आठवणी...
आठवणी...
ते म्हणतात ना " memories are medicines to live life".प्रत्येक व्यक्ती ,अभिव्यक्ती या आठवणींशी निगडीत आहेत.
प्रत्येकाने आपल्या जीवनात खूपशा आठवणींचा संग्रह केलेला दिसुन येतो. माहीत नाही का पण आठवणींच एक वेगळेच विश्व आहे. एखादी घटना किंवा घटक यामुळे जुन्या आठवणी ताज्या होत असतात. अजुन जोड द्यायची म्हणली तर ठिकाणांचा उल्लेख करता येईल. यात आता समाजमाध्यमं,चित्रपट यांचीही भर पडली आहे.
एखाद्या चित्रपटाची पटकथा,पात्रे जणू काही आपल्या आयुष्यातील असल्यासारखी भासतात. आणि, प्रत्येकाला आठवणींच्या देशात मनमुराद भटकायला आवडते. याला इंग्रजीत " quality time " असेही म्हणतात. पण खर सांगू का. अतिशयोक्ती होईल पण आठवणी जितक्या आल्हादादायक असतात तितक्या त्रासदायक ही असतात. यात विशेषतः प्रेम, विश्वास याचा उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे बघा ना "ज्या व्यक्तीला सर्वस्व मानलं ती व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत आपण कमी वेळात जास्त आयुष्य जगलो ती एवढी कशी बदलते ? कुणास ठाऊक !
"I want to live alone now" "मला आता एकट राहायचय " पण याचा काय परिणाम झालाय याच्याशी काहीच घेणदेण नाहीये !!जणू काही आधी कधीच भेटलोच नाही इतका परकेपणा !! असो विषयापासुन भरकटतोय मी!! काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझ्या !!!
"आठवणींच्या देशात वेदनेलाच वाव आहे
त्या जिवघेण्या वेदनेच प्रेम हे नाव आहे"