आम्हाला पण प्रायव्हसी हवी
आम्हाला पण प्रायव्हसी हवी
राधिका आता हे अती होतय तुझं.? शशांक रागात बोलत होता.अती..अरे माझी काही स्वप्न,इच्छा असतील की नाही याचा विचार कर ना.तुला मी काही ही आणि कसलीच कमी पडू दिली नाही आहे .पण शशांक..अरे तू तुझ्या स्व कमाईतून घेतला आहेस ना तो फ्लॅट..मग आपण राहू ना तिथे.आणि आई बाबा ना काय आपण वाऱ्या वर नाही सोडत आहोत .त्यांना भेटायला जावू.ते कधी इकडे येतील.नो राधिका मला हे पटत नाही अग ज्या आई वडिलांनी मला इतके वर्ष सांभाळले,मोठे केले.त्यांना या त्याच्या उतार वयात मी एकट नाही सोडू शकत.शशांक इतकं पण इमोशनल होऊ नकोस.आपण त्यांच्या सुख सोयी ची सगळी सोय करून देवू.काही ही त्रास त्यांना होणार नाही.मला ते जमणार नाही राधिका..आणि आपल आताच तर लग्न झालं आहे.अजून सहा महिने पण नाही झाले आणि तू खुशाल वेगळ राहायचे म्हणतेस.?शशांक मला सुध्दा माझा स्वतंत्र संसार हवा आहे.जिथे मी माझ्या मना सारख सगळ काही करू शकते.मला माझीप्रायव्हसी हवी आहे.का..या घरात तुझी प्रायव्हसी ,तुला मिळत नाही का?.कोण आहे इथे तुला त्रास द्यायला.?
मला काय म्हणायचे हे तुला समजत नाही.चांगले समजते आहे राधिका..आणि मी लग्ना आधीच तुला सांगितले आहे की मी माझ्या आई बाबा ना सोडून राहणार नाही.ठीक आहे रहा मग..मी नाही राहू शकत इथे.राधिका...आर यू मॅड..अग इतक्या छोट्या कारणाने कोणी भांडत बसते का?,राहू शकत नाही म्हंजे?मी जातेय आई कडे.तुझा निर्णय झाला की सांग.मग मी येईन राधिका आपली बॅग घेवून बाहेर पडली .शशांक हात लावून बसला..शशांक..काय झाले असा का बसला आहेस..आई बाहेरून घरी आली त्याला अस बघून तिने विचारले.आई राधिका माहेरी गेली भांडण करुन.का..आणि तू भांडलास का तिच्याशी.?आई,तिला वेगळ रहायचे आहे,जे मला शक्य नाही.शशांक ,अरे तिची इच्छा आहे तर तू तुझ्या नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट हो..आमची काहीच हरकत नाही.आई..हा तुझा मोठे पणा झाला ग.पण मी इतका ही स्वार्थी नाही आहे या वयात तुम्हाला एकट सोडून नाही जाऊ शकत.पण शशांक तुझं आताच कुठे लग्न झालंय..राधिका ची काही स्वप्न असतील ना.तिला तिचा संसार हवा असेल.आता तुम्ही या कारणाने अस भांडून अबोला धरून लांब राहणार का? आमचा नको राधिका चा विचार कर.शशांक काही बोलला नाही.राधिका आई कडे आली आई ने तिला बॅग घेवून का आलीस हे विचारले तेव्हा तिने शशांक सोबत भांडून आल्याचे सांगितले.राधिका .अग लग्ना नंतर खर सुख एकत्र सासरच्या लोकां सोबत राहण्यात आहे.तुझी नोकरी सांभाळून तू घरा कडे कधी लक्ष देणार? उद्या तुला मुल झाल्यावर त्याला सांभाळायला आजी आजोबा नको का? पाळणा घरात किंवा बाई कामाला ठेवून मुलां वर म्हणावे तसे संस्कार होत नसतात.माझच बघ..मी शाळेत नोकरी करू शकले कारण तुझी आजी..होती तुला आणि विनय ला सांभाळायला.माझं शिक्षण बघूनच आई म्हणाल्या होत्या की तू घरात बसून राहू नकोस.नोकरी कर.राधिका आणि विनय कडे मी बघते.मला कधी बरे वाटत नसेल तेव्हा आईच होत्या ग..ज्या मला गरम गरम जेवण बनवून खाऊ घालायच्या..माझ्या आई ची आठवण सुद्धा मला येत नसे.
आई पण यात माझी अशी प्रायव्हसी कुठे आहे सांग.मला वाटल काही चेंजेस करावेत किचन सगळ नव्या पद्धतीने बनवून घ्यावे..तर ते मला आई करून देणार नाहीत.कारण त्यांचं एकच पालूपद सुरू असते..मी किती हौसेने सगळ घर सजवले..कमी पैशात सगळ केले.त्यात माझ्या आठ्वणी आहेत.घराचे पडदे असोत किंवा छोट्या छोट्या वस्तू..प्रत्येक गोष्ट त्यांची आहे.यात माझं काय आहे सांग.मग जर मला ही माझं अस स्वतंत्र घर असावे,ते मी माझ्या पद्धती ने सजवावे अस नाही का मला वाटणार?बरोबर आहे राधिका तुझं..पण तुमच आताच तर लग्न झालंय..तुझ्या सासू बाईना जरा तुझ्या सोबत रुळू तर दे.प्रेमाने आणि मायेने जग जिंकता येते बाळा..मग तुझ्या सासूबाई तर मनाने प्रेमळ आहेत.तू हळूहळू त्या घरात बदल कर.तू त्यांना आजच्या मॉडर्न वस्तूंचे महत्व समजून सांग.त्या कितपत उपयुक्त आहेत हे पटवून दे.मग त्या ही नवीन बदल करायला तयार होतील.आमच्या वेळी इतका पैसा आणि सोयी ही नव्हत्या पण तरी ही आम्ही आनंदाने संसार केला.घरात खूप माणस..त्यात तुझ्या बाबा सोबत दिवसभर बोलायला सुध्दा मला मिळत नसे.पण रात्री ची वाट पाहण्यात ही एक सुख होत.रात्री आमच्या गप्पा चालत असत.मध्येच कोणी तरी काही मागायला यायचे..मग थोडे डिस्टर्ब व्हायचे पण त्यात पण एक आनंद होता..एकमेकांची खोडी काढत चिडवत घरातला प्रत्येक जण आनंदात आणि समाधानी असायचा.आम्हाला तेव्हा हे तुमचं प्रायव्हसी वैगेरे शब्द ही माहित नव्हता .पण एकत्रित राहण्यात मजा होती आजारी पडलो तर प्रत्येक जण येऊन चौकशी करायचा, हव नको बघायचा.आई पण तुमचा जमाना वेगळा होता.राधिका म्हणाली.वेगळा होता..पण लग्न,जोडीदार संसार यातर सेम गोष्टी आहेत ना?. आता प्रत्येकाला सेपरेट रूम असते.सगळ्या वस्तू वेगवेगळया , आवडी च्या असतात.सासू सासरे क शाला आडकाठी करत नाहीत .आजची मुलं त्यांच्या लाईफ स्टाईल ने जगतात. तर तसचं त्यांना जगू दे.आपला जमाना गेला आता.अस म्हणून गप्प राहतात.समजा उद्या तुझ्या दादाने ही ठरवले की आपण वेगळे राहायचे तर तुला ते आवडेल का? तू दादा ला चार शब्द सूनावशिल की आई बाबा ना या वयात एकट सोडतो का म्हणून..मग शशांक चे काय चुकले सांग यात? राधिका तू अगोदर त्या घराला आपलस तरी कर.मग हळूहळू तुला तुझ्या मना सारखी प्रायव्हसी ही मिळत जाईल.प्रत्येक गोष्टी साठी थोडा वेळ जावू द्यायचा असतो.येते का लक्षात काही?
हो आई तू म्हणतेस ते बरोबर आहे.माझेच चुकले मी अशी तडकाफडकी निघून यायला नको होते मी आताच शशांक ला कॉल करते.राधिका कॉल करायला गेलीआई हसतच आपल्या लेकी कडे बघत राहिली.
समाप्त
