Rose day (अलक)
Rose day (अलक)
तशी अगदीच जेमतेम दिसणारी ती,
राजबिंडा नाही ,पण सर्वांना सहज आवडेल असा तो...
मुलांच्या गळ्यातला ताईत आणि मुलींच्या मनातला राजकुमार
आज कॉलेज मध्ये रोज डे,
आपल्याला कोण भाव देणार म्हणून रोजच्याच साधेपणाने कॉलेजला जायला निघालेली ती,
आणि आज काहीही झाले तरी तिला लाल गुलाब द्यायचाच , असे ठरवून निघालेला तो...
पार्किंग मध्ये गाडीला धडक बसली म्हणून चिडलेली ती ,
तिला गुलाब कधी द्यायचा या गोंधळात पडलेला तो,
आता ती त्याच्यावर ओरडणार तेवढ्यात तिच्यासमोर त्याने तिच्यासाठी आणलेला ,तो लाल रंगाचा गुलाब धरतो.
हे सगळं अनपेक्षित असलेली ती फक्त त्या लाल रंगाकडे आणि त्याने समोर केलेल्या हाताकडे एकटक पाहत राहते.