येणार आहे ती
येणार आहे ती
वियद गंगा लगागागा लगागागा लगागागा
लगागागा
*येणार आहे ती*
सुरेली अंतराच्या आतली झंकार आहे ती
तुफानांनो जरा थांबा अता येणार आहे ती
ऋतूंनो आज होऊ द्या फुलांची सारखी वर्षा
अशा बागेत स्वप्नांच्या मला नेणार आहे ती
बघा उल्का कशा आल्या नभाला सोडुनी आता
कसे त्यांना कळाले की अता हसणार आहे ती
तुझ्या एकाच हास्याने फुलावे वाळवंटाने
सुखाच्या पावसामध्ये इथे भिजणार आहे ती
जरा उधळून जा सूर्या गुलाबी रंग आकाशी
अरे हा वेळ प्रेमाचा मला देणार आहे ती

