Dev music

Classics

3.5  

Dev music

Classics

आठवण

आठवण

2 mins
158


आज ती घरभर सैरभेर होऊन नुसती एकामागून एक पुस्तक चाळत होती. तिचे डोळे इकडून तिकडे काहीतरी शोध घेत होते.. नक्की काय हरवलंय तिचं ,त्याला काही उमगत न्हवते. बरं, विचारायचं धाडस तरी करणार कोण? विचारलं तर एकदम धाडकन अंगावर धावून यायची..परत आपल्या मुळे तिची चिडचिड व्हायची. असा विचार करून तो शांतच होता..

दिवस मावळतीला आला तरी तिचे शोधकार्य काही संपलेले दिसत न्हवते. आज ती नीट जेवली ही न्हवती..तिचं सर्वात आवडत पेय, चहा चक्क ती, घ्यायचा विसरली होती.. असं नक्की तिचं हरवलं तरी काय, जे आपल्याही लक्षात येतं नाहीये..त्याच्याही डोक्यात विचारचक्र एव्हाना चालू झाले होते..

एक दीर्घ श्वास घेत त्याने तिला पटकन विचारून टाकले , तुझे नक्की काय हरवलंय ? ज्याचा शोध तू सकाळपासून घेत आहे..आज घरात तुझे लक्षही नीट नाहीये.. त्या वस्तूच्या नादात तू पाहिलास का, किती पसारा मांडून ठेवलास..तो तिला एवढे बोलतच असतो की, तिचे लक्ष त्या पसाऱ्याकडे जाते..

आणि ती पुटपुटते , अरे! ते हिरव पान नाही का ,ज्याच्या वर तू मला आपले दोघांचे चित्र रेखाटून दिले होते. मला दिलेली ती पहिली भेटवस्तू होती, खरतर आजही आहे..पण तेच तर सापडत नाही ना.. तिचे बोलणं ऐकत असलेला तो तिला हसतहसत म्हणतो, एवढेच ना! एका पानासाठी एवढा आटपिटा .. असे म्हणून तो त्याची डायरी, जी तिनेही पहिली भेटवस्तू म्हणून त्याला दिलेली असती, तिच्यासमोर ठेवतो.. 

तुझ्याकडे कसे आले म्हणत ती त्याने दिलेली डायरी चाळू लागते. ती इतकी भरभर पान पालटत असते की ,ते हिरव पान आता वाळल असेल , त्याचा रंग बदलला असेल, हेही तिच्या लक्षात आले नाही. ते फक्त पान न्हवत, ती आठवण होती , आहे, तुझी आणि माझी.. जी तू तुझ्या चित्रात कैद केली होती..

निशाणी आहे आपल्या प्रेमाची...  तो फक्त आठवणीत रमलेल्या तिला भरल्या डोळ्यांनी पाहत होता.. तीचा एक एक शब्द मन लावून ऐकत होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics