकाशझोत टाकला..१ मे १८९१ साली हे सफल झाले. यात प्रामुख्याने खालील मागण्या मान्य झाल्या व कायद्याच्या चौकटीत बांधल्या गेल्या..


१. आठ तासाचा कामाचा वेळ

२. बाल मुजूरीला बंदी.

३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा

४. कायद्याने साप्ताहिक सुट्टी.

५. कामाचा मोबदला हा पैशात मोजणे.

६. रात्रीचे काम तसेच धोक्याच्या ठिकाणी सुरक्षितता प्रणालीची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे.

७. कान वेतन कायदा.


आज माझा श्रमिक मित्र यामुळे सुखी झाला आहे. हा क्रांतीदिनच माझ्यासाठी गौरव दिन ठरला..१ मे हा कामगार दिवस साजरा केला जातो.

आता मी एवढे लिहू शकलो कारण मी औद्योगिक क्षेत्राचा एक घटक आहे. वरील गोष्टींवर कायद्याचा अंकुश आहे. या क्षेत्रात आरोग्यासोबतच कामगारांच्या सुरक्षिततेवर खास करून लक्ष दिले जाते. त्यासाठी सेफ्टी डिपार्टमेंट असते. शासन अधिकारी फॅक्टरी इन्स्पेक्टर याची वेळोवेळी परिक्षण करतो.


आपण ही या कामगार दिनाच्या चार ओळीत तरी मते मांडावीत. कारण घरकाम करणार्या महिलांपासून शेतात राहणारा मजूर सुद्धा एक श्रमिक आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational