STORYMIRROR

Dev music

Drama

3  

Dev music

Drama

भगवा (अलक)

भगवा (अलक)

1 min
229

तिची आपली नेहमीप्रमाणे, स्वयंपाक करता करता बडबड चालू होती..

त्याचे शांतपणे टीव्ही पाहणे सुरूच होते..

तिला काही हवं असेल ,तर ती तिच्या सगळ्या युक्त्या वापरून त्याला काहीतरी सुचविण्याचा प्रयत्न करतच असायची, ...

तिचं हे वागणं त्याच्यासाठी फार नवख नसायचं...

ती : उद्या १५ ऑगस्ट, हल्ली काय नवीनच फॅड आलय. सगळे मिळून काहीतरी थीम ठरवयाची म्हणत होते...

तिची आपली बडबड चालूच होती..

काहीही म्हणा भगवा रंगाची शानच वेगळी.. फार उत्साही वाटते या रंगाकडे

पाहिलं की. अभिमान वाटावा असाच हा रंग, आपल्या शिवाजी महाराजांचे दैवत...( तिचं बोलणं चालू होतंच तर....)

तो : तिच्याकडे पहात, आपण दोघांनी उद्या एकसारखा, नारंगी, आपल्या दैवत असलेल्या, भगव्या रंगाची कपडे घालू या का, 

काय ते म्हणतात ना ,couple dress....

सगळीकडे शांतता पसरल्यासारखे, ती आता हुं..एवढेच म्हणाली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama