STORYMIRROR

Raj Mohite

Comedy

3  

Raj Mohite

Comedy

आंबट शौकीन - Comedy Part

आंबट शौकीन - Comedy Part

4 mins
1.4K

कालची दारू चांगलीच डोक्यात बसली दिवसभर हँग ओव्हर . नको म्हणत असताना हेमंत , तनय आणि रुद्रा आजुन एक आजुन एक करत मला उल्टे केले आणि स्वतः ही झाले. पण एका सुंदर मुली जवळ ज्या वेळी भेट झाली सर्व हँग ओव्हर संपले आणि एक वेगळी नशा चढली. थोडक्या मोडक्या शब्दात माझ्या भेटीचे विश्लेषण करत आहे.

हँग ओव्हर सकाळी अलार्म लावून ही जाग नाही आली. आठवड्याचा पहिला दिवस आणि दांडी.

माझ्या मित्रांना फक्त पार्टी साठी बहाणा पाहिजे. आणि तो बहाणा मिळाला कधी नाही ते प्रमोशन झाले म्हटल्यावर सोडणार आहेत का मला??? चांगलेच कापले. खर्च झाला त्या बद्दल काही नाही शेवटी मित्र आहेत पण घराची दशा करून सकाळीच पळ काढला.

जिकडे तिकडे बाटल्या काय?? 

ग्लास काय?? 

सिगरेट काय??? 

आणि कोंबडीच्या तांगड्याची हाडे काय?? 

आयला कुठे हाडे फेकायची तेही कळत नव्हते साल्यांना.

इतकी प्यायची कशाला ????? आणि पाजायची कशाला???

साफ सफाई करताना कंबर मोडली कोंबडीची ची हाडे कपाटं खाली , किचन वर , बेड वर , सोफ्यावर हे खात होते की पेरत होते??? 


कुठल्या गाढवाने ठेवला नैवेद्य त्या देवालाच माहित??

गाढव म्हणायला ही नको ???

माझा ही तो प्रताप असू शकतो. कुठे कुणाला शुद्ध होती.

जसे तसे कणा मोडे पर्यंत साफ सफाई केली अंघोळ केली दारू डोक्यात बसलेली विचार केला थोडा आराम करेन. बस डोळा लागणार इतक्यात कुणावर तरी मरण आले.

माझ्या दरवाजाची बेल वाजवली.

दात ओठ चावत नको नको ती शिवी देत दरवाजा उघडला.

डोळ्यावर आलेली झोप उडाली. एक जबरदस्त सुंदर मुलगी माझ्या दरवाजा समोर उभी.

तिला मी तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसा पर्यंत न्याहाळले. खरेच आपल्या नजरेत इतके सौंदर्य आलें नव्हते आजुन पर्यंत तरी. ती म्हणजे मर्सिडीज आता आमच्या बिल्डिंग आणि शेजारी म्हटल्या तर सर्व महानगर पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या. त्या मर्सिडीज मधी फेरफटका मारायची इच्छा झाली.

ओह तिचा आवाज खरेच यार किती गोड???? जर जास्त वेळ ऐकला असता ना कानाला पण मुंग्या आल्या असत्या.

तिच्या कडे न्याहाळत असताना ती म्हणाली

" सर मी प्रणय लोणचे कंपनीतून आली आहे?? तुम्हाला माहीत आहे का?? प्रणय लोणचे कंपनी????

माझे पूर्ण लक्ष बस तिच्या सौंदर्या वर ती काय बोलली ?? काहीच ऐकले नाही.

परत ती

" सर ऐकले आहे का??? प्रणय लोणचे कंपनी??

तिला पाहत उत्तर दिले 

" हो पाहिले आहे .. means ऐकलं आहे माझ्या आवडीचे आहे.

बापाने पण कुणाच्या ऐकले नसेल तरी हो म्हणालो. आपला गुणधर्म आहे तसा बायको आणि गर्ल फ्रेंड सोडून कुठल्याही स्त्रीने काही म्हणो नाही म्हणायचे नाही????

” सर आज आमचा सर्वे आहे तुमच्या एरियात आणि आकर्षक ऑफर ही आहेत खूप??

मनात म्हटलो हिच्या पेक्षा आजुन आकर्षक ऑफर कुणाला हवी आहे???

" तुम्ही फ्री असलात तर काही सँपल दाखवू???

हो या ना आत..... म्हणतात ना लोणचे पाहून तोंडाला पाणी सुटतं

तेच झाले तिला आत घेतले आणि विचारले.

पाणी घेणार ???? 

हो 

साधे की थंड ????

थंड असले तरीही चालेल बाहेर तशी ही गर्मी आहे.

मनात म्हटले माझ्या घराचे तापमान आज दुबई ला मागे टाकू शकते.

परत तिने विचारले 

" कोणते लोणचे जास्त आवडते???

कैरी , लिंबू , मिरची, लसूण बरेच प्रकार आहेत.

" मला आंबट जास्त आवडते 

ऑफर असली तर सर्व एक एक पाकीट द्या "

" अच्छा म्हणजे लोणचे शोकीन आहात तर??? तिने विचारले

मी उत्तर दिले

" खूपच आंबट शौकीन. "

थोडी हसली माझ्या उत्तराला ऐकुन. लोणचे प्रकार माहिती करून घेताना तिची ही माहिती करून घेतली. बाकी काही असो आपल्यात ते कसब जन्मजात आहे. 

तिचे नाव निशा. मुंबई मध्येच राहणारी बॉय फ्रेंड नव्हता. नुकतेच ब्रेक अप झाले होते. बोलता बोलता गप्पा रंगत गेल्या मग चहाची ऑफर केली.

चहा घेणार?????

नक्की ... घेईन

तुम्ही एकटेच राहता ???

हो ... आजुन माझे लग्न नाही झाले आहे.

मग तुमचे मम्मी पप्पा ???

ते गावी असतात.

आता मी तिला विचारले 

" तू कुठे राहतेस ???

सॉरी माफ करा माझ्या तोंडून तुम्ही च्या जागी तू निघाला.

" its okay मला तुझे ते तू ही खूप आवडले "

आता तिने मला तू म्हणून चहाची गोडी आजुन वाढवली होती.

चहा सोबत इतकी चर्चा झाली की तिचा नंबर घेतला. Saturday ला movie पाहण्याचे ठरले. तिच्या जवळून पैसै नसताना घर मालकास जे भाडे द्यायचे होते त्यातल्या १००० रुपयाचे लोणचे घेतले. तिने जाताना माझ्या हातात हात देवून bye केलं. ती निघून गेली.

तिने हातात दिलेला हात तिचा स्पर्श आणि तिच्या सोबतच्या दुसऱ्या भेटीचे स्वप्न रंगवत असताना पुन्हा दरवाजाची बेल वाजली. 

आता शिव्या न देता दरवाजा उघडण्यास गेलो.

कदाचित परत काही surprise जर नशिबात असले तर?????


दरवाजा उघडला आणि पुन्हा surprise झालो.

दरवाजात साक्षात माझी बायको उभी जी माहेरा मधे गेली होती.

मला surprise करण्यासाठी न सांगता आली होती. आल्या पासून घरात तिच्या तोंडाचा पट्टा चालू. 

ज्यावेळी मी घेतलेले १००० रुपयाचे लोणचे पाहिले. 

चांगली खबर घेतली. नको नको ते ऐकले .

" आता काय लोणच्याचा धंदा करणार आहेस??


" पैसे नसताना घर भाड्यातील १००० रुपयाचे लोणचे घेतलेस ??

" लोणच्याचा शेअर बाजारात भाव वाढणार आहे का??

एक हजार नाही त्या रात्री दहा हजार शिव्या खाल्ल्या.


सकाळ झाली उठलो कामावर गेलो दुपारी जेवताना डब्बा उघडला मस्त चपाती आणि कैरीचे लोणचे पाहून आठवण आली निशाची तिला फोन केला 

" हा नंबर सध्या अस्तित्वात नाही आहे."

तो नंबर कधी लागला नाही. आपली फजिती झाली इतके खरे. तिने नंबर देवून एक हजार रुपयाचे लोणचे चिकटवले होते. बायको डब्ब्यात त्या दिवसा पासून नेहमी लोणचे देत आहे.

अंगी आले हो आंबट शौक???

निशाने जो नंबर दिला काय करू ??? सांगा आता तुम्ही लोणचे घालू                        



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy