Shubhankar Malekar XII C 360

Romance Fantasy

4.8  

Shubhankar Malekar XII C 360

Romance Fantasy

आठवणीतला पहिला पाऊस...

आठवणीतला पहिला पाऊस...

2 mins
480


    पहिला पाऊस खूप लोकांच्या चेहऱ्यावर आंनद घेऊन येतो. पहिला पाऊस येताच सगळी कडे मातीचा सुगंध दरवळतो. मोर आनंदात नाचू लागतात. लहान मुले कागदाच्या होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडतात,नाचू-खेळू लागतात. सगळी कडे हिरवळ पसरते. पहिला पाऊस काही लोकांसाठी खुप काही घेऊन येतो.


          आम्ही एका छोट्याश्या चाळीत राहायचो.आमच्या शेजारीच एक सुंदर अशी मुलगी राहायची.ती अभ्यासात खुप हुशार आणि खुप साधी भोळी होती. कोणाशीही जास्त न बोलणारी, प्रत्येकाची काळजी करणारी, प्रत्येकाच्या मदतीला नेहमी तयार असणारी. मी मात्र नेहमी खेळत असायचो. अभ्यास आणि माझा कधी तरी संबंध यायचा. मी अभ्यासात फार हुशार नव्हतो. आम्ही दोघे एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो. मात्र आमच्यात कधीही जास्त बोलणे नाही व्हायचे. ती जास्त बाहेर खेळायलाही नाही यायची. ती नेहमी अभ्यास करत बसायची. मला मात्र खेळायला खूप आवडायचे. ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही फार मज्जा केली. चाळीतली सारी मुलं एकसाथ लपंडाव, क्रिकेट, बॅडमिंटन खेळायची. तीही तेव्हा आमच्या सोबतच खेळायची. मी तेव्हा तिच्याशी खूप काही बोललो. तेव्हा मला असे वाटत असे की तिला मला खूप काही सांगायचे होते. मात्र ती मला सांगू शकत नव्हती.


           जून महिना नुकताच सुरु झाला होता आणि पावसाचीही चाहूल लागली होती. एक दिवस असेच दुपारच्या वेळेस अचानक ढग घडघडायला लागले. पावसाचे थेंब हळूवारपणे जमिनीवर येऊ लागले. मी माझ्या मित्रांसोबत बाहेरच खेळत होतो. हळूहळू पावसाचा वेग वाढला. आम्ही पावसात भिजू लागलो, गाणी म्हणू लागलो, नाचू लागलो. मातीचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. पावसाचा आवाज ऐकून ती सुद्धा बाहेर आली आणि बाहेर सुकत घातलेले कपडे भिजू नये म्हणून घाईघाईत ते कपडे रस्सीवरुन काढत होती. ती घाईघाईत घरात जाताना तिचा पाय घसरला आणि ती पडू नये म्हणून मी झटक्यात तिचा हात पकडला. आम्ही खूप वेळ एकमेकांकडे बघतच होतो. तिचे डोळे तेव्हा मला खूप काही सांगून जात होते. अचानक तिच्या आईचा आतून आवाज आला,"राधा ए राधा!" तेव्हा ती उभी राहिली आणि मी तिचा हात सोडला. ती बोलली,"हा आई आले." आणि धावत तेथून निघून गेली.


              माझे सारे मित्र मागे उभे राहून हे सारं बघत होते. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. तो पहिला पाऊस मला खूप काही सांगून गेला आणि येथूनच आमच्या प्रेमाला सुरुवात झाली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance