३१ डिसेंबरची कहाणी
३१ डिसेंबरची कहाणी


२२ डिसेंबर ची कहाणी
ही कथा आहे अकोला येथील एका युवकाची. मी नुकताच काही कामानिमित्त बॅंकेत अकोल्याला गेलो होतो. बॅंक उघडायला बराच वेळ होता. साधारण १ तास, म्हणून मी टाईमपास करण्यासाठी बॅंकेबाहेरील हाॅटेलजवळ चहा पिण्यास निघालो. तेवढ्यात मला ऍम्बुलन्सचा आवाज ऐकू आला, मी त्या येणाऱ्या ऍम्बुलन्सच्या दिशेने वळून बघत होतो.
तिथेच सर्व मंडळी उभी असलेली हाॅटेलच्या बाजुची धावत निघाली. मी एका ३५ वर्षीय माणसाला आतुरतेने विचारले... दादा का धावत आहेत सर्व...?
त्याने मला सांगीतले, जवळच्या मोबाईल टाॅवरवरुन एका युवकाने आत्महत्या केली, ते बघण्यासाठी निघालोय.
मी पण आपली मोटारसायकल काढली आणि त्याच्यासोबत निघालो. थोड्या अंतरावर खुप गर्दी जमलेली दिसली. समोरचे अजिबात दिसत नव्हते. मला खूप आतुरता झाली होती. पण गर्दी असल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं. म्हणून मी थोडी हिंमत करुन गर्दीत शिरलो. गर्दीतून समोर निघून पाहू लागलो तर मला धक्काच बसला. बघतो तर काय...? एक तरुण युवक, त्याचं वय २१ वर्ष, त्याची उंची ५ फुट ४ इंच असावी, वर्ण गोरा, सडपातळ बांधा, पांढरे शर्ट, जिन्स पॅन्ट...... घातलेला तो मुलगा मृत अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्याला दगड लागलेला होता, रक्त रोडवर वाहत होतं, पायाच्या मोड पडलेल्या होत्या मान मुरगडलेली होती, हात वाकडे फिरले होते.
काही क्षणात ती ऍम्बुलन्स तिथे हजर झाली. आणि त्या मृत मुलाला उचलून स्ट्रेचरवर ठेऊन (मेन हॉस्पिटल) ला घेऊन गेली. मी परत त्या हाॅटेलकडे वळलो. तिथे पोहचताच मी एक ग्लास पाणी पिलो तर मला पाणीसुद्धा जात नव्हते...... जाणार तरी कसे एवढा भीषण मृतदेह बघितल्यावर कुणाला पाणी जातंय. मी वेटरला एक कटिंग मागवली व विचार करत बसलो की हा मुलगा कोण त्याने का बरं असं केलं असावं, त्याचे आई-वडील तरी कोण, त्याला काय अडचण असावी, कुठला हा मुलगा, एवढ्या लांबवर जाऊ तरी कोणी दिलं त्याला
, माझे प्रश्नचक्र फिरत होते. मला आतुरता झाली होती त्या मुलाच्या बाबतीत जाणून घेण्याची. मी चहा पिऊन हाॅटेल मालकाकडे पैसे देण्यास गेलो. त्याच्या हातात पैसे देत त्याला विचारले की आत्ताच झालेल्या आत्महत्या मुलाचे गाव कुठले हो.....?
तर त्या मालकाने सांगितले की, तो मुलगा मुळ बार्शिटाकळीचा आहे. तो इथेच कॉलेजात शिकत होता, असे मी लोकांकडुन ऐकले...
तेवढे ऐकून मू माझी मोटरसायकल घेऊन बॅंकेकडे निघालो. पण मला तो आज झालेला प्रकार काहीच सुचवत नव्हता. मी बॅंकेत न जाता त्या मुलाला ज्या इस्पीतळात चिरफाड करण्यासाठी नेले होते तिथे गेलो. मला पूर्ण जाणून घ्यायचे होते त्या मुलाच्या बाबतीत. नाहीतर मला रात्री झोपसुद्धा लागली नसती, जेवण पण गेले नसते. मी इस्पितळात पोहचलो तेव्हा त्या मुलाची आई मला बेशुद्ध पडलेली दिसली. तिथेच बाजुला त्या मुलाचे वडील, भाऊ, १ बहिण खूप रडत होते. तेवढ्यात मला एका मुलाची जोरात हाक ऐकू आली तो मुलगा त्या प्रेताचा मित्र होता. मी सर्व बघत होतो. मला राहवत नव्हतं की या मुलाने असे का केले याला तर अजून पुर्ण जग बघायचं होतं. मला जाणून घेण्याची आतुरता झाली होती. काही वेळानंतर त्या मुलाचा मित्र माझ्याकडे येऊन स्वतःला सावरत बसला. माझ्या हातातील पाण्याची बोटल त्याला देऊन थोडा धीर दिला.
मी त्याला विचारले, काय रे भावा असं का केलं या मुलाने... काय नाव त्याचं...? त्या मुलाने मला सर्व हकीकत सांगितली...
त्या मुलाचे नाव जीवन होते. क्लासमध्ये खुप हूशार, सर्वाच्या मदतीला धाऊन येणारा, मित्राचा जिगर, सर्वाचा लाडका होता तो मुलगा, पण जीवनने दिव्यावर प्रेम केले होते. तेव्हाच माझ्या लक्षात आले की ही सर्व हकिकत प्रेम प्रकरणाची आहे.
दिव्या खुप सुंदर होती ती पण जीवनवर खुप प्रेम करायची चार दिवस आधीच तिला तिच्या वडीलांनी कॉलेजला यायचे बंद केले होते, असे जीवनचा मित्र मला सांगत होता.
क्रमश: