साडी
साडी
आज घरात लग्नाची लगबग चालू होती.. एकेक करून सगळे पाहुणे मंडळी जमा होत होते. पाहुण्यांची सरबराई करण्यात अडकलेला त्याचे ,आज दिवसभर तिच्याकडे लक्षच गेले नाही.
हळूहळू लग्नघटिका जवळ येते..नवरा नवरी स्टेज वर येतात..नवरदेवाची बहिण, करवली अशी, तीही घाईघाईने त्यांच्या मागोमाग स्टेज वर येते..
इतका वेळ नजरेस न पडलेली ती, आता मात्र स्पष्ट सर्वामध्ये उठून दिसत असते..
जांभळ्या रंगाची पैठणी , नाकात नथ, गळ्यात सोन्याचा हार, हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण...नखशिखांत नटलेली ती.. तिच्यावरच नजर रोखलेला तो..
आजपर्यंत कधीही कौतुक न केलेला तो , तिला म्हणतो..आज तू पुन्हा नवी नवरी दिसत आहे.. आपल्या लग्नात दिसत होती अगदी तशीच..
असे म्हणत, हळूच तिच्या कानात पुटपुटतो, " आपण पुन्हा लग्न करू या???"

