Meenakshi Vaidya

Classics Inspirational Others

3  

Meenakshi Vaidya

Classics Inspirational Others

आसं मज बाळाची भाग पाचवा

आसं मज बाळाची भाग पाचवा

3 mins
191


'आस मज बाळाची.'. भाग पाचवा

पहिल्या भागावरून पुढे..

 

वैभव आणि अनघा डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसली होती. सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले, 

 

"मिसेस पांगारकर आपण तुमची हार्मोनल टेस्ट करून घेऊ."

सोनोग्राफीचा रिपोर्ट काय सांगतोय?"अनघानं विचारलं डॉक्टरांनी तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं 

 

"मिसेस पांगारकर तुमच्या बीजांडकोशाचा आकार लहान झाल्या सारख वाटतोय.ते बहुदा काम करत नाहीत. त्याकरता आपल्याला तुमची हार्मोनल टेस्ट करावी लागेल. त्यातून नक्की कारण काय आहे ते कळेल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पेशंटसाठी या सगळ्या टेस्ट खूप जाचक असतात.पण पेशंटनी जर सकारात्मक विचार ठेवला तर चटकन चांगला रिझल्ट मीळतो. या सगळ्या तपासण्यांसाठी खूप वेळ लागतो.पण त्या कराव्याच लागतात. त्याला इलाज नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. सकारात्मक रहा. एक डॉक्टर म्हणून तुम्हाला विनंती करतो. मनावर दडपण ठेऊ नका. सकारात्मक विचार करा .चांगला रिझल्ट मिळेल."

 

अनघाच्या मनातल्या सगळ्या शंका डॉक्टरांच्या बोलण्यानी दूर झाल्या तरीही अनघानी विचारलं,

 

"डॉक्टर काही दोष दिसतोय का?" अनघाच्या मनाची होणारी घालमेल डॉ. समजू शकत होते.कारण ज्या स्त्रिया आपल्याला मुल व्हावं म्हणून त्यांच्याकडे उपचारासाठी येत त्या सगळ्या स्त्रीयांची मनस्थिती अनघासारखीच असते. हे त्यांना माहित होतं म्हणून अनघाच्या प्रश्नं विचारण्याचा त्यांना त्रास होत नव्हता.ते स्पष्ट पण शांतपणे म्हणाले,

 

"मी तुम्हाला काय सांगीतलं. एका तपासणी करून काम होत नाही. सोनोग्राफीमधून नक्की काय झालं आहे ते कळलं नाही म्हणुन आता आपण ब्लड टेस्ट करायची आहे."डॉ.चं वाक्य पूर्ण व्हायच्या आताच अनघा बोलली "तुम्ही तर हार्मोन्स टेस्ट म्हणालात?"डॉ. किंचित हसले.

 

वैभवला मात्र अनघाच्या सतत प्रश्नं विचारण्यानी डॉ. चिडतील की काय अशी भीती वाटत होती. पण डॉ. हस-या चेह-यांनी अनघाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते.

 

"हो हार्मोन्स टेस्टच करायची आहे पण ती ब्लड घेऊन करतात. तुम्ही अवंती लॅबमध्ये जा. कोणती टेस्ट करायची आहे ते लिहून देतो. तेवढी करा.रिपोर्ट आला की घेऊन या."डॉक्टरांनी दोघांकडे बघून स्मीतहास्य केलं. दोघही त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडले.

";वैभव रोजचा दिवस माझ्या अंगावर कोसळतो.सहन होतं नाही."

"अनघा डॉक्टर काय म्हणाले आत्ता सकारात्मक विचार करा. नको फार ताण घेऊन. चल बस गाडीव.तिच्या खांद्यावर थोपटत बोलला. वैभव बाईक आणे पर्यंत अनघा तिथेच थांबली होती. पुन्हा ती त्याच विचारात गुंतली. उद्या ब्लडटेस्ट केल्यावर काय निकाल येतो देव जाणे. वैभव आला तरी तिचं लक्ष नव्हतं. "अनघा.." वैभवच्या हाक मारण्यानी ती दचकली.

" अनघा बस. पुन्हा विचर करायला लागली."  

 

"नाहीरे. पण हो ..विचार येतात मनात." अनघा गाडीवर बसली आणि ते घराच्या दिशेनी निघाले.

***

आज ब्लड टेस्ट केली. रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळेल. अनघानी ब्लड देऊन घरी आल्यावर उत्साह नसतांनाही स्वयंपाकघरात शिरण्याची तयारी दाखवली.वैभव तिची मन:स्थीती जाणून होता म्हणून तो म्हणालाही तिला,

" अग राहू दे डबा. तुझ्यासाठी जेवणाची ऑर्डर करतो. मी ऑफीसच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करीन. मी आता आंघोळ करून तयारीला लागतो."

 

वैभव आंघोळीला गेला तशी अनघा चटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. एका बाजूला बटाट्याच्या काच-या फोडणीस घालून दुसरीकडे पोहे केले. घाई-घाईत बटाट्याची भाजीच मदतीला येते.साधी आणि सोपी.

 

अनघाला हसू आलं कशाचं? बटाट्याच्या भाजीमुळे नाही तर मनुष्य किती प्रत्येक ठिकाणी कष्ट न घेता काम कसं होईल हे बघतो. आपल्या बाबतीतही हेच घडतंय नं! बाळ तर हव आहे पण पटकन. त्यासाठी एवढे दिवस थांबायची तयारी नाही. एवढ्या तपासण्या करणं म्हणजे कट–कट वाटते. 

 

आई नेहमी म्हणते कोणतीही चांगली गोष्ट करताना अडथळे येतातच. सहज आपल्याला काहीच मिळत नसतं.थोडे कष्ट घ्यावेच लागतात. आईचं ऐकून आपण कंटाळा न करता सगळ्या तपासण्या करायच्या कितीही वेळ लागू दे. वैभव आपल्या बरोबर आहे ही किती महत्वाची गोष्ट आहे. पोहे होताच तिनी पोळ्या केल्या आणि मग कुकर लावला. आता अनघाचं मन जरा शांत झालं.

 

तिचं मन शांत झालं तसा तिचा चेहराही शांत दिसू लागला.

--------------------------------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

'आसं मज बाळाची' भाग पाचवा


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics