आपल्यावेळी असं नव्हतं.
आपल्यावेळी असं नव्हतं.


आपल्यावेळी असं नव्हतं, सालं सगळं कसं तोलून मापून असायच
वेळ प्रसंगी सगळं घर कसं बोलकं, हसरं, नंदनवन भासायचं
काळाबरोबर माणूसही बदलला, यंत्रयुगात स्वतः च एक यंत्र होऊन बसला
त्यांनेच निर्मिलेली मायावी नगरी, तोच स्वत्व हरवून बसला
नव्हता पैसा अडका, नव्हती गाडी,नव्हता आलिशान बंगला
दारिद्रयातही तीन चार पिढया सुखानं नांदायाच्या
भांडण तंटा, रुसवा फुगवा चालायचाच पण
नात्यांची घट्ट वीण तसूभरही कमी झाली नाही
मातीची घर गेली तशी मातीशी असलेलं नातं तुटत गेलं
सुख सुविधा आल्या पण माणूस माणसांपासून दुरावला
घड्याळाच्या काट्यावर नाचणारा बोलका बाहुला झाला
पैशासाठी माणूस की मांणसासाठी पैसाचं सर्वस्व झालंय