Dev music

Romance Fantasy

4.0  

Dev music

Romance Fantasy

प्रेम (अलक)

प्रेम (अलक)

2 mins
144


दोघामध्ये कडाक्याचं भांडण झाले की, सुरुवात कोणी केली, कारण काहीही असले तरी ,तिचा रुसवा त्यानेच काढायचा, हे अगदी सूर्यप्रकाशा इतके लख्ख माहित होते त्याला.

ती मात्र सारखे आढेवेढे घेणार , आणि तो मनविनार. पण आज जरा जास्तच ताणून धरले होते तिने, कारणही तसेच होते..वाट्टेल तसा बोलला होता तो..

भांडण असले तरी काय झाले ,साधे शब्दही जपून वापरू नये, असे म्हणत तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती ती.

आणि त्याच बिनसलेल्या मूड मध्ये ती ऑफिसला गेली...

आज बाईसाहेबांचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी नामीच युक्ति शोधावी लागणार, म्हणून तोही विचारत पडला..

विचारांच्या तंद्रीतच त्याने कपाट उघडले..आणि त्यातून तिने नुकतीच खरेदी केलेले, गुलाबी रंगाची बेडशीट खाली पडली.. जणू काही देवानेच संकेत दिला, याच विचाराने त्याने ती बेडशीट उचलली.

तिचा सर्वात आवडता रंग, गुलाबी.. बस्स, ठरलं तर मग आज सगळे पडदे , उश्याचे अभ्रे, बेडशीट सगळं तिच्या आवडीप्रमाणे करायचे त्याचे ठरले.

ती ऑफिस मधून यायच्या आत सगळे त्याने ठरविल्याप्रमाणे घरात बेड लख्ख केले. हॉल मधली सगळी जुनी फूल बदलून त्याच्या जागी तिला आवडणारी गुलाबाची फुले आणून ,फुलदाणी मध्ये ठेवली..

हॉलच्या मधोमध टेबल आणि त्यावर ती सजविलेली फुलदाणी.. होते न्हवते तेवढे रूम फ्रेशनर शोधले पण मनासारखा मिळाला नाही मग मस्त सुवासाची अगरबत्ती लावली.. घरातले सगळे वातावरणच त्याने पार बदलून टाकले होते... आता फक्त ती घरी येण्याचे बाकी होते..

दमून आलेली ती तशीच सोफ्यावर पाय पसरून बसणार , तेवढ्यात तिचं लक्ष टेबलावरची फुलदाणी आणि नंतर नकळतच त्या फुलांकडे गेले.. घरात येणाऱ्या सुगंधित वासाने आता तीला अजूनच फ्रेश वाटत होते.. त्याने तिला काहीही न बोलता चहा आणून दिला.. तिनेही मग चहा घेत आपला मोर्चा बाथरूम कडे वळविला.. तो ही तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता.. ती आता कपडे बदलण्यासाठी म्हणून बेडरूमचा दरवाजा उघडणार, तेवढ्यात तो मागे आला... हा असा काय आहे, म्हणून तीही जरा चाचपली..

आता मात्र ती बेडरूमचा बदललेला चेहरामोहरा पाहून पारच ओशाळली.

तिच्या मनातली हुरहूर आता वाढली होती..याला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे की काय ? ,आणि आपण उगीचच काल त्याच्याशी भांडत होतो.

असं मनात म्हणत असतानाच मागून आलेल्या त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत , तिच्या थरथरलेल्या ओठावर ओठ ठेवले.

आता ती फक्त हृदयातील स्पंदन ऐकत होती.. एकजीव झालेल्या त्याचे आणि तिचे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance