Sangieta Devkar

Drama Inspirational

3  

Sangieta Devkar

Drama Inspirational

आय एम परफेक्ट

आय एम परफेक्ट

4 mins
273


हैल्लो स्वाती अग आपल्या कॉलेजच्या सगळ्या मैत्रीणी चे गेट टूगेदर आहे. तुला पण नक्की यायचे आहे. निशा बघते मला कसे जमते. काम ख़ुप असते ग घरात वेळच मिळत नाही . माझे येणे नक्की धरु नकोस. स्वाती कीती काम काम करतेस ग जरा सव्हता साठी वेळ काढ़. बघू निशा आणि आता फोन ठेवते बाय म्हणत स्वाती ने फोन कट केला. स्वाती लग्न झाल्या पासून नुसत घर आणि काम यात गुंतलेली. घर टापटिप ठेवन आणि सतत सगळी कडची स्वच्छता करत राहणं यातच तिचा दिवस संपत असे. बेड वरची बेडशीट किंवा सोफया वरील कव्हर जरा जरी विस्कटले तरी तीला आवडत नसे. पूर्वा आणि समीर दोन मूल होती स्वाती ला . दोघेही कॉलेज स्टूडेंट् पण त्यांना ही तिने कामाची सवय लावली नव्हती कारण तिच्या सारखे परफेक्ट काम कोणा ला जमत नाही असे तिचे मत. जणु घरात हिच्या शिवाय कोणाचे पानच हलत नाही. स्वाती ला सतत काही ना काही काम लागायचे आणि स्वच्छता इतकी की जरा ही धूळ तिला खपत नसे. जणु स्वच्छतेचा तिला फोबियाच होता.


अभिषेक तिचा नवरा स्वाती ला म्हणायचा देखील की कशाला इतके काम करतेस सतत स्वच्छता करत राहतेस जरा सव्हता कड़े ही लक्ष दे. मैत्रीणी सोबत बाहेर जात जा. पण स्वाती कोणाचे च ऐकत नसे. स्वाती ची आई काकू यांना तिने नेहमी काम करताना पाहिले होते. घर आणि काम, स्वच्छता, आला गेला पाहुणा ,सणवार यातच त्या रमत तोच गुण स्वाती ने घेतला होता. बघावे तेव्हा स्वाती काही ना काही स्वच्छ करण्यात गुंतलेली असे. कामवाली बाई ही तिने लावली नव्हती कारण त्यांचे काम तिला आवडत नसे . आता गणपती येणार होते म्हणून स्वाती ने सगळया घराची साफ सफाई करायला घेतली होती. भांडी घासणे,पडदे कुशन कवर अंथरून धुणे सगळ काम एकटी करत होती. गणपती चे पाच दिवस वेगवेगळा नैवेद्य, स्वयंपाक, आला गेला पाहुणा सगळ एकटी करत होती आणि तितकीच दमत ही होती पण तरि ही माझ्या सारखे काम कोणी नाही करणार हा आगावू आत्मविश्वास!


गणपती झाले पुन्हा पंधरा दिवसांनी दसरा येणार होता. मग काय स्वाती ने पुन्हा साफ सफाई करायला घेतली. स्वाती आता गणपती मध्ये तर साफ सफाई केलीस ना मग लगेच पंधरा दिवसात काम का काढ़लेस अभिषेक म्हणाला. अहो सण म्हटले कि ही कामे आपसुक आलीच ना? धूळ लगेच बसते सगळया वस्तु वर आणि सणा सुदी ला घर स्वच्छ असावे. तू काही कोणाचे ऐकनार नाहीस तेव्हा तुला वाटेल तसे कर म्हणत अभिषेक गप्प बसला. स्वाती आज माझ्या मित्रा च्या घरी पार्टी आहे त्याचा लग्नाचा वाढदिवस आहे. तुला घेवून यायला सांगितले आहे अभिषेक घरात येत म्हणाला. नाही ओ मला काम आहे संध्याकाळी मला नाही जमनार तुम्ही जा. अभिषेकला स्वातीचा राग आला तू बस नुसत कामच करत तुला ना माझ्या साठी वेळ आहे ना सव्हता साठी असे बोलून अभिषेक रूम मध्ये गेला. त्यानंतर दोन दिवस तो स्वातीशी बोलला नाही. स्वातीला ख़ूप वाईट वाटले.


दसरा पण झाला आणि सतत पाण्यात काम केल्याने स्वाती खूपच आजारी पडली. तिला दोन आठवड़े सक्तिची विश्रांति सांगितली होती. आता स्वाती निवांत होती ती मनोमन तिच्या वागणयाचा विचार करत राहिली . आपण खरच अति काम करतो आहोत हे तिला समजत होते पण मनाला उमजत नहवते अशी तिची गत झाली होती. जमेल तसे मूल आणि अभिषेक घरातले काम करत होते. निशा ला समजले स्वाती आजारी आहे तशी ती तिला भेटायला आली. स्वाती तुला मी बोलले तर राग येईल पण हे खर आहे की तुला कामाचा फोबिया झाला आहे. अग काम करावे पण एका लिमिट पर्यंत करावे. अस तू सगळच काम एकटी ने करत राहिलीस तर आजारी पडनार च ना? सगळ काही नीट नेटके असावे असा अट्टाहास कशा साठी? जरा सव्हता कड़े लक्ष दे ग. बाहेर पड़ या कामातुन ,बाहेरच जग बघ एन्जॉय कर. मैत्रीणी ना भेट फिरायला जा. जर तब्येतच ठीक नसेल तर हे घर आणि तुझी माणसं याला काय किंमत राहणार सांग. वरच्या कामाला बाई लाव. मुलांना कामाची सवय लाव. माझ्या शिवाय कोणाचे पान हलत नाही हा एटीट्यूड सोडून दे. उद्या तुला बाहेर पडून काही करावेसे वाटले तर तुझीच लोक म्हणतील की आम्ही तुला नव्हते अडवले आता वेळ आहे वय आहे तो पर्यत सव्हता साठी तरी जग स्वाती. नवर्याला ही वेळ दे मुलां सोबत बाहेर जात जा. हे कामाचे भूत आता तरी डोक्यातुन काढून टाक.


हो निशा मला समजते ग सतत काम करत राहत मी त्यातच गुंतुन पड़ले होते. पण तू मला समजावलेस आता मी खरच चुकीचे वागत होते. स्वाती आता तूला समजले ना मग वरच्या कामाला बाई लाव आणि तुझ्या आवड़ीनिवडीकड़े लक्ष दे. एखादी तुझी हॉबी असेल तर ती पुन्हा सुरु कर. सव्हता साठी थोड़ा वेळ जग. हो निशा तुझ्या मुळे माझी चूक समजली मला. मी माझ्यात नक्कीच बदल करेन. मग निशा स्वाती ला काळजी घे सांगत बाहेर पडली. स्वाती ने सव्हता मध्ये बदल करण्याचा निश्चय केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama