STORYMIRROR

Meenakshi Vaidya

Others

3  

Meenakshi Vaidya

Others

ऊपरती भाग दुसरा

ऊपरती भाग दुसरा

2 mins
211

भाग दुसरा

मागील भागावरून पुढे...


विश्वास असाच आडदांड होता. मनात आले की मानसीला बेडरूममध्ये खेचून न्यायचा. दिप्ती आणि विप्राच्या डोळ्यात प्रश्न असायचे.  कारण त्या दोघींना झोपताना आई हवी असायची. मानसीला आत खेचून विश्वास खाडकन खोलीचं दार बंद करायचा. तेव्हा मुलींना वाटायचं बाबा आता आईला मारणार. मानसी तर कतलखान्यात आलेल्या गाईसारखी उभी असायची. विश्वासला विरोध करून काही उपयोग नाही हे तिला कळलं होतं. परवाच शेजारचे नेनेकाका दार उघडून बाहेर यायला नि मानसी बाहेर कच-याची बादली ठेवायला यायला एकच गाठ पडली. "काय वहिनी गेले का विश्वासराव ऑफीसमध्ये?"  त्यांच्या एवढ्या मोठ्या आवाजात विचारण्याने मानसी  चांगलीच घाबरली. "हो -" असं  कसंबसं उत्तर देऊन ती पटकन घरात शिरली आणि तिनी  दार लावल. तिची छाती अजूनही घडघडत होती. 

घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या ऑफसमध्ये या नेनेचा आवाज विश्वासला ऐकू गेला तर... या भीतीने ती अर्धमेली झाली होती. इतकी विश्वासची  तिने भीती घेतली होती. अशा वेळी मानसीला वाटत असे आपण बंडखोर का झालो नाही? माहेरी गरीबी असल्याने प्रत्येक वेळी पडते वागायची मानसीला सवय लावल्या गेली होती. आज तिला हीच सवय जड जात होती. हे सगळे कळूनही मानसी धीट होऊ शकली नाही.


दिप्ती आता मोठी झाल्याचे मानसीच्या लक्षात आलं होतं. कारण आजकाल तिच्या बोलण्यातून वडिलांबद्दलचा तिटकारा व्यक्त होत असे. मानसीने याबाबत तिला समजावलं तर ती म्हणते कशी- “आई आम्ही तुझ्यासाठी सगळे सहन करतो. मी तर आता नोकरीसाठी प्रयत्न करतेय." मानसीला हे ऐकून धक्का बसला. दिप्तीने  यंदातर बारावीची परीक्षा दिली अन् नोकरी करणार म्हणतेय मानसीने हळूवार आवाजात समजावलं, “अगं दिप्ती तू तर यंदाच बारावी झालीस तुझे ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे मग नोकरी कर. वडिलांच्या रागावर स्वतःचे भविष्य खराब का करणार तू?"

"नोकरी करता करताच मी शिकणार आहे. नोकरी लागली तर बाबासमोर तोड वेंगाडावे लागणार नाही. त्याबाबतीत आपण स्वतंत्र राहू."  "आपण स्वतंत्र राहू."...मानसी स्वतःशीच पुटपुटली.

"आपण.." या शब्दाने मानसी  आणखीन कोड्यात पडली.


"हो.मी माझ्या पगारातून आपल्या तिघींचा खर्च भागवणार आहे." दिप्ती ठाम स्वरात म्हणाली.

 "मीसुद्धा गप्प बसणार नाही." मध्येच विप्रा म्हणाली,

"तू काय करणार आहेस आता?"मानसीच्या स्वरात प्रश्नच प्रश्न होते. 


"मी बालवाडी ते केजी दूच्या ट्यूशन्स घेणार आहे." मानसीने दोघींचे बेत ऐकले तशी ती हतबुद्ध झाली. एवढ्या मोठ्या झाल्या आपल्या मुली? ती यावर विचार करते आहे तोवर दिप्ती  ठाम स्वरात म्हणाली,


"आई नोकरी असली, आपल्या हातात आपले पैसे असले की आपली स्वतंत्र ओळख देता येते. आपले निर्णय आपल्या स्वतःच्या भाषेत सांगता येतात." मानसी  डोळे फाडफाडून आपल्या मुलींकडे बघत राहिली.

-------------------------------------------------------------------------

क्रमशः


Rate this content
Log in