akshata kurde

Drama Inspirational

3  

akshata kurde

Drama Inspirational

"आय सेड नो... नो मिन्स नो.."

"आय सेड नो... नो मिन्स नो.."

4 mins
389


मनस्वी तिच्या बालमित्राशी खुप कनेक्टेड होती. अमेय तिच्या खुप मनाच्या जवळ होता. दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होती पण ते कधी व्यक्त नव्हते झाले. घरी लग्नाची बोलणी चालू झाली तशी तिने ह्याबद्दल बाबांना सांगितलं. तिला अमेय सोबत लग्न करण्याची इच्छा सांगितली. बाबांनी ठाम नकार देत तिचं लग्न उच्चशिक्षित शरद सोबत लावून दिलं. अमेय ने ही मोठं मन करून तिच्या लग्नात येऊन तिला आणि तिच्या नवऱ्याला मनापासून शुभेच्छा देऊन गेला. मनस्वी ने ही मनातून सगळ्या भावना काढून आता शरद चा विश्वास तुटू न देता साथ देण्याचं वचन घेतलं. लग्ना आधी असणारी मनस्वी आता शरद ची शरयू झाली होती. तिने शरद ला खूप विनवणी केली होती तिचं नावं न बदलण्याची. पण प्रथा आहे तसेच घरच्यांना वाईट वाटेल याच सबब सांगून त्याने तीच नावं शेवटी बदललं. तिला त्यावेळी स्वराली च्या नवऱ्याची आठवण झाली. त्याच्या घरचं शिस्तीचं वातावरण असूनही स्वराली ला तिचे नाव बदलायचे नव्हते पण सांगणार कशी म्हणून ती गप्प होती. पण तिच्या नवऱ्याला कोण जाणे कळले, म्हणून ताटात त्याने स्वराली च नाव लिहिले. ह्या प्रकारामुळे त्याच्यावर घरचे खूप नाराज झाले होते पण स्वरालीचे मन मात्र तेव्हाच जिंकले. इथे शरद ला सांगूनही त्याने तिचे ऐकले नव्हते म्हणून तिला खूप वाईट वाटले. तिनेही मग शरयू नाव स्वीकारून टाकले. सासरच्यांच मन जिंकण्याच्या नादात मनस्वी स्वतःला विसरून गेली. तिचं मन असो वा नसो पण तिला मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागत. लहानपणा पासूनच ती स्वभावाने अशी बुजरी असल्याने, स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण समोरच्या व्यक्तीला कधीच ती दुखवायची नाही. कधी कधी तिला स्वतःवर खुप चीड येई तिच्या अश्या स्वभावाची. शरद ने कधीही तिला स्वतःच असं मत मांडूच दिलं नाही जरी मांडल तरी तो नेहमी खोडून काढत.


सगळे हॉल मध्ये गप्पा मारत बसले असत, ही एकटी किचन चा ओटा साफ करीत. सगळे टिव्ही बघत तर ही घर साफ करीत. रात्री सगळे रोज शतपावली करायला जायचे तर ही एकटी घरात भांडे आवरत आणि बिछाना घालत. हळू हळू तिला तिचं अस्तित्व दिसेनास झालं. पण तिला त्याची सवय झाली होती. 


लग्नाच्या दोन वर्षांनी मनस्वी ला दिवस गेले. हे कळताच घरात वातावरण बदललं. पर्वा न करणारे लोक आता तिची काळजी घेऊ लागले. मनस्वी ला एके दिवशी आईस्क्रीम खावीशी वाटली. तिने शरद ला याबद्दल सांगितले. आईला विचारून सांगतो म्हणून शरद गेला पण आईने नकार दिला. घरातले सगळे शतपावली करायला गेले आणि आईस्क्रीम खाऊन आले. मनस्वी ला वाईट वाटलं. पण त्यात तिची आणि बाळाची काळजी होती म्हणून तिने लगेच मनातून काढून टाकल. सकाळी तिला कसल्या तरी आवाजाने जाग आली. पाहते तर शरद आणि त्याचे आई वडील काहीतरी कुजबुजत होते. थोड्या वेळाने शरद आत आला आणि मनस्वी ला डॉक्टर कडे जायचयं म्हणून तिला तयार होण्यास सांगितले.

"अहो पण दोन दिवस आधीच तर जाऊन आलोत."

"हो ते रूटीन चेक अप होत म्हणून आता आपल्याला सोनोग्राफी करायचीय."

"हो करू या पण डॉक्टर ने अजुन बोलवलं नाहीये त्यासाठी नंतर ची तारीख देणार आहेत."

"हे बघ आपण दुसऱ्या डॉक्टराकडून सोनोग्राफी करायचीय तिकडे आपल्याला कळेल तुझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी." असं म्हणून शरद निघून गेला.

मनस्वी ला धक्का बसला. आपला नवरा असं कसं म्हणू शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्या सगळ्यांच्या दबावाने तिला सोनोग्राफी करावी लागली. त्यानंतर रिपोर्ट्स मध्ये मुलगी असल्याची कळले. शरद त्या दिवसापासून तिच्याशी खूप चिडून बोलू लागला. घरच्यांनी मनस्वी ला वाळीत टाकलं. तिला काय हवंय नको ते सोडा पण रात्रीच जेवण सुद्धा ह्या अवस्थेत तिला मुश्किलीने मिळू लागलं.


एके रात्री शरद खूप उशिरा घरी आला आणि मनस्वी ला झोपेतून उठवलं. आणि उद्याच आपण अबोर्शन करायला जातोय सांगून झोपून गेला. मनस्वी ला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की असं काही तिच्यासोबत घडेल. एकदा का बाळ ह्या जगात आलं तर सगळ पूर्वी सारखं होईल म्हणून ती एक एक दिवस काढत होती. आता तिला काहीच सुचेना. ती खूप एकटी पडली होती. त्यात तिला साथ देणार ही कोणी नव्हत. त्या रात्री ती पोटाला धरून रात्रभर रडली.


सकाळी शरद उठला तसा बेडखाली बसलेली मनस्वी ला तयार होण्यास सांगितले. मनस्वी ची अवस्था खूप वाईट झाली होती. रात्रभर रडून डोळे लाल झाले होते. तरी ती अवस्थेत उठून तिची तयारी करून बाहेर आली. ती आरशा समोर जाऊन उभी राहिली आणि पोटावर हात ठेवून तिच्या बाळाला शेवटचं अनुभवत होती. गाडीत बसल्यावर तीच मन तिला शांत बसू देईना. तिचा जीव खूप कासावीस होत होता. समोर तिला माणसांचा घोळका दिसला. गाडी हळू झाली तशी अचानक तिने गाडीच दारं उघडून तिने गाडीबाहेर उडी घेतली. अचानक झालेल्या प्रकाराने शरद आणि आजूबाजूला असलेले लोक घाबरले. शरद सोबत काही माणसं जमून तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांना विश्वासात घेऊन तिने सारी हकीकत सांगितली. डॉक्टरांनी पोलिसांना बोलवून घेतलं आणि शरद आणि त्याच्या घरच्यांविरुद्ध तक्रार केली.


हिम्मत दाखवुन अर्धी लढाई तिने जिंकली होती पण पुढे कसं होईल आपलं आणि आपल्या बाळाचं याच्या विचारात होती. थोड्यावेळाने मनस्वी चे आई वडील आणि अमेय तिला पाहण्यासाठी हॉस्पिटल मध्ये आले. तिच्या बाबांना खूप अपराधी वाटायला लागलं होतं तशी त्यांनी माफी ही मागितली आणि तिला केस मागे घेऊन सगळ विसरून पुन्हा नव्याने सुरवात कर आणि आपल्या घरी जाण्यासाठी विनवू लागले. मनस्वी ने बाबांना तिचा ह्या गोष्टीला नकार सांगितला. मागोमाग तिचे सासू सासरे येऊनही तिला गयावया करू लागले. पण ह्यावेळी ती ठाम होती आणि सगळ्यांना जोरात ओरडली.

"आय सेड नो... नो मिन्स नो.."


तिचा रुद्रावतार पाहून सगळे जण अचंबित झाले.पण अमेय मात्र पुन्हा एकदा तिच्या नवीन रुद्रावताराच्या नव्याने प्रेमात पडला. आता कितीही झाल तरी मनस्वी ची साथ न सोडण्याचं मनोमन ठरवलं आणि इतकंच नाही तर त्याने सगळ्यांसमक्ष मनस्वी आणि बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली.

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama