Dev music

Drama

3.5  

Dev music

Drama

नीलवर्णी कृष्ण

नीलवर्णी कृष्ण

2 mins
226


नाटकाची तयारी जवळ जवळ संपली होती..अखेरचे दोन दिवस बाकी होते नाटक स्टेज वर प्रदर्शित होण्यासाठी.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सगळे पुन्हा एकदा फायनल रिहर्सल साठी जमणार होते आणि त्या प्रमाणे सकाळी सगळे जमलेही. पण अचानक कृष्णाची मुख्य भूमिका असलेल्या त्याने फोन वर त्याला भाग घ्यायला जमणार नाही असे कळविले.. 

दोन दिवसावर नाटक आहे आणि आज हा फोन करून सांगतो जमणार नाही... सगळे भयंकर चिडले होते त्याच्यावर.. त्यात मुख्य भूमिका तो बजावणार होता..बर नाटकही काही साधेसुधे न्हवते तर आंतररष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली जाणार होती.

राधाची भूमिका करणारी ती तर पारच हिरमुसली. आता पुढे काय म्हणून सगळेच चिंतेत होते. 

Show must go on .. त्यामुळं आता कोणालाच थांबून चालणार न्हवते.

त्यांचा सगळ्याचा मूड ठीक व्हावा म्हणून त्यांच्यातीलच एक त्यांचा मित्र, त्यांना हरतऱ्हेने हसविण्याचा , मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होता. हाच मित्र त्यांचे रोज नाटकातील पाठातराचा सराव करून घ्यायचा. कोणी काही विसरले , बोलताना अडखळले तर त्यांना मदत करायचा.. त्याची सर्व स्क्रिप्ट अगदी तोंडपाठ होती म्हणलं तरी हरकत नाही. 

ती , राधा मात्र सर्वापासून लांब बसलेली होती. तिला काहीच सुचत नव्हते. हसू येत न्हवते ,पण तिचे लक्ष तो हसवत होता त्याच्याकडेच होते.. तसा तो तिला आवडत ही होता. होताच तसा तो, सावळा पण देखणा, नाक एकदम तरतरीत, डोळे पण अगदी तसेच नीलवर्णी कृष्णासारखे निळसर.

"हाच तो माझा नाटकातला कृष्ण" तिच्या डोक्यात पटकन विचार चमकून गेला. अन् मागचा पुढचा काहीही विचार न करता ती त्याच्या समोर उभी राहते . सगळे हिला काय झाले म्हणून तिच्याकडे पहातच राहतात.  

त्यालाही काही समजायच्या आतच ति त्याला विचारते , तू माझा श्यामसुंदर , कृष्ण होशील..?

तिच्या या प्रश्नाने हवालदिल झालेला तोही तिला नकळत हो म्हणून टाकतो..



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama