अब पछताएँ होत क्या............
अब पछताएँ होत क्या............


सुलभा खूप बेचैन असते तिने घेतलेला अमेरिकन डायमंडचा सेट तिला सापडत नसतो. ती जंग जंग पछाडते पण तो सेट तिला सापडत नाही. मग ती तिच्या घरी काम करणा-या सुनंदाला विचारते "अगं सुनंदा काल मी तुला दाखवायला घेतलेला सेट कुठे गेला? मी आत चांगल्याने चहा करायला गेले ,तेव्हा तू एकटीच बाहेर होतीस "."अहो ताई ,मी खरंच घेतला नाही तो सेट. आम्ही गरीब माणसं आम्ही काय करणार तो सेट घेऊन?आम्हांला असले दागिने घातलेले शोभायला तसे चांगले कपडे तरी पाहिजेत की!!"
बघता बघता सुनंदाच्या डोळ्यांना धारा लागतात. ती परोपरीने विनवून सांगते " मी खरंच नाही घेतला मी फक्त बघितला. खूप छान आहे असे म्हणाले. पण ताई मी असलं वंगाळ काम नाही करणार . एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालंल पण मी चोरणार कधीच नाही" स्वाभिमानी सुनंदा असल्या घाणेरड्या आरोपांमुळे सुषमाचे काम सोडते. सुनंदाने चोरी केली म्हणून काम सोडले असा सुषमा अपप्रचार करते. सुनंदा जिथे काम करायची तिथे तिने उत्तम विश्वास संपादन केलेला असतो त्यामुळे तिच्या कामांवर काहीही परिणाम होत नाही.
नंतर काही काळाने तिच्याच घरात तिच्या नव-याच्या हातून आवरताना पेपर रद्दीच्या कप्प्यात रद्दी देताना तो सेट सापडतो. सुषमा खूपच मनात नाराज होते. आपण उगाचच तिच्यावर चोरीचा आळ घेतला. पण करणार काय? आपलेच दात नि आपलेच ओठ !!
काही काळ जातो शाळेतून येताना सुषमाच्या मुलाला आनंदला अपघात होतो . त्याला जबर जखमा होतात. रक्त द्यायची वेळ येते. नुसते एकाच ब्लडग्रुपचे चालत नाहीतर क्राँसमँचही व्हावे लागते. त्यात सोसायटीतील सर्वांचे रक्त तपासले तरी त्याच्या रक्तगटाचे क्राँसमँच होणारे रक्त मिळायला तयार नव्हते .
अचानक धापा टाकत सुनंदा धावत धावत तिथे येते. आनंद तिचा खूप खूप लाडका तिने त्याला खूप हाका मारल्या तरी तो बेशुद्ध असतो. शेवटी ती स्वतःचे रक्त तपासायला देते आणि किय आश्चर्य !! सुनंदाचा रक्तगट जुळून क्राँसमँचही!! आनंद आजारातून पूर्ण बरा झाल्यावर त्याला खूप छान वाटते.
सत्यनारायण पूजेला बोलवायला सुषमा त्यांच्या घरी जाते, तेव्हा तिची आई म्हणते "आम्ही पूजेला येऊ. देवाच्या पूजेला डावलता येत नाहीपण ताई तुम्ही माझ्या सुनंदावर का चोरीचा आळ घेतलात? का ती चोरटी आहे असा अपप्रचार केलात? का तिला रडवलेत? अहो मी अशी आजारी!! तिची कामे सुटली असती तर आम्ही काय खाल्ले असते? मचा खेळ होतो पण आमचा जीव जातो हो!! आनंदला अपघात झाल्याचे आणि रक्त हवे कळल्यावर तशी परस्पर हॉस्पिटलला धावत गेली !!"त्या धाय मोकलून रडू लागल्या. सुषमा त्यांच्याजवळ जाऊन सांत्वन करु लागली "माझे चुकले हो मी अनंत अपराधी आहे मला माफ करा प्लीज"
सुषमाने डोळ्यांत पाणी आणून माफी मागितल्याने आणि पूजेला डावलू नये म्हणून दोघी सत्यनारायण पूजेला जातात
मनोभावे नमस्कार करुन प्रसाद घेऊन निघणार तोच सुषमा त्यांना कपडे घेऊन येते. तिला रडू कोसळते "आई सुनंदा मी खूपच चुकले हो!! मला क्षमा करामी तुमच्यासाठी हे प्रेमाने आणलंय हो!! ते प्लीज घ्या ना!!
सुनंदा पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली"ताई तुम्ही हे प्रेमाने आणलेल्याचा आदर करते पण आम्हांला हे नको मी रक्तदान केले म्हणून हे देत असाल तर ती आनंदच्या आयुष्याची किंमत होईल खूपच अनमोल आहे त्याचं आयुष्य कळताक्षणीच धावत आले त्याच्यासाठी !तुमच्या विनंतीला मान देऊन आनंदवरच्या प्रेमासाठी माघारी यावेसेही वाटले पण खरं सांगू विश्वास हे काचेचं भांडं असतं त्याला तडा गेला तर परत जोडता येत नाही क्षमा करा मला!!"दोघीही पाणावल्या डोळ्यांनी जातात
सुषमा मटकन खालीच बसली"अब पछताएँ होत क्या..........."