Shrikant Dixit

Fantasy

3  

Shrikant Dixit

Fantasy

मनमंजिरी

मनमंजिरी

1 min
193


❣💕❣💕❣💕❣


 धा..धिन धिन्ना तिरकीट तिन्ना...

पाय थिरकतात तर घुंगराचा नाद हृदयाचे स्पंदन काहीसं वाढवतात. तळहातावरील लांबसडक बोटांनी केलेली महिरप..ती भावमुद्रा!! अगदीच ठाशीव शब्दात सांगायचे झाले तर ते आरस्पानी सौंदर्य मनाला भुरळ घालणारेच..!!


तू ल्यालेले वस्त्रांलकार व त्याची रंगसंगती.. आज नभीचा इंद्रधनू भूवरी आवतरलाय अन् या महाली आलाय की काय? क्षणभर नजर विसावली बघ त्या रंगसंगतीत.. मी ही भान हरपून गेलो. मेहंदीचा रंग तर आज अधिकच गडद झालाय..हो माहित आहे मज ..खूपच जीव लावलाय मजवर.. मी ही..हो तुझी ती भावमुद्रा..कमल नयनांनी घेतलेला वेध..सार कसं मनमोहक.


अन् एकदाच त्या नटराजाच्या मूर्तीकडे पाहिलेस अन् एक गर्रकन स्वतःभोवती एक गिरकी घेतली. मंचावर मध्यभागी कधी आलीस हे कळलेच नाही. मग मात्र एकएक पाऊल लयबद्ध घुंगराच्या तालावर डोलायला लागले. छनछन आवाज ऐकला की तुझ्यात काय संचारते हे समजतच नाही. अगदी घुंगरातच पाऊस बांधलाय की काय? अन् खळखळ वाहणारी सरिता जशी वळणावळणाने वाहते अगदी तशीच मंचावर सर्व तुझाच ताबा. तल्लीन झाली होतीस त्या नृत्य पदकमलाच्या कसरतीत पण नेत्रकटाक्ष मात्र मला शोधण्यात व्यस्त होता. हरवून गेलीस जरी त्या तालात तरी ताल चुकलाच बघ... हो मला पाहताच तो ठेका चुकला... माझादेखील काळजाचा ठोका चुकलाच... पण क्षणात सावरलीस कोणालाच त्याचा थांगपत्ता लागू दिला नाहीस. 


कुंतलात माळलेला गजरा लक्षवेधक आहे बरं का! जणू आज कुंतलदेखील सखीच्या आनंदात डोलतात कसे... अगदीच विलोभनीय दृश्य! मुखकमलावरील भाव तेजाने अधिकच रंगतदार दिसून लागलेत... 


एकरूप होता भाव

पदकमल डोलती छान

साथ संगीताची लाभता

हरपते सारे देहभान


🍀🌷🍀🌷🍀🌷


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy