STORYMIRROR

Dev music

Fantasy

2  

Dev music

Fantasy

चॉकलेट

चॉकलेट

1 min
139

"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" असे नुसते वाटत नाही तर खरोखरचं माझ्या भोवतालची सर्व दुनियाच चॉकलेटची असती तर..सगळी संपत्ती एका बाजूला , आणि चॉकलेट वरचे प्रेम , आई गं !!! दोन्हीची तुलनाच होऊ शकत न्हवती..

एकदा तर लहानपणी, मी संपूर्ण अंघोळचं चॉकलेटने केली होती..म्हणजे झालं असं, मला वाढदिवसानिमित्त खूप सारे चॉकलेट मिळाले होते..आणि त्यात कडक उन्हाळा, त्यामुळे ते वितळलेले चॉकलेट मी असे काही खाल्ले की सगळे माझा चेहरा, कपडे सगळे चॉकलेटनी माखले होते..मी पूर्ण चॉकलेटी झाले होते.. आईने ही आठवण म्हणून माझा तो माखलेला फोटो काढला होता... जो आज मी अल्बम चाळत असताना नजरेस पडला.. आणि माझ्या लहानपणच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. आजही हृदयाच्या कप्प्यात चॉकलेट वरचे प्रेम तसेच असेल तरी खूप खात नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy